Malaria Causes, Symptoms and Precautions in Marathi: अनेक लोक पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन करत आहेत. हिरवागार निसर्ग जणू आपल्याला त्याच्याकडे बोलावूनच घेतो. मात्र, या काळात डासांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढतं. मलेरियासारखे डास परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात, यामुळे अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशातच सुरक्षित आणि आनंददायी प्रवास करण्यासाठी, मलेरियापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. बेंगळुरूच्या जनरल फिजिशियन MBBS, MD, डॉ. पल्लेटी शिव कार्तिक रेड्डी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

आम्ही डॉ. पल्लेटी शिव कार्तिक रेड्डी, MBBS, MD, जनरल फिजिशियन, बेंगळुरू यांच्याशी मलेरिया-स्थानिक भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी व्यावहारिक सुरक्षा टिप्स, प्रभावी प्रतिबंधक धोरणांवर लक्ष केंद्रित करणे आणि लक्षणे उद्भवल्यास काय करावे याबद्दल बोललो.

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
snake bites disease
सर्पदंश हा आजार मानला जाणार? कारण काय? याला अधिसूचित आजार घोषित करण्याची मागणी केंद्राकडून का होत आहे?
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा

पावसाळ्यात फिरायला गेलंच पाहिजे, मात्र फिरायला गेल्यावर आपली काळजी घेणेही तितकंच महत्त्वाचं आहे. मलेरियाच्या वाढत्या धोक्याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. मलेरियाची लक्षणे जाणून घेणे आणि त्वरित वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. मलेरियामध्ये सामान्यत: ताप खोकला, सर्दीसारखी लक्षणे दिसून येतात.

मलेरियाची लक्षणे खालील प्रमाणे

ताप आणि थंडी: थंडीसह उच्च ताप हे मलेरियाचे लक्षण आहे.

डोकेदुखी आणि स्नायू दुखणे: ही सामान्य लक्षणे आहेत, अनेकदा थकवा आणि अशक्तपणा येतो.

मळमळ आणि उलट्या: गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणे देखील उद्भवू शकतात.

घाम येणे आणि भरपूर घाम येणे: तुमचे शरीर संसर्गाशी लढण्याचा प्रयत्न करत असताना तुम्हाला जास्त घाम येऊ शकतो.

प्रवास करताना किंवा घरीच तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास डॉ. रेड्डी म्हणतात, ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या. गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी लवकर निदान आणि उपचार महत्त्वपूर्ण आहेत.

प्रवास करताना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक टिप्स –

मलेरियापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यामध्ये उपाय जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

मलेरियाविरोधी औषध: योग्य मलेरियाविरोधी औषध घेण्यासाठी तुमच्या सहलीच्या अगोदर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही औषधे संसर्ग होण्यापासून रोखण्याचे कार्य करतात. तुमच्या सहलीपूर्वी ते घेणे, सुरू करणे, तुमच्या मुक्कामादरम्यान ते सुरू ठेवणे आणि तुम्ही घरी परतल्यानंतरही त्याचा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे.

डास चावण्यापासून बचाव: मलेरियापासून बचावाचा मुख्य उपाय म्हणजे जिथे डास आहेत त्या भागात संपर्क कमी करणे. मलेरियाचे डास पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी सर्वाधिक सक्रिय असतात. यावेळी सुरक्षित ठिकाणी थांबलं पाहिजे. तसेच लांब हात असलेले कपडे आणि पँट घाला.

लोशन लावणे – डास चावण्यापासून बचाव करण्यासाठी हाताला आणि पायाला डीईईटी, पिकारिडिन क्रीम त्वचेच्या उघड्या भागावर लावा. ही क्रीम निवडतानाही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा >> रात्री लवकर झोप लागत नाही? १० मिनिटाचा सोपा उपाय; अंथरुणावर पडताच लागेल शांत झोप

घरात कीटकनाशक फवारणी: डासांची संख्या आणखी कमी करण्यासाठी घरामध्ये कीटकनाशके वापरा. संध्याकाळपूर्वी फवारणी करणे विशेषतः प्रभावी ठरू शकते. त्यामुळे मलेरिया होऊ नये म्हणून ‘अशी’ काळजी घ्या आणि ॲडमिट होण्याचा धोका टाळा.

Story img Loader