दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात आणि म्हणूनच दुधाला सुपर फूडदेखील म्हटले जाते. लहान मुलांना चांगल्या आरोग्यासाठी रोज सकाळी एक ग्लास आवर्जून दूध देण्यात येते. दूध जसे शरीरासाठी चांगले आहे. तसेच ते जास्त प्रमाणात प्यायल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यादेखील उदभवू शकतात. त्यामुळे दुधाचे सेवन करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

दूध हा प्रथिने आणि कॅल्शियमचा समृद्ध स्रोत आहे. २४० मिलिलिटर कप गाईच्या दुधात सुमारे १६० कॅलरीज आणि ७.७ ग्रॅम प्रथिने [ केसिन ८० टक्के, व्हे प्रथिने (whey) २० टक्के ] , १२ ग्रॅम साखर व आठ ग्रॅम चरबी असते. तर, म्हशीचे दूध घट्ट असते. त्यात १०० टक्के जास्त फॅट्स आणि गाईच्या दुधापेक्षा जवळपास ४० टक्के जास्त कॅलरीज असतात. एकंदरीत म्हशीच्या दुधात फॅट्सचे प्रमाण जास्त असते; जे हृदयासाठी वाईट मानले जाते.

Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
National Sugar Factory Federation made various demands to the Central government
साखर उद्योग आर्थिक संकटात ? राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केंद्राकडे केल्या विविध मागण्या

ज्या दुधातून फॅट्स काढून टाकले जातात, त्या दुधात कॅलरीज कमी असतात; तर स्किम्ड दुधात शून्य फॅट असते आणि २४० मिलिलिटरमध्ये फक्त ८० कॅलरीज असतात. दुधाचे हे गुणधर्म पाहता, ते मधुमेही रुग्णांसाठी योग्य पेय आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. तर, द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मॅक्स हेल्थकेअरचे अध्यक्ष, प्रमुख एण्डोक्रायनोलॉजी व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अंबरीश मिथल यांनी एक कप दुधाचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते की नाही हे स्पष्ट केले आहे.

दूध आणि मधुमेही रुग्ण

अलीकडील एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, एकूण दुग्धजन्य पदार्थ, दही आणि दुधामुळे टाईप २ मधुमेह होण्याचा धोका ११ ते १७ टक्क्यांनी कमी होतो. कारण -दुग्धजन्य पदार्थांमध्ये उच्च प्रथिने असतात. विशेषतः ‘व्हे प्रथिनांचा’ (दुधापासून चीज बनविताना जो द्रवरूप पदार्थ मागे राहतो, त्याचे पावडर फॉर्ममध्ये रूपांतर म्हणजे व्हे प्रथिने) ग्लुकोज चयापचय आणि शरीराच्या वजनावर फायदेशीर प्रभाव पडतो. दह्यासारख्या प्रो-बायोटिक्सचाही चयापचय आरोग्यावर अनुकूल प्रभाव पडतो. त्याशिवाय दुधामध्ये बायोॲक्टिव्ह पेप्टाइड्स (peptides) आणि फॅटी ॲसिड यांसारखे घटक असतात; जे रक्तदाब कमी करण्यास आणि मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात. अलीकडेच जागतिक प्युअर (PURE) अभ्यासात असे दिसून आले की, भारतीयांमध्ये चरबीयुक्त (Fat) दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा धोका कमी झाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा…स्नायूंच्या मजबुतीसाठी अंड्याचा पांढरा भाग फायदेशीर; पण एका दिवसात व्यक्तीने त्याचे किती सेवन करावे? जाणून घ्या

लॅक्टोज असहिष्णुता पर्याय :

लॅक्टोज असहिष्णुतेची समस्यादेखील साखरेशी संबंधित आहे. लॅक्टोज असहिष्णुतेने ग्रस्त व्यक्ती या पदार्थांमध्ये असलेली साखर पूर्णपणे पचवू शकत नाही. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये गॅस आणि सूज येणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात.

दुधात एक साखरे सारखा पदार्थ (substance) असतो त्याला लॅक्टोज असे म्हणतात आणि आपल्या पोटात लॅक्टेज म्हणून एंझाइम्स असतात. तर हे एंझाइम्स दुधातल्या साखरेला ब्रेक करतात. तर त्यामुळे साखर डायजेस्ट होऊ शकते. ज्याची सामान्यतः आशियाई प्रौढांमध्ये कमतरता असते. केसीनसारख्या दुधाच्या प्रथिनांमुळेही व्यक्तींना ॲलर्जी होऊ शकते.

तर यावर उपाय म्हणून मधुमेही रुग्णांसाठी कोणते दूध पिणे योग्य आणि कोणते नाही यासाठी डॉक्टर अंबरीश मिथल यांनी काही पर्याय सांगितले आहेत.

बदामाचे दूध : त्यात गाईच्या दुधापेक्षा कॅलरी, प्रथिने, फॅट्स कमी असतात. एक कप किंवा २४० मिलिलिटरमध्ये ४० कॅलरीज, १ ग्रॅम प्रथिने, ३ ग्रॅम फॅट, २ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स (साखर नाही) आणि कॅल्शियमचे व्हेरिएबल प्रमाण असते. हा मधुमेही रुग्णांसाठी एक चांगला पर्याय आहे. कारण- यामध्ये पर्यायी प्रथिने स्रोत आणि कॅल्शियम-फोर्टिफाइड पदार्थ असतात.

सोया दूध : यामध्ये प्रथिने जास्त अन् कॅल्शियम कमी असते. २४० मिलिलिटर कपामध्ये सुमारे ८० ते १०० कॅलरीज, सात ग्रॅम प्रथिने, चार ते सहा ग्रॅम चरबी, चार ग्रॅम कार्ब आणि सुमारे ६० मिलिग्रॅम कॅल्शियम असते.

ओट्स दूध : एक कप ओट्स दूध (२४० मिलिलिटर) आपल्याला १२० कॅलरीज देते. त्यात तीन ग्रॅम प्रथिने, पाच ग्रॅम फॅट, १६ ग्रॅम कार्ब ( सात ग्रॅम साखर) व ३५० मिलिग्रॅम कॅल्शियम असतात. हे दूध इतर वनस्पतींच्या दुधापेक्षा जास्त कॅलरी प्रदान करते आणि मधुमेही रुग्णांना याच्या सेवनाचा सल्ला दिला जात नाही.

नारळाचे दूध : हे फॅट्स आणि कॅलरी यांनी समृद्ध असे वनस्पतीचे दूध आहे. २४० मिलिलिटर कप गोड नसणारे नारळाचे दूध ५५२ कॅलरीज, ५.५ ग्रॅम प्रथिने, ५७ ग्रॅम फॅट्स, १३ ग्रॅम कार्ब व ३८ मिलिग्रॅम कॅल्शियम प्रदान करते. त्यात मीडियम चेन ट्रायग्लिसेराइड्स (MCT)सह फॅट्सचे प्रमाण जास्त आहे.याबाबत असे सुचविण्यात आले आहे की, MCTs पोटातील फॅट्स आणि जळजळ कमी करतात. पण, मधुमेह असलेल्या रुग्णांनी हे टाळणे चांगले आहे.

दूध उत्पादक वनस्पतींच्या इतर जातीही लोकप्रिय होत आहेत. त्यामध्ये बाजरी, काजू, अक्रोड यांचा समावेश आहे. पण, आहारात यांचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टर वा पोषण तज्ज्ञांशी संवाद साधा आणि साखरेसह मिश्रित पदार्थांचे लेबल काळजीपूर्वक वाचा, असे डॉक्टर अंबरीश मिथल यांनी सांगितले आहे.