“माझा मुलगा मला घाबरत नाही. आम्ही मित्रांसारखे आहोत,” असे अभिनेता अजय देवगण यांनी ‘द रणवीर शो पॉडकास्ट’मध्ये सांगितले. किशोरवयीन मुलाच्या डेटिंगच्या चर्चांपासून त्याला योग्य मर्यादा समजावून देण्याच्या त्यांच्या पद्धतीपर्यंत, त्यांनी पालकत्वाचे अनुभव शेअर केले.

तुमचा मुलगा सध्या कुणाला डेट करीत आहे, असे जेव्हा विचारले तेव्हा देवगणने उत्तर दिले, “माझा मुलगा जवळपास १४ वर्षांचा आहे. त्यामुळे लवकरच तो डेटिंग सुरू करेल; पण तो माझ्याबरोबर मोकळेपणाने चर्चा करतो.”

dhananjay munde karuna sharma Controversy
Karuna Munde: ‘वाल्मिक कराडचा मुलगा कोट्याधीश, पण धनंजय मुंडेंचा मुलगा बेरोजगार’, करुणा मुंडेंनी मुलाबाबत का सांगितलं?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Baba abuses young girl on the name of treatment touches badly in front of her parents shocking video viral
“आई वडिलांना पोटच्या मुलीचा त्रास कळत नाही?” उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाचा तरुणीला अश्लील स्पर्श! VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
Shivraj Rakshe Mother Said This Thing
Shivraj Rakshe : शिवराज राक्षेच्या आईचा सवाल, “पंचांवर कारवाई का नाही? त्यांनी माझ्या मुलाला शिवीगाळ केली आणि…”
Crime News
Kolkata Crime : वडिलांच्या प्रेयसीची अल्पवयीन मुलाकडून हत्या, बापाचे विवाहबाह्य संबंध शोधण्यासाठी केला GPS चा वापर
papad selling boy viral video
“परिस्थिती नाही संस्कार महत्त्वाचे” पापड विक्रेत्या मुलाचे ‘ते’ शब्द ऐकून तुम्हीही कराल पालकांचे कौतुक
Sanjay Mone
“आमचे मोने बाबा…”, मयुरी देशमुख ज्येष्ठ अभिनेते संजय मोनेंबाबत म्हणाली, “मोठ्या लोकांचा मोठेपणा…”
Kaun Banega Crorepati loksatta article
अग्रलेख : कौन बनेगा…?

तसेच मुलांना योग्य वयात योग्य मर्यादांची जाणीव करून देणे किती महत्त्वाचे आहे हे देखील अजयने स्पष्ट केले. तो म्हणाला, “मी त्याला समजावून सांगतो की, कोणत्या वयात, कोणत्या मर्यादा पाळायच्या आणि त्याला त्या मर्यादा समजतात.”

पालक जेव्हा मुलांना जास्त बंधनात न ठेवता, प्रामाणिकपणे आणि मित्रासारखे वागतात तेव्हा किशोरवयीन मुलांसाठी डेटिंग आणि नातेसंबंधांबद्दलची प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सुरक्षित जागा निर्माण होते.

हेही वाचा –वजन कमी करताय? मग सकाळच्या नाश्त्यामध्ये चहा आणि टोस्ट खाणे टाळा; का ते घ्या जाणून तज्ज्ञांकडून…

u

किशोरवयीन मुलांसाठी नातेसंबंध आणि डेटिंगबद्दल खुलेपणाने चर्चा करण्यासाठी सुरक्षित आणि स्वागतार्ह वातावरण तयार करणे (Creating a safe and welcoming environment for teenagers to discuss relationships and dating openly)

याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि फोर्टिस हेल्थकेअरमधील मानसिक आरोग्य व वर्तणूक विज्ञान विभागाच्या मेंटल हेल्थच्या प्रमुख कामना छिब्बर सांगतात, “लहानपणापासूनच मुलांबरोबर मोकळेपणानं संभाषण करणं सर्वांत महत्त्वाचं आहे; जेणेकरून मुलांना योग्य विचारशक्ती आणि दृष्टिकोन विकसित करण्यास मदत होते.

याव्यतिरिक्त त्या नमूद करतात,”तर्क किंवा दृष्टिकोन न मांडताच फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ असं उत्तर देण्याऐवजी पालकांनी त्यांच्या विचारांची कारणं स्पष्ट करावीत. त्यामुळे मुलांना स्वतः विचार करण्याची सवय लागते; जेणेकरून तुमचं मूलदेखील योग्य पद्धतीनं विचार करण्याची क्षमता विकसित करू शकेल.”

हेही वाचा – आठवड्यातून दर चार तासांनी २० मिनिटांची डुलकी घेतल्यास शरीरावर काय परिणाम होतो?

सुरक्षितता आणि चुकांबाबत सकारात्मक दृष्टिकोन (Positive attitude towards safety and mistakes)

मुलांना चुका करण्यासाठी सकारात्मक वातावरण मिळालं, तर ते पालकांसमोर मोकळेपणानं आपले अनुभव मांडतात. मोठ्या प्रमाणावर शिक्षा किंवा नकारात्मक प्रतिक्रिया दिल्यास मुलं घाबरून जातात. “सुरुवातीपासूनच त्यांना संयमानं आणि दयाळू भाव ठेवून चुका सांगा; जेणेकरून त्यांना पालकांसमोर व्यक्त होण्याची भीती वाटणार नाही.”

योग्य वयात मर्यादा कशा लावायच्या?(Effective ways for parents to introduce age-appropriate boundaries and limitations)

छिब्बर सल्ला देतात, “सीमा आणि मर्यादा लवकर ओळखल्या पाहिजेत. सुरुवातीला परवानगी देणं आणि नंतर त्या काही गोष्टींसाठी नकार दिल्यानं संघर्ष होऊ शकतो. लहानपणापासूनच मर्यादा आणि मूल्यशिक्षण द्या. तुमच्या मुलाच्या समवयस्क गटातील किंवा आसपासच्या उदाहरणाचा उपयोग करून, मुलांशी संवाद साधा. मुलांना त्यांची जबाबदारी आणि त्यांसंबंधित मर्यादाही समजावून सांगा.”

हेही वाचा –अंतराळवीरांना अंतराळात उत्साही अन् तंदुरुस्त राहण्यासाठी किती कॅलरीज आवश्यक आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

मित्र आणि अधिकारी व्यक्तीच्या भूमिकांमध्ये संतुलन साधणे (Balancing the roles of friend and authority figure)

पालकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, मुलांबरोबर मैत्री निर्माण करणे म्हणजे मुलांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप न करता मुलांना त्यांच्या चुका करण्याची आणि त्यातून शिकण्याची संधी द्या. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड होणार नाही ना, याची खात्री करा.

मुलांबरोबर संवाद साधण्यासाठी शांतपणे वागणे आणि संयम राखणे महत्त्वाचे आहे. खूप नकारात्मक किंवा धक्कादायक प्रतिक्रिया देणे टाळा. खूप कठोरपणे वागणे टाळा; परंतु आवश्यक असेल तेव्हा मर्यादा ठरवा. मुलांना त्यांचा दृष्टिकोन निवडण्यास आणि तो तयार करण्याची परवानगी द्या. जरी त्या दृष्टिकोनाचा अर्थ चुकला असेल; पण सुरक्षितता किंवा त्यांना स्वत:साठी विकसित करणे आवश्यक असलेल्या इतर आवश्यक मूल्यांबद्दल मर्यादा तयार करण्यामध्ये चांगला समतोल ठेवा.

हेही वाचा – सेट डोसा हा बेन्ने डोसापेक्षा वेगळा कसा आहे? कोणता डोसा आहे आरोग्यदायी? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…

विश्वास निर्माण करण्यासाठी धोरणे ठरवा; जेणेकरून मुलांना त्यांच्या पालकांकडे सल्ला घेणे सोईस्कर वाटेल (Strategies for building trust so that teens feel comfortable coming to their parents for advice)

छिब्बर अधोरेखित करतात, “पालकांनी हे ओळखले पाहिजे की, ते कधी कधी त्यांच्या मुलांच्या दृष्टीने ‘वाईट व्यक्ती’ असू शकतात. “पण, जर पालक त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तयार असतील आणि कठोर वागण्याऐवजी त्यांच्याशी संयमाने वागले, तर मुलांना त्यांच्याकडे येणे अधिक सोपे जाते.”

मोठ्या प्रतिक्रिया, जसे की धक्का किंवा तिरस्काराच्या अभिव्यक्ती, मुलांना उघडपणे सांगणे त्यांना पालकांशी मोकळेपणाने संवाद साधण्यापासून परावृत्त करू शकतात. प्रतिसादांना शांत आणि संयमाने उत्तर दिल्यास मुलांना पालकां काय म्हणतील याची भिती न बाळगता मोकळेपणाने बोलू शकतील.

Story img Loader