Migraine Relief Trick Soaking Feet In Hot Water : मायग्रेन म्हणजे डोकेदुखी, जी जगभरातील लाखो लोकांना त्रास देते आहे. या समस्येचं निराकरण करण्यासाठी अनेक उपाय आणि उपचार आहेत. त्यामधलाच एक उपाय म्हणजे (Migraine Relief Trick) गरम पाण्यात पाय भिजवणे हा आहे, ज्यामुळे काही लोकांना आराम मिळू शकतो. डॉक्टर मायरो फिगुरा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या रीलमध्ये एका महिलेने दावा केला आहे की, “मला नुकतेच कळले की जर तुम्हाला मायग्रेन झाला असेल आणि तुम्हाला त्यातून लवकर सुटका हवी असेल, तर तुम्हाला सोयीस्कर वाटेल असं पाणी गरम करून त्यात तुमचे पाय बुडवा. यामुळे तुम्हाला आराम मिळण्यासाठी मदत होऊ शकते’, तर या दाव्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने बंगळुरूच्या सर्जापूर रोड येथील मणिपाल हॉस्पिटलचे न्यूरोलॉजी, एपिलेप्टोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार, हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर शिव कुमार आर यांच्याशी चर्चा केली.

डॉक्टर शिव कुमार म्हणतात की, ही पद्धत (Migraine Relief Trick) पायांमधील रक्तवाहिन्या वाढवण्याचे काम करते, ज्यामुळे रक्त डोक्यापासून पायांकडे जाण्यास मदत होते आणि यामुळे मायग्रेन वेदना (डोकेदुखी) कमी होते. कॉमन (सामान्य) मायग्रेन उपचारांमध्ये वेदना कमी करणारे कोल्ड कॉम्प्रेस, हायड्रेशन, विश्रांती यांचा समावेश आहे. काही लोकांना ध्यान किंवा योग यांसारख्या विश्रांतीद्वारेदेखील आराम मिळतो. पण, गरम पाण्यात पाय भिजवल्याने काही लोकांना आराम मिळत असला तरीही ते डॉटरांनी दिलेले औषध किंवा इतर उपचारांप्रमाणे अधिक प्रभावी नसू शकतात.

eating egg whites is not good for you
Eating Egg Whites Healthy Or Not : फक्त अंड्यातील पांढरा भाग खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांनी मांडली मते…
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
This is what happens to the body when you consume expired biscuits
एक्सपायरी डेट संपल्यानंतर बिस्किटे खाल्ल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा
coriander juice beneficial for weight loss
Coriander Juice : खरंच कोथिंबिरीचा रस प्यायल्याने वजन कमी होते? जाणून घ्या, हा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर?
tomato ketchup adulteration
टोमॅटो सॉसमधील भेसळ कशी ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
your sleep position can tell about your health
Sleep Position : तुम्ही कसे झोपता? तुमची झोपण्याची स्थिती तुमच्या आरोग्याविषयी काय सांगते? घ्या जाणून….
Standing Desks Is Good For Health Or Not
Standing Desks Not Good For Health : तुम्हीसुद्धा उभं राहून काम करता का? मग थांबा! तुम्हालाही होऊ शकतात या आरोग्य समस्या
what happens to the body if you brisk walk 2 kms every day
जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

या पद्धतीचे फायदे जास्तीत जास्त मिळवण्यासाठी डॉक्टर शिव कुमार यांनी काही सोप्या ट्रिक्स सांगितल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे :

१. पाणी तुम्हाला सहन होईल इतकंच गरम ठेवा. पाण्याचे तापमान सुमारे १०० ते १००°F ३७ ते ४३ डिग्री सेल्सियम (37-43°C) असावे, यामुळे रक्तवाहिन्या वाढण्यासाठी आणि डोक्यापासून रक्त काढण्यासाठी मदत होईल. यासाठी तुम्ही १५ ते २० मिनिटे पाय पाण्यात ठेवा.

२. मोठे बेसिन किंवा फूट बाथ (पाय धुण्याचे पात्र) वापरा, ज्यात दोन्ही पाय आरामात ठेवता येतील. एप्सम सॉल्ट एप्सम म्हणजे सैंधव मीठ किंवा लॅव्हेंडर तेल पाण्यात घाला, ज्यामुळे तुम्हाला जास्त आराम मिळेल. यावेळी अगदी आरामात बसा, तुमचं डोकं एकदम शांत ठेवा; गरम पाण्यात पाय बुडवल्याचा परिणाम अधिक चांगला येईल.

हेही वाचा…Standing Desks Not Good For Health : तुम्हीसुद्धा उभं राहून काम करता का? मग थांबा! तुम्हालाही होऊ शकतात या आरोग्य समस्या

मायग्रेनचा त्रास अनुभवणाऱ्यांना गरम पाण्यात पाय भिजवणारी शारीरिक यंत्रणा (Migraine Relief Trick) कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकते हे जाणून घेऊया…

१. वासोडिलेशन : गरम पाण्यात पाय भिजवल्याने पायांमधील रक्तवाहिन्या वाढतात, ज्यामुळे डोक्यातील रक्ताचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, संभाव्यतः शरीरातील ताण कमी होतो, त्यामुळे डोकं दुखीचा त्रास कमी होऊ शकतो

२. थर्मोरेग्युलेशन : पाण्यातील उष्णता शरीराला तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. एक सुखदायक प्रभाव प्रदान करू शकते, जे मायग्रेनची लक्षणे कमी करून तुम्हाला आराम प्रदान करते.

३. मज्जासंस्था (Nervous System) : कोमट पाणी पायांमधील मज्जातंतूंच्या नसांना उत्तेजित करू शकते, जे मेंदूला सिग्नल पाठवून वेदना कमी करून तुम्हाला आराम देते.

आता गरम पाण्यात पाय बुडवण्याचे काही धोके आणि अडथळे यांच्याबद्दल जाणून घेऊयात (Migraine Relief Trick Risk)

१. तुमची त्वचा संवेदनशील आहे का? (Skin sensitivity) : संवेदनशील त्वचा किंवा एक्जिमा असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण गरम पाण्यामुळे चिडचिड किंवा जळजळ होऊ शकते.

२. रक्ताभिसरण समस्या : ज्यांचे रक्ताभिसरण दुर्बल आहे, म्हणजेच ज्यांना मधुमेह किंवा न्यूरोपॅथी आहे, त्यांना जळजळ किंवा इतर काही समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे त्यांनी गरम पाणी टाळावे.

३. अतिवापर : वारंवार गरम पाण्यात पाय भिजवल्याने त्वचेची जळजळ, तर त्वचेवर कोरडेपणा जाणवू शकतो.

( टीप : कोणतीही दिनचर्या सुरू करण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

Story img Loader