How To Understand Food Nutrition Labels: एखाद्या सुपर मार्केटमध्ये गेलं की भरभरून खरेदी करण्याची आपल्याला सवय असते. अलीकडे तेल, तूप, सॉसच्या बाटल्या, चटण्या काही प्रकारची पीठं आपण पॅक केलेल्या स्वरूपातच खरेदी करतो. आपल्या शॉपिंगच्या त्या ट्रॉलीमध्ये हे डबे किंवा पॅकिंगच्या पिशव्या टाकण्याआधी काही जण त्यावरील लेबल्स वाचायचा प्रयत्न करतात. फार फार बघून आपण काय बघतो तर एक्सपायरी डेट पण बरं का मंडळी फक्त एक्सपायरी डेट बघणंच पुरेसं ठरणार नाही तुम्हाला पोषणाची गणिते व अन्य काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे ज्यामुळे तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणे टाळता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्हाला माहित आहे का?

अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर दहा दिवसांनी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रेवंत हिमातसिंका, यांना एप्रिल २०२३ मध्ये कॅडबरी तर्फे कायदेशीर नोटीस धाडण्यात आली होती. हिमात्सिंका यांनी माल्ट आणि चॉकलेट-आधारित हेल्थ ड्रिंक, बोर्नव्हिटामधील साखरेच्या प्रमाणावर टीका केली होती. या टीकेवर कॅडबरीने आपण साखरेचे प्रमाण मर्यादेनुसारच ठेवले असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. पण २०२३ च्या डिसेंबरमध्ये हिमात्सिंका यांनी इंस्टाग्रामवर जाहीर केले की कॅडबरीने या टीका करणाऱ्या व्हिडिओनंतर आपल्या बोर्नव्हिटा पावडर मधील साखरेचे प्रमाण १५ टक्क्यांनी कमी केले होते.

आता, हिमातसिंका यांनी लोकांना फूड लेबल कसे वाचायचे व त्यातील कोणत्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे सांगितले आहे.

खाण्याच्या पॅकेट्सवरील कोणत्या बाबी तपासून पाहाव्या?

  • सर्व्हिंग साइज तपासा: प्रत्येक कंटेनर व पॅकेटचे किती लोकांसाठी पुरेसे ठरेल हे सर्व्हिंग साईजवरून लक्षात येते
  • घटकांची यादी: तुमच्या लक्षात येतील तितक्या घटकांची नावे व प्रमाण तरी नीट वाचून घ्या.
  • पोषक घटकांचे प्रमाण: फॅट्स, साखर आणि सोडियम यासारख्या मुख्य पोषक घटकांचे प्रमाण बघा
  • अनसॅच्युरेटेड फॅट्स, साखर आणि सोडियममध्ये %DV कमी असेल याची खात्री करा.
  • कृत्रिम ऍडिटीव्ह म्हणजेच पदार्थ जास्त काळ टिकून राहण्यासाठी वापरलेल्या वस्तूंचे प्रमाणही बघा.

पॅकेजिंगचा रंग महत्त्वाचा!

हिमातसिंका सांगतात की, फूड लेबल्स वाचणे हे अत्यंत आवश्यक आहे. २१ व्या शतकात अनेकजण कोडिंग किती महत्त्वाचे आहे हे सांगत असतात पण त्याच बरोबर आपण काय खाता हे जाणून घेणे जास्त गरजेचे आहे. आपल्या आहारात ७० ते ८० टक्के पॅकेज्ड फूडचा समावेश असतो. अगदी तुम्ही घरगुती जेवण बनवायचे जरी म्हटले तरी त्यात वापरल्या जाणाऱ्या बहुसंख्य वस्तू या पॅक केलेल्या असतात. हिमातसिंका यांनी पॅकेजिंगचा रंग सुद्धा कसा महत्त्वाचा आहे याविषयी सुद्धा भाष्य केले. उदाहरणार्थ हिरवे पॅकेजिंग हे नैसर्गिक आणि निरोगी मानले जाते.

हे ही वाचा<< ४ वर्षाच्या लेकाचा खून करण्याचं धाडस सूचनाने का केलं? पालकांना मुलांचा इतका राग का येऊ शकतो, पाहा लक्षणे व उपाय 

जिथे चिंता वाटत नाही तिथेच खरी चिंता..

हिमातसिंका जवळच्या किराणा दुकानात लोक काय खरेदी करतात याचे नेहमी निरीक्षण करत असतात, त्यानुसार ते सांगतात की गूगलवर मधुमेह किंवा लठ्ठपणा यांसारख्या परिस्थितींचा शोध घेतल्यास कोका-कोला, पेप्सी आणि चॉकलेट यांसारखे संबंधित खाद्यपदार्थ आढळतात, जे सामान्यतः आरोग्यासाठी नुकसानदायक मानले जातात याबाबत सतर्कता अधिक असल्याने अनेकजण हे पदार्थ कमी प्रमाणात सेवन करतात पण हे ही लक्षात घ्यायला हवे की आपल्या लक्षात न येणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा प्रचंड घातक घटक असू शकतात. अगदी साधं उदाहरण म्हणजे बिस्किटे. दिवसातून दोनदा बिस्किटे खायची जरी सवय असेल तर महिन्याभरात आणि मग वर्षभरात तुम्ही किती मैदा व साखर खाताय याकडे लक्ष देणे सुद्धा महत्त्वाचे असते. मुद्दा हाच की बिस्किट्स असो किंवा सॉस तुम्ही ज्या ज्या गोष्टी नियमित वापरता त्यांच्या खरेदीच्या वेळी सतर्क राहून त्यातील विविध घटकांचे प्रमाण लक्षात घ्यायला हवे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man made bournvita reduce sugar 15 percent tells how to read food labels on biscuits chips maggie sauce with expiry date svs