मुक्ता चैतन्य

इमेल, समाज माध्यमांमधील अकाउंट्स, ऑनलाईन किंवा फोन बँकिंग अशा सगळ्याच ऑनलाईन व्यवहारांमध्ये पासवर्ड हा अतिशय महत्वाचा घटक असतो आणि त्याकडे बहुतेकदा दुर्लक्ष केलं जातं. पासवर्ड क्रॅक करणारी टूल्सही आता बाजारात आहेत आणि हॅकर्स या सगळ्याच गोष्टींचा वापर करत असतात. तरीही आपण आपल्या बाजूने जास्तीत जास्त योग्य पासवर्ड ठेवणं आवश्यक असतं. म्हणूनच पासवर्ड कसा हवा आणि काय टाळलं पाहिजे हे समजून घेऊया.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट
Supriya Sule asked why the investigative agencies are misusing power
सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांचा ससेमिरा कशासाठी; सुळे यांचा सवाल
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक

या गोष्टी लक्षात ठेवा

१) पासवर्ड चटकन ओळखता यायला नको. यासाठी त्यात स्वतःच्या, जोडीदाराच्या, मुलांच्या जन्मतारखा, लग्न दिवसाची तारीख, पॅन आणि आधाराचे नंबर, मोबाईल नंबर या गोष्टी असता कामा नयेत.

२) पासवर्ड जितका विचित्र तितका चांगला.

३) पासवर्डमध्ये नेहमी स्मॉल आणि कॅपिटल लेटर, आकडे आणि चिन्ह (कॅरेक्टर्स) असायला हवीत.

४) पासवर्ड दर काही दिवसांनी, महिन्याने बदलला पाहिजे.

५) अनेकदा लक्षात राहावा यासाठी पासवर्ड प्रेडिक्टेबल केला जातो. पण आजच्या काळात खरंतर पासवर्ड लक्षात ठेवण्याचीही गरज नाही. मिनिट भरात पासवर्ड पुन्हा तयार करण्याच्या सोयी आज सगळीकडे आहेत. फरगॉट पासवर्ड केलं की तो रीजनरेट करता येतो. त्यामुळे लक्षात राहावा यासाठी सोपा, नाव, जन्मतारखा असलेला पासवर्ड करण्याची गरज नाही.

६) बहुतेक साईट वर टू टाईप व्हेरिफिकेशन असतं. म्हणजे दोन पासवर्ड असतात. ती सेवा वापरली पाहिजे. त्यामुळे आपलं अकाउंट अधिक सुरक्षित होतं.

७) पासवर्ड कधीही कुणाशी शेअर करायचा नाही.

८) अनेकदा तरुण तरुणींमध्ये पासवर्ड शेअरिंग आणि प्रेम याची गल्लत केली जाते. एकमेकांवर प्रेम आहे म्हणजे पासवर्ड्स शेअर केलेच पाहिजेत अशी कल्पना असते. पण ती चूक आहे. प्रेम आणि विश्वास असण्याचा आणि पासवर्ड शेअर न करण्याचा एकमेकांशी संबंध नाही. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याची जाणीव आणि भान दोघांनी राखणं आवश्यक आहे.

९) कुठलीही बँक, कंपनी कधीही कुठलाही पासवर्ड मागत नाही. कुणी जर अशी मागणी करत असेल तर तो धोका आहे हे समजून जावं.

१०) समजा तुमचा पासवर्ड हॅक झालाच तर तो ताबडतोब बदलून, जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क केला पाहिजे.

पासवर्ड एका अर्थाने आपल्या डिजिटल जगाचं प्रवेशद्वार आहे. त्यामुळे त्यावर हल्ला होऊ नये यासाठी काळजी घेतलीच पाहिजे.