सुंदर आणि तरुण दिसायला कोणाला आवडत नाही? आपली त्वचा डाग व पिंपल्सरहित असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, त्यासाठी तुम्हाला त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण- या हंगामात त्वचा कोरडी आणि निस्तेज होते, तसेच त्वचेशी संबंधित आजारांचाही फैलाव होतो. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेकडे खास लक्ष देणे गरजेचे असते. लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय करून बघतात. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी विविध सौंदर्य उत्पादनांचाही वापर केला जातो; परंतु त्यामुळेही त्यांना फायदा होत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतीच शाहिद कपूरची बायको मीरा राजपूतने भूतानमध्ये तिच्या नवीन वर्षाच्या सुटीनंतर परत आल्यावर, सतत प्रवास केल्यामुळे तिची त्वचा कशी कोरडी पडली त्याबाबतची माहिती ‘शेअर’ केली आणि थंडीत कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी एक अतिशय सोपा असा उपाय तिने सांगितला आहे.

मीरा राजपूत सांगते, “भूतान गारठलेला देश असल्याने माझी त्वचा खूप कोरडी झाली. अशा वेळी कच्च्या दुध फायदेशीर ठरु शकते. तसेच तुम्हाला चांगला वास हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडे गुलाब जलही घालू शकता.” स्वत:चा एक नॅचरल लूकमधला फोटो शेअर करीत तिने ही माहिती दिली आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये मीरानं बाऊलमध्ये दिसणाऱ्या दूधाचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला आहे. मीराने सांगितल्याप्रमाणे कच्चे दूध कोरड्या पडलेल्या त्वचेसाठी चांगला उपाय आहे का, याच विषयावर मुंबई वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या सौंदर्य तज्ज्ञ डॉ. श्रद्धा देशपांडे यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. ती सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ.

(हे ही वाचा:सकाळच्या नाश्त्यात अंड्यांऐवजी दररोज मूठभर काजू खाल्ल्याने हृदय राहील निरोगी, ठणठणीत? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या…)

डॉक्टर सांगतात, “कच्च्या दुधामध्ये फॅट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स व लॅक्टोज समाविष्ट असतात. कच्च्या दुधात प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते. ही प्रथिने त्वचा घट्ट करतात. भरपूर फॅट असल्यामुळे कच्चे दूध मॉइश्चरायझर म्हणूनही वापरले जाऊ शकते. लॅक्टिक अॅसिडचा चांगला स्रोत असल्याने कच्चे दूध त्वचा घट्ट ठेवते.

“कच्च्या दुधात कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे यांसारखे अनेक पोषक घटक असतात; जे त्वचेला मॉइश्चरायझ करतात आणि त्वचा सुंदर बनवतात. दुधात लॅक्टोफेरिन असते; जे एक नैसर्गिक प्रथिन आहे. त्याशिवाय त्यात लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियातील दाहकविरोधी गुणधर्म असतात. कच्च्या दुधातील लॅक्टिक अ‍ॅसिड आणि प्रोटीन हे घटक त्वचा अधिक मऊ आणि मुलायम करण्यास मदत करतात. कच्च्या दुधात असलेले लॅक्टिक अ‍ॅसिड त्वचेतील मृत पेशी काढून टाकते आणि नितळ रंग वाढवते.”

कच्च्या दुधात भरपूर जीवनसत्त्वे ए, डी, बी-६, बी-१२ बायोटिन, कॅल्शियम, प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात; जे तुमच्या त्वचेला पोषण देण्याचे काम करतात. कच्च्या दुधाचे हे गुणधर्म तुमच्या त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चराइझ करू शकतात. त्यामधील ओमेगा-३ फॅटी अॅसिडसह उच्च चरबीयुक्त बाबी त्वचेचे पोषण आणि हायड्रेट होण्यास मदत करून, कोरडेपणा कमी करतात, असेही त्या नमूद करतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira rajput kapoor use raw milk for dryness does it work know what doctor says pdb
Show comments