Masaba Gupta Shared What She Eats In A Day : सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक, बॉलीवूडची फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता (Masaba Gupta) गरोदर आहे. मसाबा गुप्ता व सत्यदीप मिश्रा यांचे पहिले बाळ लवकरच या जगात येईल. यादरम्यान पायलेट्स (Pilates) एक्सरसाइज क्लासेस, नाश्ता, ओटभरणी (बेबी शॉवर) ते कामाच्या ठिकाणी उत्पादन सादर करण्यापर्यंत, मसाबा गुप्ता (Masaba Gupta) तिच्या गरोदरपणाच्या प्रवासाची झलक सुद्धा सोशल मीडियावर शेअर करते आहे. अलीकडेच मसाबा गुप्ताने गरोदरपणात दिवसभर ती कोणत्या कोणत्या पदार्थांचे सेवन करते याचा एक फोटो शेअर केला होता.

तर, मसाबा गुप्ता (Masaba Gupta) सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी उठते आणि एक ग्लास कोमट पाण्यात बडीशेप, जिरे घालून तिच्या दिवसाची सुरुवात करते. त्यानंतर सकाळी ९ वाजता एका वाडग्यात बर्चर मुसळी आणि त्यांच्यावर काही बेरी (bircher muesli topped with berries) टाकून त्याचे सेवन करते. नंतर ती वर्कआउट करते आणि प्रोटीन शेक म्हणून ताक पिते. मग ती दिवसाच्या मध्यात भिजविलेल्या शेंगदाणे खाते. त्यानंतर मग ती दुपारचे जेवण ती १ वाजता घेते. त्यात भात, बटाटा-भेंडी, चिकन करी, स्प्राउट सॅलड यांचा समावेश असतो. संध्याकाळी ५ वाजता ती स्नॅक म्हणून उरलेल्या भाज्या ब्रेडवर घालून त्यांचा आस्वाद घेते. तसेच मसाबा गुप्ता संध्याकाळी ७ वाजता चिकन किंवा मटनाचा रस्सा, दोन उकडलेली अंडी आदी पदार्थांच्या सेवनाने दिवसाचा शेवट करते.

तर, मसाबा गुप्ताने(Masaba Gupta) सेवन केलेलं पदार्थ गर्भवती स्त्रियांसाठी योग्य आहेत का, याचे कोणते फायदे स्त्रियांना होऊ शकतात? हे जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने चेन्नई येथील जीजी हॉस्पिटलच्या फर्टिलिटी ॲण्ड वूमेन्स स्पेशॅलिटी सेंटरच्या आहारतज्ज्ञ रेचेल दीप्ती यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, गर्भाचे पोषण कसे होते हे आईच्या आरोग्याची स्थिती, बाळांची संख्या, गर्भधारणेचे वय यांवर आधारित अन् अत्यंत वैयक्तिक स्वरूपाचे असते. या दिवसांमध्ये गर्भवती महिला त्यांच्या विशिष्ट पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी तज्ज्ञांकडून वैयक्तिक सल्ला घेणे गरजेचेआहे.

हेही वाचा…Milk With Salt : दुधात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्यास चेहऱ्याला खाज सुटते का? हा दावा खरा की खोटा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

पोस्ट नक्की बघा…

पोस्टमध्ये मसाबा गुप्ताने (Masaba Gupta) तिच्या संतुलित आहाराची एक झलक दाखवली; ज्यात धान्य, फळे, भाज्या, मांस, दुग्धजन्य पदार्थ, नट्स व आरोग्यदायी तेल यांचा समावेश आहे. पण, तिने कबूल केले की, हा तिचा दैनंदिन आहार नाही. कारण- ती ८०/२० नियमांचे पालन करते. इन्स्टाग्राम स्टोरीनुसार जरी ती संतुलित आहार घेत असली तरीही मसाबाने कबूल केले की, तिच्या क्रेविंग्सनुसार ती आहारातसुद्धा बदल करते.

गर्भधारणेदरम्यान आहाराच्या गरजा कशा बदलू शकतात?

गर्भधारणेदरम्यान प्रथिनांची गरज वाढते. पण, चांगल्या पोषणासाठी जटिल कर्बोदकांमध्ये प्रथिनांचे सेवन संतुलित करणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण धान्यातील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, अंडी, चिकन, मासे, मटण व ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् यांपासून मिळणारी उच्च गुणवत्तेची प्रथिने आणि नट्स, बिया व मासे यांनी युक्त असलेला आहार चांगले पोषण मिळवून देतो. हे संयोजन संपूर्ण गर्भधारणेदरम्यान आईचे आरोग्य आणि गर्भाच्या विकासाला समर्थन देते, असे रेचेल दीप्ती यांनी सांगितले आहे.

याउलट खराब पोषण असलेल्या स्त्रियांना गर्भधारणेत अतिशय लहान (SGA) गर्भ किंवा जन्मलेले बाळ वजनाने कमी (LBW) असणे असा धोका बाळंतपणात जास्त असतो. त्यामुळे संसर्ग, वाढ खुंटणे व प्रौढावस्थेत चयापचयाशी संबंधित समस्यांसह आरोग्यविषयक गुंतागुंत होऊ शकते. तसेच, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजारसुद्धा होऊ शकतात. त्याचप्रमाणे गरोदरपणात पौष्टिक नसलेल्या अन्नाच्या लालसेमुळे अनेकदा सूक्ष्म पोषक, मॅक्रोन्युट्रिएंट्सच्या दैनंदिन पौष्टिक गरजा पूर्ण होत नसल्याचे दिसून येऊ शकते. त्यामुळे आहारात अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने, प्रो-बायोटिक्स, फायबरसमृद्ध स्नॅक्सचा समावेश असणे गरजेचे आहे. त्यामुळे मिळणाऱ्या पोषणातून दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत होऊ शकते, असे रेचेल दीप्ती यांनी सांगितले आहे.

काही वैद्यकीय परिस्थितींमध्ये प्रोटीन पावडरचा पर्याय असला तरीही पुरेशा प्रथिनांचा समावेश असलेला आहार घेणे उपयुक्त ठरू शकते. तसेच ताक आणि जिरा-बडीशेपच्या पाण्यामुळे पचनास मदत मिळते. तसेच, आम्लपित्त आणि ब्लॉटिंग यांसारखी सामान्य गर्भधारणेत उद्भवणारी त्रासदायक लक्षणे दूर होऊ शकतात, असे रेचेल दीप्ती यांनी स्पष्ट केले आहे.