Malaika Arora Shares Trick To Eat Mindfully : मलायका अरोरा ही बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही उत्तम डान्सरसुद्धा आहे. ती सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अलीकडेच ५१ वर्षीय मलायका अरोराने (Malaika Arora) ‘कर्ली टेल्स’बरोबर झालेल्या मुलाखतीत ‘मनापासून खाण्याची’ तिची टीप शेअर केली आहे. “ती नेहमी एका बाऊलमधून जेवते. क्वचितच ती प्लेटमध्ये जेवते. कारण- तिला माहीत आहे की, तिला किती खायचं आहे आणि त्यापेक्षा जास्त मी घेत नाही आणि खातसुद्धा नाही”, असे तिने म्हटले आहे.
संवादादरम्यान मलायका अरोराने (Malaika Arora), सकाळी विविध पाणीआधारित शॉट्स पिण्यापासून ते अगदी योगापर्यंत, म्हणजेच खाण्यापिण्याच्या आणि फिटनेसच्या सवयींबद्दलही सांगितले. तिच्या म्हणण्यानुसार तिची दिनचर्या फारशी बदलत नाही. “माझी वॉटर थेरपी जवळजवळ ४५ मिनिटे ते एक तासाची असते, जी दररोज बदलते. हळद, आले, जिरा व ओव्याचे पाणी, गरम पाणी आणि चुना आदींपैकी एकाचे सेवन करून, मी दिवसाची सुरुवात करते आणि नंतर योग्य ते जेवण जेवते.
मलायका अरोराचे (Malaika Arora) नाश्त्याचे पदार्थ ठरलेले असतात. त्यामध्ये अंडी, पोहा, डोसा, इडली, पराठे आदी अनेक पदार्थांचा समावेश असतो. मलायका अरोरा सॉलिड नाश्ता करते, जो सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तसेच रात्रीचे जेवण ती ७ पर्यंतच करते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत ती काहीही खात नाही.
त्याचबरोबर मलायका अरोरा (Malaika Arora) दुपारच्या जेवणात कार्बोहायड्रेट्सचा समावेश करते. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, “मी नेहमी माझ्या जेवणात कार्बोहायड्रेट्सचा समावेश करते. मी जेवणात त्याचे योग्य संतुलनसुद्धा ठेवते. नाही तर मला खूप कंटाळवाणे वाटते. त्यामुळे मी उशिरापर्यंत काम करू शकत नाही. मी रात्री खिचडी, भाज्यांसह पौष्टिक जेवणाचे सेवन करते.”
मलायका अरोराने (Malaika Arora) सांगितल्याप्रमाणे बाऊलमध्ये खाणे हा एक चांगला सराव आहे का? तर हे जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने पारस हॉस्पिटल, गुडगावमधील पारस हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉक्टर नेहा पठानिया यांच्याशी चर्चा केली. त्या म्हणाल्या की, बाऊलमध्ये अन्न खाल्ल्याने,’संतुलित आहाराचा भाग नियंत्रित राहण्यास मदत होते’. त्याचप्रमाणे अशा प्रकारे सेवन केल्यास अन्न हा पोषणाचा स्रोत बनतो. पण, त्यामुळे भावनिक कम्फर्ट मिळत नाही.
याचबद्दल हैदराबादच्या लकडी का पूल येथील ग्लेनेगल हॉस्पिटल्सच्या सल्लागार व एचओडी क्रिटिकल केअर विभागाचे डॉक्टर मनेंद्र म्हणाले की, बाऊलचा नैसर्गिकरीत्या आकार मर्यादित असतो. बाऊलच्या लहान पृष्ठभागाच्या क्षेत्रामुळे संतुलित आहाराचा भाग नियंत्रित राहण्यास मदत होते आणि जास्त अन्न खाल्ले जात नाही. त्याचप्रमाणे कॅलरी सेवन व्यवस्थापित करण्यासाठी आणि संतुलित आहार राखण्यासाठी हे विशेषतः उपयुक्त ठरू शकते.
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून डॉक्टर मनेंद्र यांनी नमूद केले की, बाऊलमधून खाणे मनापासून खाण्याच्या अनुभवाला प्रोत्साहन देते. पण, एक बाऊल भरण्यासाठी अनेकदा दोन्ही हात वापरावे लागतात. अन्नाशी जुळवून घेण्यासाठी किंवा मनापासून अन्न खाण्यासाठी खाण्याची प्रक्रिया मंदावणे आवश्यक असते. हे पचन सुधारू शकते, मेंदूला परिपूर्णतेची नोंदणी करू देते, अति खाण्याचा धोका कमी करते. त्याशिवाय सॅलड्स, सूप किंवा धान्य यांसारख्या अनेक घटकांचे जेवण, पोषक घटकांचे संतुलित मिश्रण सुनिश्चित करते.
फळे आणि भाज्या खा…
त्यामुळे कमी-कॅलरी, पौष्टिक पदार्थ जसे की, फळे आणि भाज्या खा. भाज्या आणि फळे हे जीवनसत्त्वे आणि खनिजांचे चांगले स्रोत असतात. कारण- यामध्ये कॅलरी कमी आणि फायबर समृद्ध असतात. भाजीपाला, फळे, इतर भाज्या किंवा वनस्पती-आधारित खाद्यपदार्थांप्रमाणे हृदयविकार टाळण्यास मदत करणारे पदार्थ असतात. त्यामुळे तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि फॅट्सचा समावेश असल्यास ते उत्तम ठरेल, असे नेहा पठानिया म्हणाल्या आहेत.
हे फायदे लहान, सकारात्मक बदल दर्शवतात, जे निरोगी खाण्याच्या सवयींमध्ये योगदान देऊ शकतात. पण, बाऊल आणि प्लेटमधून जेवणे शेवटी वैयक्तिक आवड, जेवणाचा प्रकार आणि वैयक्तिक आहाराच्या गरजांवर अवलंबून असते, असे डॉक्टर मनेंद्र म्हणाले आहेत.