मधुमेह असणाऱ्या रुग्णांना हवामानातील बदलानुसार आरोग्याची काळजी घ्यावी लागते. विशेषतः हिवाळ्यात मधुमेहाचा त्रास वाढू शकतो. तसेच या रुग्णांना आहाराची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जेवणातील काही पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. हिवाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी ‘विटामिन डी’ असलेले अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. Diabetes.co.uk यांच्या मते हिवाळ्यात शरीरात विटामिन डी ची कमतरता झाल्यास इन्सुलिनचे उत्पादन कमी होते.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार ‘विटामिन डी’ शरीरात इन्सुलिन रेजिसटंन्स वाढवण्यात फायदेशीर ठरते. सुर्यप्रकाश ‘विटामिन डी’चा उत्तम स्रोत मानले जाते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना थोडावेळ उन्हात राहण्याचा आणि ‘विटामिन डी’ युक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी मशरूम हा उत्तम पर्याय आहे, कारण मशरूममध्ये भरपूर प्रमाणात ‘विटामिन डी’ आढळते. याचे फायदे जाणून घ्या.
‘जनरल ऑफ फंक्शनल फुड्स’मधील एका रिपोर्टनुसार मशरूम खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. अनेक पोषकतत्व असणाऱ्या या भाजीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, ज्यामुळे नैसर्गिकरित्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना मशरूम खाण्याचा सल्ला दिला जातो.
मशरूमचे आरोग्याला होणारे फायदे :
- हिवाळ्यात मशरूम खाल्ल्याने शरीराला ‘विटामिन डी’ बरोबर ‘विटामिन ए’ देखील मिळते. विटामिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.
- मधुमेहाच्या रुग्णांना वजन यंत्रणा ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मशरूम वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
- मशरूमला ‘लो स्टार्च’ भाजी म्हटले जाते, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
- मशरूम मेटाबॉलिजमसाठी उत्तम मानले जाते.
- मशरूममध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते, त्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांना हायड्रेट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)