how often you must wash innerwear: आपण नीटनेटकं दिसलं पाहिजे, राहण्यात टापटीपणा असावा असे आपण अनेक वेळा ऐकत आलो आहोत. या नियमांचं पालन अनेक जण करतातदेखील. काही लोक नियमित अंघोळ करतात, स्वच्छ कपडे परिधान करतात. मात्र, लोकांना दिसणारे कपडेच स्वच्छ ठेवले पाहिजेत का? आतल्या म्हणजेच अंतर्वस्त्रांच्या स्वच्छतेचे काय महत्त्व आहे? करोना काळ पाहिल्यानंतर आपण स्वच्छतेला अधिक प्राधान्य देऊ लागलो आहोत. खोकताना रुमाल वापरणे, सतत हात धुणे या क्रिया आपल्या सवयीचा भाग झाल्या आहेत. एकंदरीत काय तर आजकाल बरेच लोक स्वत:च्या स्वच्छतेकडे लक्ष देऊ लागले आहेत. असे असतानाही भारतात अजूनही स्वच्छतेशी संबंधित समस्या दिसून येत आहेत. खाण्यापिण्यापासून ते कपडे घालण्यापर्यंत बहुतेक लोक स्वच्छतेची काळजी घेत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. अंडरवेअरच्या स्वच्छतेबद्दल फारसं बोललं जात नाही. पण, स्वच्छतेविषयी तुम्ही किती जागरुक असायला हवं, हे नवी दिल्लीतील मदर्स लॅप IVF सेंटरच्या संचालक आणि वैद्यकीय स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शोभा गुप्ता यांनी या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. शोभा गुप्ता सांगतात की, पुरुषांनी अंतर्वस्त्र रोजच्या रोज धुतले पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा