Every Salt And Sugar Brand In India Has Microplastics : आजकाल लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढत आहे. गंभीर आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, लोक आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्येही चांगले बदल करीत आहेत. अनेकांनी आपल्या जेवणातील मीठ अन् साखरेचे प्रमाणही कमी केले आहे. अशात साखर आणि मिठाशी संबंधित एक धक्कादायक अहवाल समोर आहे, ज्याबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही चिंता वाटेल.

आयोडीनयुक्त मीठ आणि उत्तम दर्जाची साखर विकण्याचा दावा करणाऱ्या बाजारातील नामांकित कंपन्या तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. आयोडीनयुक्त मीठ आणि उत्तम दर्जाची साखर विकण्याचा दावा करणाऱ्या बाजारातील नामांकित कंपन्या तुमच्या आरोग्याशी खेळत आहे.

सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
nashik hotel gun on servant
नाशिक : हॉटेलमधील नोकरावर बंदूक रोखणाऱ्या पोलिसाचे निलंबन ?
Drugs worth Rs 44 lakh seized in Katraj area one arrested by anti-narcotics squad
कात्रज भागात ४४ लाखांचे अमली पदार्थ जप्त, अमली पदार्थ विरोधी पथकाकडून एकाला अटक
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा, काय होऊ शकतात याचे परिणाम?

साखरेच्या नावाखाली खाताय प्लास्टिक

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तुम्ही खात असलेल्या साखर आणि मिठामध्ये प्लास्टिकचे छोटे कण म्हणजेच मायक्रोप्लास्टिक्स (मीठ आणि साखरेमध्ये आढळणारे मायक्रोप्लास्टिक्स) असतात. टॉक्सिक्स लिंक या थिंक टँक टॉक्सिक्स लिंकने याबाबत एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार आपण साखर आणि मिठामधून हळूहळू प्लास्टिक खात आहोत.

अहवालात पुढे नमूद केले आहे की, बाजारात विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेच्या जवळपास सर्व ब्रॅण्डमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आहेत. सर्वांत चिंतेची बाब म्हणजे आयोडीनयुक्त मिठामध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण सर्वाधिक असते. हे बहुरंगी मायक्रोप्लास्टिक पातळ तंतू आणि पडद्याच्या स्वरूपात असते.

मिठाच्या विविध प्रकारांवर केले अभ्यास

या अभ्यासासाठी टॉक्सिक्स लिंकने १० सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या मिठाचे नमुने घेतले, ज्यात रॉक मीठ, टेबल सॉल्ट, समुद्री मीठ, तसेच कच्चे मीठ अशा सुमारे १० प्रकारच्या मिठाचा समावेश करण्यात आला होता, तसेच पाच प्रकारच्या साखरेचाही समावेश करण्यात आला होता.

त्यासाठी त्यांनी स्थानिक बाजारातून सर्व मोठ्या ब्रॅण्डचे मीठ आणि साखर खरेदी केली. या अभ्यासादरम्यानच्या तपासणीत साखर आणि मिठात १ मिमी ते ५ मिमी आकाराचे मायक्रोप्लास्टिक आढळले.

अनेक रंगांचे हे प्लास्टिक

टॉक्सिक्स लिंकचे संस्थापक संचालक रवी अग्रवाल आणि सहयोगी संचालक सतीश सिन्हा यांनीही याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, सुप्रसिद्ध ब्रॅण्डच्या साखर आणि मिठातही मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण जास्त आहे, ही चिंताजनक बाब आहे आणि त्यामुळे कॅन्सरसोबत इतर अनेक आजार होतात.

ते म्हणाले की, मीठ आणि साखरेमध्ये मायक्रोप्लास्टिकचे अस्तित्व तंतू, गोळ्या, पातळ पडदा व तुकडे या स्वरूपात आढळून आले. हे प्लास्टिक आठ रंगांचे होते. या रंगांमध्ये पारदर्शक, पांढरा, निळा, लाल, काळा, जांभळा, हिरवा व पिवळा यांचा समावेश आहे. सेंद्रिय साखरेच्या नमुन्यांमध्ये त्याचे प्रमाण अत्यल्प आढळून आले.

ते पुढे म्हणाले की, मायक्रोप्लास्टिक आरोग्य आणि पर्यावरण दोन्हींसाठी धोकादायक आहे. मायक्रोप्लास्टिक्स हानिकारक रसायने सोडतात; ज्यामुळे व्यक्तीला प्रजनन विकार आणि कर्करोग होतो. हे प्लास्टिकचे कण अन्न, पाणी आणि हवेतून शरीरात पोहोचतात. मायक्रोप्लास्टिकमुळे फुप्फुसाची जळजळ, कर्करोग, हृदयविकाराचा झटका, लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिरोध, वंध्यत्व इत्यादींचा धोका वाढतो.

याच विषयावर दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काही डॉक्टरांनी आपले मत सांगितले आहे ते जाणून घेऊ…

तुम्ही दीर्घकाळ मायक्रोप्लास्टिक्सचे सेवन केल्यास काय होते?

दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिन विभागातील लीड कन्सल्टंट डॉ. नरेंद्र सिंग यांनी प्लास्टिकच्या या लहान कणांचे सेवन केल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो हे स्पष्ट केले आहे.

जेव्हा मायक्रोप्लास्टिक्स शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. हे कण इतके लहान आहेत की, ते सहज शरीरात प्रवेश करतात आणि कालांतराने शरीरात जमा होऊ शकतात. अशाने काही आजारांचा धोका वाढतो.

१) जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण

मायक्रोप्लास्टिक्समुळे शरीराच्या ऊतींमध्ये जळजळ होऊ शकते. जेव्हा हे कण शरीरात असतात, तेव्हा ते रोगप्रतिकारक प्रतिक्रिया उत्तेजित करतात आणि त्यामुळे जळजळ व ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढतो. कालांतराने यामुळे पेशी आणि उतींचे नुकसान होऊ शकते. संभाव्यत: दीर्घकालीन स्थिती निर्माण होऊ शकते.

२) रोगप्रतिकार शक्तीवर ताण

मायक्रोप्लास्टिक्सच्या सतत संपर्कामुळे रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते. त्यामुळे शरीर विविध आजारांनी संक्रमित होण्याची अधिक शक्यता असते. कारण- रोगप्रतिकार शक्ती सतत प्लास्टिक कणांशी सामना करीत असते.

३) जुनाट आजारांचा वाढेल धोका

मायक्रोप्लास्टिक्सच्या दीर्घकाळ संपर्कामुळे कर्करोग, प्रजनन समस्या व न्यूरोलॉजिकल विकारांसह गंभीर आरोग्य परिस्थितीशी तुम्ही जोडले जाऊ शकता. हे कण हार्मोनचे संतुलन, सेल्युलर प्रक्रिया आणि अगदी जीन अभिव्यक्तीमध्ये व्यत्यय आणू शकतात. त्यामुळे जुनाट आजार होण्याचा धोका वाढतो.

४) गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिस्ट्रेस

​​मायक्रोप्लास्टिक्सचे सेवन केल्याने जठररोगविषयक समस्या उद्भवू शकतात, जसे की सूज येणे, अस्वस्थता आणि आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. शरीर प्लास्टिक कणांवर प्रक्रिया करण्याचा आणि काढून टाकण्याचा प्रयत्न करीत असताना ही लक्षणे उद्भवू शकतात.

Story img Loader