गणरायाच्या आगमनाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. घरोघरी बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक तयार करण्यासाठी गृहिणींची तयारी सुरू झाली आहे, तर खवय्यांनादेखील केव्हा एकदा उकडीचे मोदक खायला मिळतील असे झाले आहे. बाप्पाचे आवडते मोदक भक्तगणांचा देखील आवडीचा पदार्थ! गणेशोत्सवात प्रत्येक घरात आवर्जून उकडीचे मोदक बनवले जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण उकडीचे मोदक आवडीने खातात.
मोदक हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत का याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?किंबहुना मोदक आरोग्यदायी प्रसाद आहे हे जाणून तुम्हाला आनंदच होईल! चला तर मग जाणून घेऊ या मोदकाचे फायदे!
आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत पटवर्धन यांनी मोदक खाण्याने आपल्या आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांबाबत लोकसत्ताला सविस्तर माहिती दिली आहे.पल्लवी सांगतात की, “मोदकामुळे आपल्याला कधीही पचनाचे काही त्रास होत नाहीत, कारण त्यात खूप तेल किंवा साखर आहे असे नसते, त्यामध्ये ठराविक प्रमाणात खोबरे आणि गूळ वापरले जाते. पारंपरिक पद्धतीनुसार मोदक उकडीचे असतात , त्यामुळे ते पचनासाठी चांगले आहेत. तळणीपेक्षा उकडीचे मोदक खाणे आरोग्यासाठी पूरक आहेत. मोदक हा स्वतंत्रपणे खाण्याचा पदार्थ आहे. आपण नेहमी जेवणांनंतर मोदकावर ताव मारतो मात्र त्यापेक्षा थोडा वेळ घेऊन मोदकाचे सेवन केल्यास उत्तम!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा