काही दिवसांपूर्वी, ५९ वर्षीय अभिनेता मिलिंद सोमण पुणे ते वसई किल्लादरम्यान पाच दिवसांत २४० किमी धावले. फार कमी जणांना माहीत आहे की, त्यांनी ३७ व्या वर्षी धावण्यास सुरुवात केली, धूम्रपान सोडले आणि ४० वर्षांपासून फिटनेस राखण्यात त्यांनी यश मिळवले आहे. आपल्या फिटनेसबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सोमण यांनी सांगितले की, “मी जिमला जात नाही, मी कोणताही विशेष आहार घेत नाही. माझ्याकडे पोषणतज्ज्ञ किंवा प्रशिक्षक नाही. मग मी हा फिटनेस कसा मिळवला? उत्तर सोपे आहे. मी फक्त व्यावहारिक तर्क (practical logic ) आणि कॉमन सेन्स वापरला.”

“माझ्याबरोबर किमान १० पुश-अप्स केल्यानंतरच मी चाहत्यांना सेल्फी घेण्यास देतो. जेव्हा त्यांच्यापैकी काही जण ते करू शकत नाही, तेव्हा सातत्याने पुश-अप केल्याने हृदयविकाराचा धोका ९० टक्क्यांहून अधिक कसा कमी होतो याबाबत त्यांना मी माहिती देतो”, असे सोमण यांनी सांगितले.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Nutritious ragi cutlets recipe
फक्त ३० मिनिटांत बनवा नाचणीचे पौष्टिक कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
Morning Mantra
Morning Mantra: मॉर्निंग वॉक करताना चालावे की धावावे? वजन कमी करण्यासाठी कोणता व्यायाम ठरेल जास्त फायदेशीर?

आयुष्याच्या मधल्या टप्प्यात असताना निरोगी पद्धतींचे पालन करणे शक्य आहे का, असे सोमण यांना नेहमी विचारले जाते. तेव्हा ते सांगतात की,” “तुम्हाला पुश-अप्स मारणे खूप जास्त वाटत असेल, तर चालण्यापासून सुरुवात करा. स्वत:च्या शरीराची सतत काहीतरी हालचाल चालू राहू द्या. चांगले पदार्थ खा, चांगली झोप घ्या आणि आनंदी राहा. स्वत:ला रोग मुक्त ठेवण्यासाठी तुम्ही सर्व काही करत आहात असे स्वत:ला सांगा, तुमचे शरीर एखाद्या यंत्राप्रमाणे काम करण्यासाठी नव्हे तर तुम्ही जिवंत असेपर्यंत जीवनाचा आनंद घेण्यासाठी आहे, यासाठी हे सर्व प्रयत्न करत आहात हे लक्षात ठेवा.”

हेही वाचा – रक्तदानासाठी तुमचा डावा किंवा उजवा निवडावा हे कोणत्या आधारावर ठरवले जाते? तज्ज्ञांनी केला खुलासा

सोमण हे त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीच्या टप्प्यात कधीही धावले नव्हते, कारण तेव्हा त्यांना ते कंटाळवाणे वाटत होते. पण, त्यांना पोहण्याची आवड होती आणि त्यांनी राष्ट्रीय संघातही स्थान मिळवले होते. अनेक वर्षांचे मॉडेलिंग, अभिनय आणि त्याचा ख्यातनाम दर्जा यामुळे मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये ते सहभागी झाले होते. तेव्हापासून त्यांनी धावण्यास सुरुवात केली, कारण हा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी व्यायामाचा सर्वात सोपा प्रकार होता आणि एक सोपा मार्ग मजबूत स्नायू तयार करण्यासाठी पुरेसा होता. अखेर १० वर्षांनंतर, वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांनी ३० दिवसांत १,५०० किमी अंतर पार करत दिल्ली ते मुंबई धावले. “निरोगी वृद्धत्व म्हणजे व्यायाम करताना मजा करणे, तुम्ही त्याकडे दैनंदिन काम म्हणून पाहू नका आणि तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे”, असा फिटनेस मंत्र सोमण यांनी सांगितला.

एखादी व्यक्ती वयाच्या चाळिशीमध्ये व्यायाम करणे सुरू करू शकते का? (CAN SOMEBODY START EXERCISING IN THEIR 40s?)

“एखादी व्यक्ती वयाच्या चाळिशीमध्ये व्यायाम करणे सुरू करू शकते, कारण शरीर जे मन ठरवते त्याच गोष्टींचे पालन करते. शरीर दररोज ज्या प्रकारची कामे करते, ते पाहता शरीर पूर्णपणे मजबूत असते. आपल्या शरीराची काळजी घ्या आणि व्यायाम करा. ज्यांना आधीपासून काही ना काही आजार आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुमच्यासाठी उपयुक्त अशी फिटनेस योजना तयार करा. एकदा व्यायाम का करायचा आहे हे तुम्ही ठरवले की कोणतीही व्यक्ती कधीही व्यायाम सुरू करू शकते. तुम्ही ज्या कारणासाठी व्यायाम सुरू करणार आहात, त्याच्याशी तुम्ही भावनिकरित्या जोडलेले असणे महत्त्वाचे आहे; कारण त्यातूनच प्रेरणा निर्माण होईल”. असे सोमण यांनी सांगितले.

हेही वाचा – जर तुम्ही रोज एक कच्चे अंडे खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केला खुलासा…

मिलिंद सोमण यांचा रोजचा व्यायाम कसा असतो? ( Milind Soman’s daily drill)

“तुम्हाला वजन कमी करायचे आहे? फक्त चांगले दिसायचे आहे? फक्त डोंगर चढायचे आहे? तंदुरुस्त राहण्यामागे अशी अनेक कारणे असतात माझ्यासाठी, मी लहान होतो तेव्हा मला माझे शरीर अॅक्टिव्ह ठेवणे, रोग आणि औषधांपासून मुक्त ठेवणे हे महत्त्वाचे कारण होते. जर तुम्हाला तुमचे कारण समजले की, तुम्ही स्वत: तंदुरुस्त राहण्यासाठी प्रयत्न कराल. तुम्ही स्वत:च स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आव्हान द्याल. मग, तुम्ही थांबणार नाही आणि ‘तुम्ही तुमचे निरोगी राहण्याचे ध्येय साध्य करू शकला नाही तर लोक काय म्हणतील?’ याची तुम्हाला भीती वाटणार नाही. व्यायाम ही परीक्षा नाही, तो तुमचा आनंद आहे, त्यामुळे तुम्हाला आनंद देणारे कारण शोधा. ते चालणे असू शकते. जसजसे तुम्हाला सवय लागते, तसतसे तुमचे शरीर हालचालींचा आनंद घेऊ लागते आणि आनंदी हॉर्मोन्स (डोपामाइन आणि सेरोटोनिन) वाढतात. त्यानंतर तुम्ही इतर व्यायामांमध्ये हा आनंद शोधू लागाल”, असे सोमण यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – दह्यात मीठ टाकावे की साखर? तुमच्यासाठी काय चांगले आहे आणि का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून….

भारतीय मुळात आळशी आहेत का?

सोमण सांगतात की, “प्रत्येक जण आळशी आहे, फक्त भारतीय नाही. ऊर्जा वाचवण्यासाठी सर्व जिवंत प्राणी ऊर्जा साठवून ठेवतात. माणूस म्हणून शिकार करण्याच्या दिवसांपासून तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत आपला विकास झाल्याने आता आपल्याला तेवढी हालचाल करावी लागत नाही आणि शरीर पुन्हा ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करते.”

ते म्हणाले की, “आपल्याला सांगितले जाते की, “हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि मधुमेहाची सुरुवात भारतीयांमध्ये पूर्वीपासून आहे. एखाद्या विशिष्ट DNA आणि कमकुवतपणासह (विशिष्ट आरोग्यस्थितीसह) बाळ जन्माला येऊ शकते, परंतु आपण या कमकुवतपणासमोर हार मान्य करायची की जास्त प्रयत्न करून त्यांना हरवायचे हा आपला निर्णय आहे. भारतीयांच्या डीएनएमधून आपल्या देशातील ऑलिम्पिक चॅम्पियन्सदेखील तयार करत आहेत. जास्तीचे प्रयत्न करण्यासाठी अगदी साध्या सोप्या गोष्टींची निवड करावी लागते; जसे की, तुम्ही कोणते अन्न खाता? तुम्ही किती झोपता? तुमची विचारसरणी किती सकारात्मक आहे? तुमची शारीरिक हालचाल किती आहे? “

सुपरमॉडेल असताना मिलिंद सोमण यांनी आपली शरीरयष्टी कशी राखली? (HOW DID YOU MAINTAIN YOUR BODY IN YOUR SUPERMODEL DAYS?)

पोहण्यामुळे मी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त झालो. म्हणूनच तुम्ही तरुण असताना आनंददायी खेळ निवडणे महत्त्वाचे आहे, ते तुम्हाला स्वत:बाबत जागरूक ठेवते. मी वयाच्या २३ व्या वर्षापर्यंत पोहोत होतो आणि नंतर फक्त घरगुती व्यायाम, आहार आणि शिस्तीने माझे शरीर सांभाळले. मी पोहणे बंद केल्यानंतर सात वर्षांनी, ३० वर्षांचा असताना मेड इन इंडिया म्युझिक व्हिडीओ शूट केला होता”, असे सोमण यांनी सांगितले.

तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्यक्षात करता येण्यासारख्या टिप्स आणि युक्त्या काय आहेत? (WHAT ARE DOABLE TIPS AND TRICKS?)

सोमण सांगतात की, “तुम्ही फक्त सक्रिय व्हा. पलंगावर लोळत राहू नका. जमेल तितके फिरत राहा. तुमच्याकडे डेस्क जॉब असल्यास एका मिनिटासाठी तासातून एकदा तरी तुमच्या खुर्चीवरून उतरा आणि वॉल स्क्वॅट्सचा सेट करा आणि पुन्हा बसा. स्वतःला वेळ द्या. प्रत्येक तास, एक मिनिट. त्यामुळे तुम्ही हे १० किंवा १२ मिनिटांसाठी सुरू करू शकता, तुम्ही जागे असताना तुमच्या प्रत्येक मिनिटांचा वापर करू शकता, त्यासाठी नियोजन करा.”

तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार घेता?(WHAT KIND OF DIET DO YOU FOLLOW?)

सोमण सांगतात की, “मी ट्रेंडमध्ये असलेले डाएट फॉलो करत नाही. मी चांगला आहार घेतो, भरपूर फळे आणि धान्यांपासून तयार केले पदार्थ खातो, स्थानिक आणि हंगामी, पण घरात तयार केलेले पदार्थ खातो. पॅकेजमधील अन्न खाणे टाळतो. तुम्ही म्हातारे होत असता तेव्हा आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा सर्वात सोपा आहार आहे. मी लहानपणापासून जे पदार्थ खात आलो आहे तेच आजही खातो कारण तुमचे शरीर तुम्ही जे अन्न लहानपणापासून खाता त्यानुसार घडलेले असते. मला हे देखील समजते की, पॅकेजमधील अन्न आणि प्रक्रिया केलेले अन्न प्रवासात असलेल्यांसाठी सोयीचे आहे, ते फक्त आपात्कालीन परिस्थितीमध्ये वापरावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोषण मिळावे म्हणून अन्न खाणे आणि मनोरंजन म्हणून अन्न खाणे यात फरक आहे. ज्या क्षणी मी पिझ्झा, चिप्स आणि हॅम्बर्गरला मनोरंजन म्हणून खाल्ले जाणारे अन्न आहे आणि ते आरोग्यदायी अन्न नाही हे मानतो, तेव्हाच मी माझ्या मनात अर्धी लढाई जिंकलेली असते.”

“मी किती कॅलरी घेतो हे मोजत नाही, परंतु जर तुम्हाला वैद्यकीय समस्या असेल, जिथे तुम्हाला कॅलरी मोजावी लागतील किंवा तुमचे वजन इतके जास्त असेल की, तुम्हाला कमी करणे आवश्यक आहे, तर किती कॅलरीज घेत आहात हे मोजा. जर तुमचे वजन सामान्य श्रेणीत असेल तर फक्त अॅक्टिव्ह राहा. तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल”, असा सल्ला सोमण यांनी दिला.

Story img Loader