Masaba Gupta | Mental health suffers due to beauty standards: लवकरच आई होणाऱ्या अभिनेत्री व डिझायनर मसाबा गुप्ताने आयुष्यात अनेकदा हेट कमेंट्सचा सामना केला आहे. तिला अनेकदा तिच्या स्किन आणि दिसण्यावरून ट्रोल केलं गेलंय. मसाबानं तिची आई नीना गुप्ता यांचा सल्ला आठवून पत्रकार फेय डिसूझाबरोबर संवाद साधताना पॉडकास्टच्या एका एपिसोडमध्ये असे शेअर केले की, अभिनय हा तिच्यासाठी नाही. कारण- इंडस्ट्रीला अपेक्षित असलेल्या ब्युटी स्टॅण्डर्ड्समध्ये ती फिट बसत नाही, असं तिला नीना यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं.
“ती म्हणाली की, भारतातील इंडस्ट्री नेहमीच एका विशिष्ट मार्गानं चालते आणि तसंही काही विशिष्ट चेहऱ्यालाच एक अभिनेता/अभिनेत्री म्हणून लोकांना पाहण्याची सवय झाली आहे. तुला नेहमीच आउट ऑफ द बॉक्स म्हणून गृहीत धरलं जाईल. तुला खूप कलात्मक समजलं जाईल; ज्यात बहुधा तुला व्हॅम्प रोल्स, निगेटिव्ह रोल्स किंवा सीडक्टिव्ह रोल्स मिळतील. ती म्हणाली की, जर तुला हिंदी फिल्ममध्ये हिरोईन म्हणून काम करायचंय, तर ते कधीच शक्य नाही. म्हणून हा विचार तू सोडून दे,” असं मसाबानं पॉडकास्टमध्ये सांगितलं.
मसाबानं असंही सांगितलं की, कोणताही फिल्टर न लावता एकदा तिनं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला व त्यानंतर तिच्या अॅक्ने स्कार्समुळे (मुरुमांचे व्रण/खड्डे) तिची तुलना ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्याशी करण्यात आली होती. “मी यात एक स्किन टिंट लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत होते आणि जर मी यावर फिल्टर लावला असता, तर माझा चेहरा ब्लर दिसला असता. त्यावरून कोणीतरी म्हणालं की, पण, तू एका मेकअप ब्रॅण्डबरोबर कशी काय काम करतेयस, तुझी स्किन तर ओम पुरींसारखी आहे.” ओम पुरींच्या अभिनयाशिवाय अन्य कोणत्याही गोष्टी लोकांनी त्यांच्याबद्दल का बोलाव्यात, असा तिला प्रश्नच पडला.
‘दॅट कल्चर थिंग’मधील व्यावसायिक मानसशास्त्रज्ञ व कार्यकारी प्रशिक्षक गुरलीन बरुआ म्हणतात, “सोसायटीच्या ब्यूटी स्टॅण्डर्ड्सवर आधारित सतत तुलना किंवा जजमेंट्सचा अनुभव घेतल्याने मानसिक आरोग्यावर अनेक दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. जेव्हा व्यक्ती सतत ब्यूटी स्टॅण्डर्ड्सच्या विरोधात स्वतःचे मोजमाप करत असते, तेव्हा तिच्यावर नकारात्मक मानसिक परिणाम होऊ शकतात.”
बरुआ खालील मानसिक आरोग्यावर परिणाम दर्शवतात
आत्मसन्मान कमी होणे (Chronic low self-esteem) : सोसायटीमधील ब्यूटी स्टॅण्डर्ड्सशी सतत तुलना केल्याने कायम अपुरेपणाची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे कालांतराने आत्मसन्मान कमी होऊ शकतो.
बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर (Body dysmorphic disorder) : जजमेंट आणि तुलनेमुळे काही व्यक्तींना त्यांच्या दिसण्यातील त्रुटींसह एक अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे संभाव्यतः शारीरिक डिसमॉर्फिक डिसऑर्डरचा त्रास होऊ शकतो.
नैराश्य आणि चिंता (Depression and anxiety) : दिसण्यावर आधारित सततच्या जजमेंटमुळे दीर्घकालीन तणाव येऊ शकतो; ज्यामुळे नैराश्य आणि चिंता यांसारख्या मानसिक आरोग्याच्या स्थिती निर्माण होतात. टीकेच्या भीतीने व्यक्तीला निराशा, दुःख आणि सामाजात मिसळण्यासारखे न वाटणे या भावनांचा अनुभव येऊ शकतो.
खाण्याचे विकार (Eating disorders): सोसायटी ब्यूटी स्टॅण्डर्ड्स बऱ्याचदा विशिष्ट शरीर प्रकारांना (body types) ‘आदर्श’ म्हणून प्रोत्साहन देते; ज्यामुळे लोक आहाराच्या चुकीच्या पद्धती निवडतात. या ब्यूटी स्टॅण्डर्ड्सचे पालन करण्याच्या प्रयत्नात व्यक्ती डाएटिंगचा अवलंब करू शकतात किंवा भूक लागली नसतानाही खाणे, जास्त खाणे अशा सवयी त्यांना लागू शकतात
समाजापासून दूर राहणे (Social withdrawal and isolation) : दिसण्यावर आधारित जजमेंटच्या भीतीने व्यक्ती समाजापासून दूर राहू शकते. त्यामुळे एकटेपणात राहणं वाढू शकतं आणि समाजाशी संपर्क तुटू शकतो.
टीकेचा सामना करताना व्यक्ती स्वत:मध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करू शकते?
आत्म-सहानुभूतीचा सराव करा : दिसण्यावरून नकारात्मक कमेंट्स आल्या तरी त्या व्यक्तीने स्वत:ला आठवून करून दिली पाहिजे की, कोणीही परिपूर्ण नाही.
नकारात्मक विचारांना आव्हान द्या : बऱ्याचदा कोणी टीका केली, तर ती मनातच राहते त्यामुळे तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात. म्हणून हे नकारात्मक विचार ओळखून, त्यावर त्यावर मात करणं खूप गरजेचं आहे.
वैयक्तिक मूल्ये आणि प्राधान्यक्रम सेट करा : स्वत:चे मूल्य हे बहुआयामी आहे हे ओळखल्याने बाहेरील स्वरूपापेक्षा अंतर्गत गुणांकडे लक्ष वळवण्यास मदत होऊ शकते. दयाळूपणा, सर्जनशीलता यांसारखी वैयक्तिक मूल्ये ओळखणे आणि त्यांना प्राधान्य देणे शिका.
सोशल मीडियाचा चांगला वापर: सोशल मीडियामधून ब्रेक घेणे, सकारात्मक कॉन्टेन्ट जास्त पाहणे किंवा सौंदर्याच्या विविध प्रतिनिधित्वांना प्रोत्साहन देणारे अकाउंट्स फॉलो केल्याने सोशल ब्यूटी स्टॅण्डर्ड्सचा जो समाजाने ठरवलेला प्रभाव आहे, तो कमी करण्यास मदत होऊ शकते.