बॉलीवूड अभिनेता आणि सुपर मॉडेल मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. वयाच्या ५८ व्या वर्षीही तो खूप तंदुरस्त आहे. २५- ३० वर्षांच्या तरुणांना लाजवेल असा कमालाची तो फिट आहे. त्याला पाहून अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की तो नेमक काय खातो, फिट राहण्यासाठी काय करतो? दरम्यान, मिलिंद सोमण सोशल मीडियावर अनेकदा त्याचे फिटनेस सिक्रेट शेअर करत असतो. अशातच त्याने इन्स्टाग्रामवर फिटनेससंदर्भात एक नवी पोस्ट केली आहे.

ज्यात तो आठवड्यातून एकदा दोन किमी स्विमिंग करतो #goodvibes असे लिहिले आहे. यावरून स्विमिंग करण्याच्या आरोग्यदायी फायद्यांसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी आठवड्यातून दोन किमी स्विमिंग करण्याचे खरंच फायदे होतात का असा प्रश्न उपस्थित केला आहे. याच प्रश्नावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना फिटनेस ट्रेनर गरिमा गोयल यांनी माहिती दिली आहे.

misinformation on weight loss exercises and diets has led to quick weight loss and muscle damage
झटपट वजन कमी केले..?आता वेगात वजन वाढणार, तज्ज्ञ म्हणतात स्नायूवरही…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Breathing exercises can be caused by 5 minutes after waking
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटे श्वासोच्छ्वासाचे व्यायाम केल्याने होऊ शकतात फायदे; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
really fasting between 5.30 pm and 10 am is best for belly fat loss
सायंकाळी ५.३० ते सकाळी १० पर्यंत काहीही न खाणे पोटावरचा घेर कमी करण्यासाठी फायदेशीर; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?
Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
Here what happens to the body when you finish meals in less than 10 minutes
तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा….
Why Drinking Cold Water May Not Be Good For Your Digestive System, As Per Experts
थंड पाणी सोडून रोज कोमट पाणी प्यायलं तर शरिरावर काय परिणाम होतील? तज्ज्ञांनी सांगितले आश्चर्यकारक फायदे

फिटनेस ट्रेनर गरिमा गोयल यांच्या माहितीनुसार, पोहणे हा एक शरीर व्यायाम प्रकार आहे, ज्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारते, स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती वाढवते आणि शारीरिक लवचिकता वाढवते.

तुम्हाला इतरांपेक्षा जास्त घाम येतो का? हे कोणत्या आजाराचे कारण तर नाही ना? वाचा डॉक्टरांचे मत

स्विमिंग करण्याचे फायदे

कमी प्रभावाचा व्यायाम म्हणून याकडे पाहिले जाते. पोहणे हा धावणे यासारख्या उच्च प्रभावकारी व्यायाम प्रकारापेक्षा तुलनेत कमी त्रासदायक असतो. यामुळे सांधेदुखी किंवा संधिवात असलेल्या लोकांसाठी हा व्यायामाचा एक उत्कृष्ट पर्याय मानला जातो. याशिवाय, पोहण्याने वजन व्यवस्थापन, तणाव कमी करण्यास आणि एकूणच मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते, असे फिटनेस ट्रेनर गरिमा गोयल म्हणाल्या.

जर तुम्ही सर्वसाधारणपणे पहिल्यांदा पोहणे हा व्यायाम प्रकार करत असाल, तर अशावेळी थेट दोन किलोमीटर पोहणे तुमच्यासाठी त्रासदायक असू शकते. यामुळे थकवा किंवा दुखापत होऊ शकते, यामुळे तुमच्या सध्याच्या फिटनेस लेव्हलचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे.

अशा परिस्थितीत एकाचवेळी दोन किलोमीटर अंतर पोहण्याऐवजी थोड्या थोड्या अंतरापासून सुरुवात करा, यामुळे जास्त थकवा जाणवणार नाही. याशिवाय तुमच्या फिटनेस ट्रेनर किंवा स्विमिंग कोचचा सल्ला घ्या, जे तुम्हाला तुमच्या फिटनेस लेव्हलशी जुळणारा आणि तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असा एक प्लॅन तयार करून देण्यात मदत करतील.

कोणत्याही व्यायामाचे फायदे मिळवण्यासाठी सातत्य हे गरजेचे असते. दर आठवड्याला दोन किलोमीटर पोहण्यासाठी विशिष्ट पातळीचे मनोबल असणे गरजेचे आहे. तुमचे शेड्यूल व्यस्त असले तरी तुम्ही प्रत्येक आठवड्यात पोहण्यासाठी आवश्यक वेळ काढू शकता का याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

तसेच स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेळ असते. त्यामुळे दर आठवड्याला तुम्ही राहत असलेल्या ठिकाणापासून स्विमिंग पूलच्या ठिकाणी जाऊन स्विमिंग करणे जमणारे आहे का तेही पाहावे लागेल, असेही गोयल म्हणाल्या. यासाठी तुमची फिटनेस उद्दिष्टे, सध्याची फिटनेस लेव्हल, वेळेचे नियोजन, आनंद आणि तुमच्या आरोग्य स्थितीचे मूल्यांकन करा.

कोणताही व्यायाम प्रकार करण्यास सुरुवात करणे आणि त्याचा वेळ हळूहळू वाढवणे हे खरेच आव्हानात्मक काम असते. यामुळे तुम्ही तुमच्या फिटनेस ट्रेनर, डॉक्टरांशी बोला, त्यांचा सल्ला घ्या. कारण ते तुम्हाला तुमच्या शरीराच्या गरजेनुसार सुरक्षित व्यायाम योजना बनवण्यास मार्गदर्शन करू शकतात, असेही गोयल म्हणाल्या.

Story img Loader