रश्मी जोशी शेट्टी

हल्ली प्रदर्शित झालेला पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘ओ माय गॉड’ आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिला असेल. त्यातल्या शाळकरी मुलाला (विवेक) जो सगळ्या बाबतीत चांगला , चांगल्या कुटुंबातला , नृत्यात प्रवीण असलेला आपण पाहातो. बरोबरची मुलं त्याच्या सालसा डान्स मध्ये पार्टनर असणाऱ्या मुलीवरुन नाराज असतात. त्या मुलीच्या शाळकरी बॉयफ्रेंडला तिचं त्याच्याबरोबर डान्स करणं आवडत नाही आणि शिक्षकांना सांगून ती पार्टनर बदलते.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
delhi school bomb hoax
४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?

मग असे का झाले असेल असा प्रश्न जेव्हा विवेकला पडतो , तेव्हा त्याचे मित्र त्याला चिडवतात आणि सांगतात की याचं कारण तुझ्या जननेंद्रियाची साईज कमी आहे असं आहे. अश्लील हातवारे करून यावर चर्चा करून त्याला छळतात. त्यातच विवेक विचारात पडतो आणि आपल्या जननेंद्रीयाची साईज कमी असल्याचा त्यालाही वाटू लागतं. शिक्षकांना विचारू पाहातो तर ते रागावून त्याला निर्लज्ज म्हणून गप्प करतात. मग यावर उपाय म्हणून तो अनेक फसव्यांना बळी पडतो , उदास होतो आणि इतका स्वतः ला हरवतो की स्वतः बद्दल कमीपणा वाटून  आयुष्य संपवायचा निर्णय घेतो. या प्रकाराला बुलिंग करणे असे म्हणतात.

हेही वाचा >>>Health Special: अँटिबायोटिक्स निकामी होताहेत, सावधान !

बुलिंगच्या घटना सगळीकडे होतांना आपण पाहतो. मुलांचं बुलिंग म्हणजे एखाद्याला दरडावणे , चिडवणे , घाबरवणे , अश्लील शब्द वापरून अश्लील हावभाव करणे , शिव्या देणे होय. या सर्व गोष्टींचे खापर आपण मोबाईल वर फोडून मोकळे होतो. मोबाईलमुळे मुलं जास्तच बिघडत चालली असे आरोप सहज करतो आणि मुख्य मुद्दा बाजूलाच राहून जातो. सारख्या अशा घटनांमुळे मुलांचा आत्मविश्वास ढासळतो , आपण असंच डिझर्व्ह करतो अशी त्यांची भावना निर्माण होते, आत्मविश्वास ढासळतो आणि मग सुरू होतो बुलिंग ते ट्रॉमाचा प्रवास ! हे सगळे भीतीदायक आणि धक्कादायक आहे. पण पालकांचा “ बुरा ना मानो होली है ! “ चा दृष्टिकोण अशावेळी घातक ठरतो.

परवाच एका हळदीकुंकूच्या कार्यक्रमात एक पालक अतिशय कौतुकाने सांगत होते की आमचा बंटी एका मुलीला आंटी बोलला तर तिच्या आईचा  फोनच आला . मी म्हटलं , “तिला पण सांगा त्याला अंकल म्हणायला ! “ आपला मुलगा चुकीचं वागतो आहे याची जाणीवदेखील त्यांना नव्हती. अशातच एवढं तेवढं तर चालूच असतं ! थोड चिडवलेलं पण तुला सहन होत नाही ! मुलगा असूनही मुलींसारखे वागतोस ! काय काकूबाईसारखी वागते ? तूच काहीतरी केलं असशील ! लक्ष देऊ नको ! असे सल्ले आपण देतो.

हेही वाचा >>>Mental Health Special: रील्स करतंय रिअल आयुष्य खराब

मुलांना घराबाहेर अनेक स्वभाव , शरीरप्रकृती , गुंडप्रवृत्तीचा सामना करावा लागतो. तेव्हा मुलं काही बोलत असतील तर त्या गोष्टीकडे टाळाटाळ न करता किंवा उलटा समज न देता त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बुलिंग सारख्या परिस्थितीत बघे पालक न होता पीडितांच्या पालकांना साथ द्यायला हवी. योग्य नियमावली ठरवून गुन्हेगाराला ऐकून घेऊन तो किंवा ती असे का वागले याची पडताळणी शिक्षक आणि समुपदेशकांनी करावी. गुन्हेगार नकारात्मक गोष्टींचा सामना करत असेल आणि त्याचा परिणाम म्हणून असे वागत असेल तर त्याला पालकांसमवेत समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ञांकडे मार्गदर्शनासाठी पाठवावे.

बुलिंगला बळी पडलेली मुलं आत्मविश्वास घालवून बसतात. त्यांना उदासीनता, भीती वाटणे, शाळेतील परफॉर्मन्स आणि टक्केवारी खालावणे अशा अनेक गोष्टी सतावू शकतात. तेव्हा समजावून ही लक्षणे कमी होत नसल्यास कॉग्निटिव बिहेवियरल थेरेपीच्या माध्यमातून त्यांची मदत करता येते. मानसोपचार तज्ञांची भूमिका यात महत्वाची असते.

बुलिंगची समस्या कायद्याला आव्हान देणारी असेल उदाहरणार्थ एखाद्याचा लैंगिक छळ यातून झाला किंवा तीव्र शारीरिक , वित्तीय किंवा मानसिक इजा कोणाला झाली तर जुवेनाइल जस्टिस एक्ट च्या अन्वये त्याचे बळी पडलेल्या मुलांना केअर आणि प्रोटेक्शन मिळते आणि  गुन्हेगार ( चिल्ड्रेन इन कॉन्फ़्लिक्ट विथ लॉ ) मुलांना आब्जर्वेशन होम मधे ठेवून त्यांचे समुपदेशन केले जाते . शाळेची अब्रू वाचवण्यासाठी शिक्षकांनी अशी प्रकरणे दाबू नये . शिवाय पालकांनी ही याबाबत जागरूक राहाणे महत्वाचे आहे . मूल्यशिक्षणात वाचन , लेखन , गणन याचा समावेश असावा . ध्यान , प्राणायाम , सूर्यनमस्कार शालेय जीवनात समाविष्ट करणे महत्वाचे आहे . मुलांमध्ये आणि पालकांमध्ये बुलिंग बद्दल जागरूकता निर्माण करणेही आवश्यक आहे .

Story img Loader