Mango peels: आंबा खायला कोणाला आवडत नाही? उन्हाळा सुरू होण्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. सध्या आंब्याचा मोसम नसला तरी बाजारपेठ आणि दुकानांमध्ये आंबे पाहायला मिळत आहेत. आंबा खाताना लोक सहसा त्याची साल कचरा म्हणून फेकून देतात.पण तुम्हाला माहित आहे का, आंब्याची साल तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतात. मात्र तुम्ही देखील आंबा खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देत असाल तर ही चूक कधीही करू नका. आज आम्ही आंब्याच्या सालीच्या अशाच काही मोठ्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत.
कर्करोग दूर करतो –
एका अहवालानुसार, आंब्याच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे आपल्याला कर्करोगापासून वाचवतात, आंब्याची साल फुफ्फुसाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, मेंदूचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यापासून बचाव करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. तसेच, आंब्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर –
याशिवाय वजन कमी करायचे असेल तरी देखील आंब्याची साले खाऊ शकता. असे मानले जाते की त्याची साल वजन कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. म्हणजेच वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांनी आंब्याची साल अजिबात फेकू नये. कारण त्यामुळे तुमचे वाढलेले वजन कमी होऊ शकते.
हेही वाचा – डायबेटिसच्या रुग्णांनी ऊसाचा रस प्यावा की नाही? जाणून घ्या याचे आणखी काही फायदे
पिंपल्सपासून सुटका मिळते
चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर आंब्याच्या सालींचा उपाय खूप उपयोगी पडतो असे झाल्यावर आंब्याची साल बारीक करून त्याची पेस्ट तयार करा आणि मग पिंपल्सवर लावायला सुरुवात करा. काही दिवसात पिंपल्स आपोआप जायला सुरुवात होईल आणि कोणत्याही प्रकारचे डागही चेहऱ्यावर राहणार नाहीत.