milk with salt being harmful : पारंपरिक पदार्थ की पौष्टिक अन्नपदार्थ अनेकदा यावरून वाद होताना दिसतात; ज्यामुळे आपले आरोग्य खरोखरच निरोगी काय आहे याबद्दल गोंधळ उडू शकतो. अलीकडेच, एका पॉडकास्ट होस्टने त्यांच्या पाहुण्यांशी संवाद साधला आणि मिठासह दुधाचे (Milk) सेवन केल्याने चेहऱ्यावर खाज सुटणे, बद्धकोष्ठता, यकृताची जळजळ, पिवळसर लघवी यांसह विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात का, असा प्रश्न विचारला. त्यावर कन्टेन्ट क्रिएटर क्रिश अशोक यांनी संशय व्यक्त केला आणि हे दावे फेटाळून लावले. तसेच लोकांनी अन्न संयोजनाबद्दल चुकीच्या माहितीला बळी पडू नये, असे आवाहनसुद्धा केले आहे.
इन्स्टाग्रामवर @Krish Ashok यांनी स्टोरीवर एक क्लिप शेअर करून कॅप्शन लिहिलेय, “येथे लोक दररोज दूध शिजवताना मीठ घालतात आणि त्यांना त्रास होत नाही…” पण, हे वाचून दुधात (Milk) मीठ मिसळण्यामुळे खरोखरच दुष्परिणाम होतात की नाही, असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल ना? तर याचबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला.
बंगळुरूच्या अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या डॉक्टर अमृत गुरुराज येलसांगीकर (एमबीबीएस, एमडी, जनरल मेडिसिन, डीएनबी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी) म्हणाल्या की, मिठासह दुधाचे (Milk) सेवन करणे आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते ; या दाव्याचे समर्थन करणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे आजवर उपलब्ध नाहीत. हे दावे बहुतेक वेळा वैज्ञानिक संशोधनाऐवजी विश्वासांवर आधारित असतात.
सल्लागार आहारतज्ज्ञ व सर्टिफाईड डायबिटीज एज्युकेटर कनिक्का मल्होत्रा म्हणाल्या की, मीठ घातलेले दूध (Milk) प्यायल्याने यकृताची जळजळ, बद्धकोष्ठता किंवा चेहऱ्याची जळजळ यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात हा दावा चुकीचा आहे. मीठयुक्त चीज, पास्ता सॉस, दही-भात, लस्सी यांसारख्या विविध पदार्थांमधील मीठ-दूध (Milk) यांचे मिश्रण अनेक पौष्टिक फायदे देऊ शकते आणि ती बाब सोडियमच्या सेवनाची हमी देते.
दुग्धजन्य पदार्थ आणि मीठ यांच्या मिश्रणास आपले शरीर कसे प्रतिसाद देते?
डॉक्टर अमृत गुरुराज येलसांगीकर सांगतात की, शरीर दुग्धजन्य पदार्थ, मीठ दोन्ही स्वतःच पचवते. दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियम, प्रथिने, चरबी देतात आणि मीठ शरीराला सोडियम प्रदान करते, जे शरीराला आवश्यक असलेले इलेक्ट्रोलाइट आहे. संयमाने सेवन केल्यावर, हे मिश्रण पचन होण्यास मदत करते. त्यामुळे या मिश्रणाने आरोग्य बिघडण्याची कोणतीही शक्यता नाही.
पण, ही बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, मिठाच्या अतिसेवनामुळे मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो. कालांतराने त्याचा कॅल्शियम संतुलनावर परिणाम होऊ शकतो; ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात. दुधात मीठ टाकल्याने पचनावर परिणाम किंवा त्याचा शरीरावर नकारात्मक परिणामसुद्धा होत नाही. तसेच या दाव्यांचा कोणताही पुरावा नसला तरीही वैयक्तिक निवडींवर आधारित, दुधात एक चिमूटभर मीठ टाकण्याने दुधाचा ताजेपणा टिकून राहू शकतो; पण जास्त प्रमाणात मीठ टाकल्यास चवसुद्धा बदलू शकते.
‘चुकीचे संयोजन खाद्यपदार्थ’ ही संकल्पना मुख्यतः एक मिथक आहे का?
डॉक्टर येलसांगीकर व आहारतज्ज्ञ मल्होत्रा दोघेही या बाबीशी सहमत आहेत की, ‘चुकीचे संयोजन खाद्यपदार्थ’ ही संकल्पना मोठ्या प्रमाणात एक मिथक आहे. कारण- बहुतेक संयोजन सामान्य लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. आहारतज्ज्ञ मल्होत्रा म्हणतात की, वेगवेगळ्या संयोजनांच्या हानिकारक प्रभावांना समर्थन देणारे वैज्ञानिक पुरावे कमी असले तरीही मानवी पाचन तंत्र एकाच वेळी विविध मॅक्रोन्यूट्रिएंट्स असलेल्या मिश्र जेवणांवर प्रक्रिया करण्यास सक्षम असते.