मुक्ता चैतन्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलांना मोबाइल वापरासाठी काही नियम असावेत की असू नयेत? आणि ते नियम पालकांनी बनवावेत की मुलं आणि पालक यांनी एकत्रितपणे बनवावेत? या दोन्ही प्रश्नांशी डिजिटल माध्यम शिक्षण जवळून संबंधित आहे. मुलांच्या मोबाईलला आपण नियम कशासाठी लावतो आहोत, त्याचे फायदे तोटे काय, मुलांचं त्याविषयी काय म्हणणं असू शकतं या कशाचाही विचार न करता नियम लावणं म्हणजे एकप्रकारे पालक झाल्यामुळे मिळालेल्या सत्तेचा गैरवापर आहे. आपल्याला मुलांची काळजी असणं आणि आपण हुकूम गाजवणं या दोन गोष्टी अतिशय वेगळ्या असतात. आज घरा- घरातून मोबाईलला घेऊन पालक आणि मुलं यांच्यात भांडणं होताना दिसतात कारण, हातातल्या मोबाईलविषयी आणि इंटरनेटच्या प्रचंड मोठ्या विश्वाविषयी संवाद नाहीए.

आपली मुलं म्हणजे जेन झी आणि जेन अल्फा जन्माला आल्यापासून मोबाईल वापरत आहेत. त्यांनी मागणी करो अथवा न करो; आपण त्यांना मोबाईल देतोच. अगदी रांगणारी असतात; तेव्हा खेळण्यातले, निरनिराळे आवाज करणारे मोबाईल; मग तीन-चार वर्षांची झाली की आपल्या स्मार्टफोनसारखं दिसणारं फोनमॉडेल देतो. मुलाच्या हातात कधी एकदा त्याचा स्वतःचा टॅब / मोबाईल / लॅपटॉप देतोय असं अनेक पालकांना झालेलं असतं. आपलं मूल टेक्नो सॅव्ही आहे हे दाखवण्याची धडपड एकीकडे असते तर, दुसरीकडे मुलांना लहान वयापासून ही गॅजेट्स दिली नाहीत तर ती मागे पडतील ही पालकांच्या समूहातून निर्माण झालेली अवास्तव भीती असते.

हेही वाचा : Health Special: उपवास (लंघन) का करावा?

नेटवरचा मुलांचा संचार आपल्याला वाटतो त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त आणि वेगवान आहे. करोना महासाथीनंतर मुलांचा अॅव्हरेज स्क्रीन टाईप ८ तासांच्या आसपास आहे. आणि मुलांचं नेटवरचं आईबाबांसाठी दाखवायला एक विश्व असतं आणि पालकांना अज्ञात असं मुलांचं स्वतःचं एक विश्व असतं. या गोष्टी १० ते १३ वयोगटातhttps://www.loksatta.com/lifestyle/health-tips/why-one-should-have-fast-what-are-the-health-benefits-hldc-dvr-99-3874625/ली मुलंमुलीही करतात; कारण मुळात इंटरनेट हे प्रचंड स्वातंत्र्य देणारं माध्यम आहे. हे बघा आणि हे बघू नका याची बंधनं जिथे मोठ्यांना नको असतात; तिथे ती लहान मुलांना का हवीशी वाटतील? त्यामुळे मुलांच्या ऑनलाईन जगातही ‘खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे’ हा प्रकार असतोच.

मुलांपर्यंत काय पोहोचतं, कसं पोहोचतं यावर पालकांना वाटतं तितकं त्यांचं नियंत्रण राहात नाही. यासाठीच डिजिटल माध्यमांचं शिक्षण आवश्यक आहे. आपण सगळे तंत्रज्ञान वापरायला शिकलो आहोत म्हणजे आपण तांत्रिक शिक्षित आहोत पण, आपण माध्यम शिक्षित नाही. तंत्रज्ञानापासून मुलांना दूर ठेवावं असं कुणाचं म्हणणं नाही; पण मुलांना त्यांची स्वतःची गॅजेट्स कधी द्यावीत, त्याबद्दल काही नियम असावेत का, याचा विचार पालकांनी करणं आवश्यक आहे. मुलांच्या हातांत त्यांचे स्वतःचे मोबाईल, टॅब आणि लॅपटॉप देणं हा काही ‘स्टेटस सिम्बॉल’ असू शकत नाही; ना ती आम्ही किती आधुनिक म्हणून मिरवण्याची गोष्ट आहे. मुलांच्या हातांत या गोष्टी देणं ही एक मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव पालकांना असणं आवश्यक आहे, त्यांनी ती मुलांपर्यंत पोहोचवणं हेही तितकंच जबाबदारीचं काम आहे. ही जबाबदारी स्वीकारली गेली पाहिजे.

हेही वाचा : Health Special: आठवणीनेही वाटणारी हालचालींची वेदनादायी भीती कशी टाळता येईल?

मुलांना मोबाईल कधी द्यावा याविषयी बरीच मतमतांतरं आहेत. तसंही मुलं जन्माला आल्यापासून आईबाबांचा फोन वापरतच असतात; पण त्यांना स्वतःचा फोन कधी द्यावा याबाबत पालकांमध्ये मतभिन्नता दिसून येते. सर्वसाधारपणे आपल्याकडे तरी मुलांना सातवी-आठवीनंतर मोबाईल फोन मिळतो. तो देताना किती पालक त्याच्या वापराबद्दल मुलांशी बोलतात? बऱ्याचदा नाही. कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात. त्या दोन्ही बाजू मुलांना सांगितल्या गेल्या पाहिजेत… जेणेकरून मोबाईलसारख्या अत्यंत नादावून टाकणाऱ्या गोष्टीच्या आहारी न जाता, मुलं त्याचा ‘स्मार्ट’ वापर करायला शिकतील. पालकांनी नियम बनवायचे आणि मुलांनी फॉलो करायचे असं आजच्या काळात होऊ शकत नाही. त्यामुळे मुलांच्या हातांत मोबाईल देताना आपण मुलांबरोबर चर्चा करुन, संवाद साधून काही नियम ठरवू शकतो. उदा. काही नियम मी तुम्हाला सांगते, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल आणि तुम्ही तुमची नियमावली मुलांशी बोलून बनवू शकाल.

हेही वाचा : Health Special: वेदनेचे प्रकार किती? ती कशी जाणवते?

१. फोनचा पासवर्ड पालकांना माहीत असायला हवा.
२. रोज रात्री नऊ वाजता फोन स्विच ऑफ झाला पाहिजे. वीकएण्डला फोन रात्री दहापर्यंत मिळेल, त्यानंतर बंद करायचा.
३. फोन घेऊन शाळेत जायचं नाही. मित्रमैत्रिणींना टेक्स्ट मेसेजेस करण्यापेक्षा त्यांच्याशी प्रत्यक्ष जाऊन बोला. गप्पा मारा. त्यात वेगळी गंमत आहे आणि माणसांशी प्रत्यक्ष संवाद साधणं ही एक कला आहे; जी शिकली पाहिजेस, असं आम्हांला वाटतं असं तुम्ही मुलांना सांगू शकता.
४. या फोनचा वापर करून तू कुणाशीही काहीही खोटं बोलणार नाहीस, कुणाचाही अपमान होईल, कुणीही दुखावलं जाईल असं काहीही तू करणार नाहीस. कुणालाही सायबर बुली किंवा ट्रोल करणार नाहीस.
५. या फोनमुळे इंटरनेट तुझ्या हातांत येणार आहे…लैंगिकतेबद्दल तुला काही प्रश्न असतील; तर ते तू थेट आम्हाला विचार. आम्ही तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ असंही मोकळेपणाने मुलांना सांगू शकता.

हेही वाचा : Health Special: (आतड्यांचा) ‘आतला आवाज’ म्हणजे काय?

यात एक गोष्ट लक्षात घ्या, नियम फक्त मुलांना असतील तर त्याचं उपयोग होत नाही. काही नियम संपूर्ण कुटुंबासाठी हवेत, तरच कुटुंबाचाही स्क्रीन टाईम कमी व्हायला मदत मिळू शकते. तसंच अशी नियमावली बनवल्यानंतरही मुलं नियम तोडणार आहेत, त्यांच्या मनाला येईल तसं वागणार आहेत. त्या प्रत्येकवेळी त्यांच्या अंगावर न ओरडता नियमावली समोर ठेऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. नियम का तोडले, का तोडावेसे वाटले, त्यामुळे काय झालं याच्या चर्चेतूनच त्यांच्यात माध्यम वापरायचं भान विकसित होईल. या माध्यम शिक्षणाची आज आपल्याला सर्वाधिक गरज आहे.