Fever Home Remedies: भारतात सध्या H3N2 व्हायरस वेगाने पसरू लागला आहे. ताप, खोकला, नाक वाहणे, मळमळ, अंगदुखी, उलट्या आणि अतिसार यांसारखी लक्षणे असलेल्या या व्हायरसने चिंता वाढवली आहे. पण याच पार्श्वभूमीवर सध्या समोर आलेला एक अभ्यास लक्ष वेधून घेत आहे. इम्युनोलॉजी अँड इन्फ्लॅमेशन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की शरीराच्या रोगप्रतिकाराजक शक्तीला वाढवण्यासाठी औषधांपेक्षाही हलका ताप येणे हे अधिक उत्तम ठरते.

कॅनडातील अल्बर्टा विद्यापीठातील अभ्यासाचे प्रमुख लेखक इम्युनोलॉजिस्ट डॅनियल बेरेडा यांनी सांगितले की, “निसर्ग जे करतो ते आम्ही निसर्गाला करू देतो आणि या प्रकरणात, ही खूप सकारात्मक गोष्ट होती. मध्यम तापावर आपले शरीर स्वतः औषध निर्माण करू शकते, इतकेच नव्हे तर ही स्थिती शरीराला भविष्यातील आजाराशी लढण्यासही सक्षम करते.”

तापच ठरते औषध, अभ्यास काय सांगतो?

अलीकडेच माशांवर हा अभ्यास पार पडला होता. अभ्यासासाठी, माशांना बॅक्टेरियाचा संसर्ग देण्यात आला आणि नंतर त्यांच्या प्रतिसादाचा मागोवा घेतला गेला. मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या अनुसार मूल्यांकन करण्यात आले.

तापाची बाह्य लक्षणे ही गतिहीनता, थकवा आणि अस्वस्थता अशी माणसांसारखीच होती. यानंतर असे दिसून आले की, शरीर तापात एक प्रतिसाद देत संक्रमणाविरूद्ध संरक्षण करत होते तसेच संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास देखील तयार होत होते. संशोधकांना असे आढळून आले की तापाने सुमारे सात दिवसांत संसर्ग दूर होण्यास मदत केली. सौम्य तापाने माशांना त्यांच्या शरीरातील संसर्ग झपाट्याने साफ करण्यास मदत केली, जळजळ नियंत्रित केली आणि ऊतींचे नुकसानही कमी झाले.

हे ही वाचा<< किडनी वाचवू शकतो फ्रिजमधील ‘हा’ एक मसाला; डायबिटीजसाठी रामबाण! तज्ज्ञांनी सांगितली सेवनाची योग्य पद्धत

ताप आल्यावर औषधे का घेऊ नये? (Why Not To Take Pills In Fever)

संशोधकांनी नमूद केले की नैसर्गिक तापाचे मानवी शरीराला किती फायदे होतील याबाबत अजूनही संशोधनाद्वारे पुष्टी करणे आवश्यक आहे, मानवांमध्येही असेच फायदे मिळतील अशी अपेक्षा करणे वाजवी आहे. अभ्यासात असे सुचवले आहे की, सौम्य तापमानाच्या पहिल्या लक्षणांवर, लोकांनी ओव्हर-द-काउंटर तापाची औषधे, ज्यांना नॉन-स्टिरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (NSAIDs) म्हणूनही ओळखले जाते घेणे टाळायला हवे. NSAIDS तापाने जाणवणारी अस्वस्थता दूर करते, परंतु यामुळे तुम्ही शरीराला नैसर्गिक प्रतिसाद देऊ देत नाही

Story img Loader