Diabetes Health Care: मधुमेहाच्या रुग्णांना कायम त्यांचं अमुक खाल्ल्यास शुगर लेवल वाढणार तर नाही ना अशी भीती वाटत असते. त्याअभावी मधुमेहाचे रुग्ण अनेक गोष्टी खाणं टाळतात. बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्ब्स असतात. कार्ब्स शरीरातील शुगर लेवल वाढवण्याचं काम करतं. त्यामुळे अनेक रुग्ण बटाटा खाणं टाळतात. मात्र, हा गैरसमज किती योग्य किंवा अयोग्य आहे ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डायबिटीजतज्ज्ञ डॉ. मोहन सांगतात, त्यांना नेहमी एक प्रश्न विचारला जातो की, मधुमेह असलेले लोक बटाटे खाऊ शकतात का? आणि मी त्यांना नेहमी एक सोपा मंत्र सांगतो की, तुम्हाला बटाटे खायचे असतील तर खा, पण यावेळी तुम्हाला तुमच्या जेवणातून चपाती, भात काढावे लागेल. तुम्ही चपाती आणि बटाट्याची भाजी खाल तर तुमच्या कॅलरीज वाढतील; त्यामुळे तुम्हाला जर बटाटा खायचा असेल तर ताटातून कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ कमी करा आणि त्याऐवजी बटाटा घ्या. सोप्या भाषेत सांगायचे तर बटाटे खाणे हे तांदूळ किंवा गहू खाण्यासारखेच आहे. पाश्चात्य देशांमध्ये, मॅश केलेले बटाटे त्यांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण तांदूळ आणि गव्हाचा वापर ते अत्यंत कमी करतात. त्यामुळे बटाट्याच्या स्वरूपात कर्बोदके खाणे त्यांच्यासाठी योग्य आहे.

भारतात कर्बोदकांचा वापर खूप जास्त आहे. आपल्या आहारात कर्बोदके वापरण्याची सरासरी टक्केवारी सुमारे ६५ ते ७० टक्के आहे. टाइप २ मधुमेहाचे निदान झालेल्या लोकांमध्ये कर्बोदकांचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळतं.

बटाटे आणि संतुलित आहार

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, आपण कर्बोदकांचं प्रमाण १० टक्क्यांनी कमी केले आणि प्रथिने २० टक्क्यांपर्यंत वाढवली तर उर्वरित कॅलरीज चरबीसह एकत्रित आहार संतुलित होतो. ज्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

विशेषत: भारताच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील भागात तांदूळ आणि उत्तर भारतातील गहू हा मुख्य वापर आहे. हे लक्षात घेता, या तृणधान्यांमधून मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळतात. म्हणून आम्ही रुग्णांना बटाटासारख्या कंदयुक्त भाज्या कमी करण्याचा सल्ला देतो आणि त्याऐवजी पोषक, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेल्या हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतो.

​उकडलेल्या बटाट्याचे फायदे

उकडून थंड केलेल्या बटाट्यामध्ये जास्त प्रमाणात स्टार्च तयार होते. यामुळे आपली चयापचयाची क्षमता वाढण्यास मदत मिळते. शिवाय शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्यासह अन्य लाभदेखील मिळतात. उकडलेल्या बटाट्यामध्ये रताळ्यासमानच कॅलरी असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. सर्वजण आपल्या आहारामध्ये उकडलेल्या बटाट्यांचा समावेश करू शकतात. उकडलेले बटाटे पूर्णतः थंड होऊ द्या, यानंतर हे बटाटे मॅश करा किंवा त्याचे बारीक तुकडे करून घ्या.

बटाटे खाण्याचा सर्वोत्तम मार्ग

बटाटे खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांसह एकत्र करणे. ऑक्टोबर २०२० च्या ऑस्ट्रेलियन अभ्यासात टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांचे मूल्यमापन केले गेले. ज्यांना रात्रीचे जेवण एकतर उकडलेला बटाटा, भाजलेला बटाटा, २४ तास थंड केलेला उकडलेला बटाटा किंवा बासमती तांदूळ सोबत घ्यायचा होता. प्रत्येक जेवणात ५० टक्के कार्बोहायड्रेट, ३० टक्के चरबी आणि २० टक्के प्रथिने होती. बटाटा खाणाऱ्या तीनही गटांमध्ये जेवणानंतरच्या रक्तातील ग्लुकोजमध्ये कोणताही फरक दिसून आला नाही.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Managing blood sugar in your diet are there healthy ways to consume potatoes srk
Show comments