How to recognise and respond to a stroke : स्ट्रोक म्हणजे लकवा किंवा अटॅक. मेंदूपर्यंत रक्त पुरवणारी धमनी जेव्हा फाटते तेव्हा व्यक्तीला अचानक स्ट्रोक येऊ शकतो. स्ट्रोक हा प्रामुख्याने वृद्ध लोकांमध्ये आढळून यायचा; पण गेल्या काही दशकांपासून तरुण-प्रौढ मंडळींमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र, सध्या समोर आलेलं प्रकरण चिंता वाढवणारं आहे. त्यामध्ये सलूनमध्ये हेड मसाज करून घेणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. कर्नाटकातील एका ३० वर्षीय तरुणाला सलूनमध्ये हेड मसाज केल्यावर स्ट्रोक आला. अशा स्थितीत तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की, डोकं दाबल्यानंतर ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो का? उत्तर आहे, होय. चुकीच्या ठिकाणी दाबल्याने मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो; ज्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो.

द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हाऊसकीपिंगमध्ये काम करणाऱ्या या व्यक्तीला हेड मसाज करताना तीव्र वेदना जाणवल्याचं सांगितलं जातं; पण सुरुवातीला त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं. मसाज केल्यानंतर काही तासांनी प्रकृती बिघडल्याचं लक्षात आलं; जेव्हा बोलण्यात अडचण आली आणि डाव्या बाजूला अशक्तपणा जाणवला.

Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
woman overcomes rare disorder of painful meningioma
वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

या तरुणाला रुग्णालयात नेलं असता, मान जोरात वळवल्यामुळे कॅरोटिड आर्टरी तुटल्यानं हा स्ट्रोक आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यासाठी त्याला अँटीकोआगुलंट उपचार देण्यात आले आणि दोन महिने आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. या प्रकारच्या स्ट्रोकमध्ये मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबतो. त्यामुळे मृत्यूचाही धोका आहे. दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील न्यूरोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. पी. एन. रेंजेन यांच्या मते, चुकीच्या पद्धतीनं डोक्याचा मसाज केल्यामुळे स्ट्रोकसारखी गंभीर गुंतागुंत होऊ शकते. मसाज किंवा शॅम्पू करताना आपली मान जास्त ताणली जाते तेव्हा वर्टेब्रोबॅसिलर धमनीला इजा पोहोचण्याची शक्यता असते.

ग्रेटर नोएडा येथील यथार्थ हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि एचओडी ऑफ न्यूरोलॉजी विभागाचे डॉक्टर अमित श्रीवास्तव सांगतात की, एथेरोस्क्लेरोसिस किंवा हायपरटेन्शन यांसारख्या अगोदर अस्तित्वात असलेल्या रक्तवहिन्यांसंबंधीची स्थिती असलेल्या लोकांमध्ये हा धोका वाढतो. त्यामुळे त्यांची धमनी खराब होणं, रक्ताच्या गुठळ्या होणं व स्ट्रोक यांसारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच मानेच्या दुखापतीची शक्यता कमी करण्यासाठी सौम्य, नियंत्रित तंत्रांचा वापर करणाऱ्या परवानाधारक थेरपिस्टकडून मसाज घेणं महत्त्वाचं आहे.

स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी उपाय

डोक्याला मसाज किंवा शॅम्पूदरम्यान स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी डॉ. रेंजेन आणि डॉ. श्रीवास्तव असे दोघेही अनेकदा सावधगिरीची शिफारस करतात.

परवानाधारक व्यावसायिकांची निवड करणे : नेहमी अनुभवी, परवानाधारक व्यावसायिकांची निवड करा; ज्यांना या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अनुभव असेल. केस धुताना मानेवर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्या. मसाज करून घेताना अस्वस्थता जाणवल्यास थेरपिस्टला ताबडतोब सांगा; जेणेकरून पुढील नुकसान टाळू शकते. उच्च रक्तदाब किंवा मधुमेह यांसारख्या रक्तवहिन्यांसंबंधीच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी जास्त सावध राहिले पाहिजे. कारण- अशा लोकांना जास्त धोका असतो.

हेही वाचा >> Liver health: दहा पैकी तीन लोकांमध्ये यकृताची समस्या; कशी काळजी घ्याल स्वत:ची? जाणून घ्या

स्ट्रोकची लक्षणे आणि प्रभावी उपचार

चेहरा : चेहऱ्याच्या एका बाजूला ताण येतो.
हात : हात वर केल्यावर लगेच खाली पडतो का तपासा
बोलण्यातील स्पष्टता : बोलताना उच्चार अचानक अस्पष्ट किंवा गोंधळल्यासारखे होतात.

हेही वाचा >> महिलांनो गर्भधारणेदरम्यान अभिनेत्रींचे अनुकरण करत व्यायाम करताय? थांबा, आधी डॉक्टरांनी सांगितलेला धोका वाचा

यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या.

डॉ. रेंजेन पुढे म्हणतात की चक्कर येणे, मळमळ व गडबड हेदेखील मानेच्या हाताळणीमुळे स्ट्रोकचे संकेत देऊ शकतात. यावेळी डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणे आवश्यक आहे. जलद उपचारांमुळे मेंदूचे नुकसान कमी होऊ शकते आणि बरे होण्याची शक्यता वाढू शकते.