Manoj Bajpayee on being stereotyped as middle class : प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी त्यांच्या अष्टपैलुत्व आणि दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. बाजपेयी यांनी चित्रपटसृष्टीतील पुन्हा पुन्हा जाणवणाऱ्या रूढींबद्दल निराशा व्यक्त केली आहे. “द फॅमिली मॅन”सारख्या त्यांच्या सीरिज चांगल्या गाजल्या असूनही बाजपेयी यांना सहसा मध्यमवर्गीय किंवा निम्न-मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतील भूमिकाच दिल्या जातात. याबाबत बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, बाजपेयी यांनी सांगितले की, “श्रीमंत व्यक्तींच्या भूमिकेसाठी त्यांचा क्वचितच विचार केला जातो. तसेच त्यांनी या गोष्टीकडे लक्ष वेधले की, “श्याम बेनेगल हे अशा मोजक्या दिग्दर्शकांपैकी एक होते, ज्यांनी मला नेहमीच्या माझ्या प्रतिमेच्या पलीकडे जाऊन मी काय करू शकतो हे पाहिले. बेनेगल यांनी झुबेदामध्ये एक श्रीमंत माणूस आणि वीर-झारामध्ये राजकारणी म्हणून मला भूमिका दिली.”
“दिग्दर्शक माझा श्रीमंत व्यक्ती म्हणून भूमिकेसाठी विचार करत नाही: मनोज बाजपेयी
बाजपेयी यांनी सांगितले की, “२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या गुलमोहर चित्रपटापूर्वी २००१ मध्ये प्रदर्शित झालेला झुबेदा हा एकमेव चित्रपट आहे, ज्यामध्ये मी एका श्रीमंत व्यक्तीची भूमिका केली होती. तो श्याम बेनेगल यांचा माझ्यावरील विश्वास होता. खरे महाराज हे एखाद्या ग्रीक देवतेसारखे (Greek gods) दिसत नव्हते असे त्यांना वाटले. खरे महाराज हे सामान्य व्यक्तीसारखे दिसत होते. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या वीर-झारामध्ये मी पाकिस्तानामधील एका राजकारणी व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यात माझे दोन सीन होते आणि ते मीच करावे असेसुद्धा यश चोप्रा यांचे ठाम मत होते. २००३ मध्ये प्रदर्शित पिंजर चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी मला या भूमिकेसाठी निवडले.
बाजपेयींनी या भेदभावाचे श्रेय चित्रपट निर्मात्यांच्या त्यांच्या दिसण्याबद्दल आणि व्यक्तिमत्वाविषयीच्या आधीपासूनच मनात असलेल्या कल्पनांना दिले. “श्याम बेनेगल आणि यश चोप्रा यांसारख्या चित्रपट निर्मात्यांचा हा दृष्टिकोन त्यांना आयुष्य अगदी जवळून पाहिल्यानंतर मिळतो. माझा तसा श्रीमंत व्यक्ती म्हणून चित्रपट करण्याकडे कल नव्हता. मी ज्या भूमिका केल्या आहेत त्या मुख्यतः मध्यमवर्गीय आणि निम्न-मध्यमवर्गीय कथांवर आधारित होत्या. उच्च समाजातील भूमिकांसाठी माझा कधीच विचार केला जात नाही. मी उल्लेख केलेले दोन दिग्गज वगळता कोणताही दिग्दर्शक मला श्रीमंत माणूस म्हणून विचार करू शकत नाही, हा भेदभाव अस्तित्वात आहे,” यावर बाजपेयी यांनी जोर दिला.
मनोज बाजपेयी जाणवणाऱ्या भेदभावाची मूळ कारण काय? तज्ज्ञांनी केला खुलासा
या मुलाखतीमध्ये मनोज बाजपेयी यांच्या संभाषणातून जाणवणाऱ्या भेदभावाची मूळ कारणे समजून घेण्याचे महत्त्व ऑर्गेनाइजेशनल साइकोलॉजिस्ट, एक्झिक्युटिव्ह कोच प्रशिक्षक गुरलीन बरुआ यांनी अधोरेखित केले. द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना त्या म्हणाल्या की, “हे हानिकारक वर्तन आहे. आपण विरुद्ध समाज या मानसिकतेतून (us vs. them mentality) उद्भवते. असुरक्षितता आणि मनात खोलवर रुजलेल्या पूर्वग्रहांमुळे एखाद्या व्यक्तीच्या मनाच अशा भेदभावाची भावना निर्माण होते. भेदभावाचा सामना करणाऱ्या व्यक्तींना या हानिकारक वृत्तींचा फटका बसू शकतो.”
याबाबत बंगळुरू एस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या कन्सलटंट-साकायट्रिस्ट (Consultan -Psychiatrist) डॉ. दिव्या श्री के आर यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “बहुतेक वेळा जेव्हा एखाद्या व्यक्तीला नाकारले जाते, तेव्हा त्याला नकार का मिळाला हे समजून घेण्याऐवजी तो स्वतःच्या मनानेच नकाराचा अर्थ लावतो. आपला समाज कोणत्याही किमतीत यशाची कदर करत असल्याने हा समज चुकीचा नाही, पण त्यामुळे वारंवार नाकारले जाणे हळूहळू एखाद्याच्या मनात स्वतःला पराभूत करणारी गोष्ट तयार करू शकते. बहुतेक लोक जे यातून यशस्वीरित्या बाहेर पडले आहेत त्यांनी त्यांच्या कौशल्यात प्रभुत्व मिळवण्यासाठी लोकांची मतं जाणून घेण्यासाठी असे केले आहे. पण, ज्या समाजात विजेत्याला महत्त्व दिले जाते, त्या गोष्टी करण्यापेक्षा इतर गोष्टींना दोष देणे सोपे आहे.”
© IE Online Media Services (P) Ltd