आता पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस सुरू झाला की, अनेकांना गरम गरम भजी, वडापाव असे मसालेदार आणि चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण, सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण- हे वातावरण जलजन्य आणि वायुजन्य रोगांसाठी अनुकूल असल्याने या काळात आपली चयापचय क्षमता मंदावते, तेव्हा आपल्या शरीरातील चैतन्य आणि उर्जा पातळी कमी होते; जी रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते. त्यामुळे आपल्याला आजार आणि संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. त्याशिवाय या काळात ऊर्जेची मागणी वाढते आणि त्यामुळे काही ना काही खाण्याची लालसा निर्माण होते.

आहारतज्ज्ञ अनिता जटाना यांनी पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी काय करावे आणि काय नाही? याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर माहिती दिली आहे.

Hair Grown Inside Throat
‘या’ एका सवयीमुळे घशात वाढू लागले केस; ५ सेमी लांब केस काढण्यासाठी मारल्या हॉस्पिटलच्या फेऱ्या; हा आजार नेमका काय?
Improve Gut Health
आतड्यांमधील जमलेली घाण झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ ५ पदार्थ? सेवनाची ‘ही’ पद्धत जाणून घ्या
Never Eat These Food Items With Tea
चहाच्या घोटासह चुकूनही खाऊ नका हे ६ पदार्थ; अचानक पोटात पित्त का वाढतं हे आहार तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊया
5 simples ways to kee insects or bugs away from home during rainy season monsoon
पावसाळ्यात घरातच काय घराभोवतीही फिरणार नाहीत डास, कीटक अन् माश्या; करा फक्त ‘हे’ ५ सोपे उपाय
Hathras Stampede
Hathras Stampede : मृतदेहांचा खच पाहून हृदयविकाराचा धक्का, ड्युटीवर तैनात पोलिसाचा जागीच मृत्यू
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
do you know Virat Kohli Diet plan
Virat Kohli Diet : विराट कोहलीचा डाएट प्लॅन माहितीये का? जाणून घ्या टी-२० विश्वचषक मालिकेतील त्याच्या फिटनेसचे रहस्य
have you been you using toothpicks then read health experts recommendations
दातांमधील अन्नकण काढण्यासाठी टूथपिकचा वापर करणे थांबवा! तज्ज्ञांनी सुचविलेले ‘हे’ पर्याय पाहा वापरून

कोणते पदार्थ खावेत?

तुमचा आहार क जीवनसत्त्व, अँटिऑक्सिडंट्स आणि विरघळणारे फायबर्स (soluble fibres) या घटकांनी समृद्ध असावा. तांदूळ असो, डाळ असो, चपाती असो वा भाजी, प्रत्येक गोष्ट ताजी असावी. शक्यतो अन्न शिजविल्यानंतर पहिल्या तासातच खावे.

१) संपूर्ण भाज्या : रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर असलेल्या भाज्या निवडा. शक्य असेल तिथे संपूर्ण भाज्या निवडा आणि बाहेरील त्वचा सोलून घ्या. या भाज्यांमध्ये दुधी भोपळा, कारले, गवार, भोपळा, गाजर, मटार, ब्रोकोली व कडधान्ये. इतर भाज्यांच्या पर्यायांमध्ये काकडी, टोमॅटो, बीन्स (फरसबी), भेंडी व मुळा यांचा समावेश होतो. या भाज्यांमध्ये नैसर्गिकरीत्या क्षारीय घटक असतात; जे प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात.

२) सूप : कोमट आणि पौष्टिक सूप; जसे- चिकन, भाज्या व डाळी यांचे सूप पावसाळ्यासाठी योग्य असते. ते पचण्यास सोपे आहेत आणि आपल्याला शरीरात पाण्याची पातळी राखण्यास मदत करू शकते. त्यामुळे सांबर आणि रसम खा; जे केवळ उबदारपणाच देत नाही, तर तुमची रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढवते. त्यामुळे तुम्हाला संसर्गाशी लढण्यास मदत मिळते.

३) हर्बल टी : तुमचे शरीर उबदार आणि हायड्रेट ठेवण्यासाठी आले, तुळशी (पवित्र तुळस) व पुदीना यांसारख्या हर्बल टीचे सेवन करा. या चहामध्ये औषधी गुणधर्मदेखील आहेत; जे पावसाळ्यातील सामान्य आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.

४) फळे : अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध हंगामी फळे खा; परंतु ती धुतलेली आणि ताजी कापलेली आहेत याची खात्री करा. संसर्ग होऊ नये म्हणून रस्त्यावरील विक्रेत्यांकडून कापलेली फळे आणि रस घेणे टाळा. कापलेली फळे फ्रिजमध्ये ठेवू नका. कारण- काही जीवाणू थंड तापमानात वाढू शकतात.

सर्दी आणि तापापासून बचाव करण्यास डाळिंब मदत करते. हे अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध आहे. तसेच त्यात दाहकविरोधी प्रभाव आहे आणि रक्तदाबदेखील ते नियंत्रित करते. तसेच उच्च जीवनसत्त्व, लोह, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि इतर पोषक घटकांमुळे मनुका हे सर्वोत्तम पावसाळी फळांपैकी एक म्हणून ओळखले जाते. ते अतिसार नियंत्रित करू शकते. मनुका, मध व खजूर यांचे सेवन करा; जेणेकरून तुम्हाला सुक्या मेव्यामधून ऊर्जा आणि फ्रक्टोज मिळेल. मग तुम्हाला तृप्तीची भावनादेखील मिळेल.

हेही वाचा – कोंब आलेले बटाटे खाताय? थांबा, असे करण्यापूर्वी बटाट्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घ्या

५) प्रथिने : तुमच्या जेवणात डाळी, पाश्चराइज्ड- उकळलेले दूध आणि चांगले उकडलेली अंडी यांसारख्या स्रोतांमधून पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतील याची खात्री करा. हे घटक चांगले आरोग्य राखण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आवश्यक आहेत.

६) मसाले : हळद, दालचिनी, लवंगा व काळी मिरीमध्ये दाहकविरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात; जे आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.

७) प्रो-बायोटिक्स : दही आणि ताक यांसारखे पदार्थ आतड्यांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी उत्तम आहेत; जे चांगली रोगप्रतिकार शक्ती निर्माण करतात आणि पचनास मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.

हेही वाचा – जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा शरीरामध्ये काय बदल होतात?

पावसाळ्यात कोणते पदार्थ टाळावेत?

१) स्ट्रीट फूड : रस्त्यावरील खाद्यपदार्थ, विशेषतः पाणीपुरी, भेळपुरी आणि इतर चाट पदार्थ खाणे टाळा. हे पदार्थ अस्वच्छ परिस्थिती आणि दूषित पाण्याच्या संभाव्य संपर्क यांमुळे धोकादायक ठरू शकतात. जर तुम्हाला खाण्याची इच्छा झाली, तर ताजे शिजविलेले अन्न निवडा आणि सर्व कच्चे पदार्थ टाळा.

२) कमी शिजविलेले मांस, मासे व अंडी : कमी शिजविलेले मांस, सी-फूड (मासे) व अंडी खाणे टाळा. कारण- त्यात हानिकारक जीवाणू असू शकतात.

३) चांगले न वाफविलेले सॅलड :

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भरपूर पाणी प्या. प्रवास करताना पाण्याची बाटली बरोबर ठेवा किंवा बाटलीबंद पाण्याचा पर्याय निवडा. आपण आपल्या आहारात घरगुती लिंबाचा रस, ताक व नारळ पाणीदेखील समाविष्ट करू शकता.