Mangoes For Skin: सध्या फळांचा राजा असलेल्या आंब्याचा हंगाम सुरु आहे. उन्हाळा सुरु झाला की सर्वांना कधी एकदा आंबा खातो असे होते. आंब्याचा नाव घेतलं तरी सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. आंब्याची चवच अशी आहे की क्वचितच एखादा व्यक्ती असेल जो आंबा खात नसेल. या काळात बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे खाण्यासाठी उपलब्ध असतात. ज्यांना आंबा खायला आवडतो त्यांच्या घरात फक्त आंबेच दिसतात. आंब्याच्या सेवनाबाबत लोकांच्या मनात आरोग्याबाबत कित्येक प्रश्न उठतात पण त्यापैकी एक प्रश्न म्हणजे आंब्याच्या सेवनामुळे आपल्या त्वचेला फायदा होतो का? जर तुमच्या मनात देखील असा प्रश्न उपस्थित असेल तर त्याचे उत्तर डॉक्टरांकडून जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉक्टरांनी सांगितले आंब्याच्या सेवनामुळे त्वचेला होणारे फायदे

@dr.Jayshreechandra यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा तो व्हिडिओत आंबा खाण्यामुळे त्वचेला होणाऱ्या फायद्याबाबत माहिती दिली आहे. डॉ. चंद्रा यांनी सांगितले की, आंब्यामध्ये मँगफेरिन, रेस्वेरास्ट्रोल, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारखे एँन्टी ऑक्सिडेंटने समृद्ध असतो. त्यामुळेच प्रत्यक्षात ते फ्री रेडिकल स्कँवेंजर्स असतो आणि आपल्या त्वचेचे रक्षण करते.

कोणी आंबा खाणे टाळावा?

पण आंब्यामध्ये सारखेचे प्रमाण जास्त असते . जर अधिक पुपळ असतील तर तुम्ही इन्सूलिन रेसिस्टंट असू शकता किंवा पीसीओएस असू शकता. अशावेळी जेव्हा तुम्ही आंबा खाता तेव्हा IGF1ची पातळी वाढते. ज्यामुळे अधिक पुरळ येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही मर्यादित प्रमाणात आंबा खाावा. त्याचबरोबर आंब्याचे सेवनासोबत आंब्याचा सरबत, आंब्याचा मिल्कशेक, अशा जास्त साखर असलेली आंबा स्मुदी आणि आमरस यांचे सेवन टाळा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangoes good for skin or not doctor advice how to eat mango snk