Monsoon Hair Care Routine & Tips : पावसाळ्यात केस गळतीची समस्या वाढणे हे काही नवीन नाही, त्यासाठी अनेक उपाय केले जातात, पण काही फरक पडत नाही; त्यामुळे पावसाळ्यात त्वचेबरोबर केसांचीही खूप काळजी घ्यावी लागते. या दिवसांमध्ये दमट वातावरणामुळे जास्त घाम येतो. यात पावसाचे पाणी टाळूला लागल्याने टाळू तेलकट, चिकट होते. टाळूवर पावसाच्या पाण्यामुळे ओलसरपणा वाढतो. ज्याने काहीवेळी बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते.

तसेच केसांची मुळे कमकुवत होऊन केस गळणे वाढू शकते. याच विषयावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे ज्येष्ठ त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर महाजन यांनी सविस्तर माहिती दिली आहे, तीच आपण जाणून घेऊ…

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
kala lake, Kalyan, Indurani Jakhad, contractor Notice,
कल्याण : काळा तलाव साफसफाईत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची कारवाई
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

ओलाव्यामुळे केसांवर काय परिणाम होतो? (Monsoon hair care tips)

केस हवेतील जास्त आर्द्रता शोषून घेतात, ज्यामुळे केसांच्या मुळांवर परिणाम होतो. तसेच केस अधिक नाजूक बनतात, ज्यामुळे ते तुटण्याची शक्यता असते. घाम आणि हवेतील आर्द्रतेमुळे टाळू तेलकट, चिकट बनते. केसातील कोड्यांमुळे टाळूवर मुरुम आणि इतर बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. पावसाच्या पाण्यात प्रदूषक आणि अम्लीय घटक असतात, जे केसांमधील नैसर्गिक तेल काढून टाकू शकतात, ज्यामुळे केस कोरडे आणि ठिसूळ होतात.

तेल लावल्याने केस गळती रोखता येऊ शकते का? (How to Stop Hair Fall in Monsoon)

जास्त प्रमाणात तेल लावल्यास केस गळू शकतात. तेल केसांच्या मुळांचे कंडिशनिंग करते, वारंवार धुतल्यावर गमावले जाणारे आवश्यक पोषक घटक प्रदान करते. तसेच ते नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते, केसांना कोरडे आणि कुरळे होण्यापासून रोखते. तेल लावल्याने केसांच्या मुळांभोवती एक संरक्षणात्मक अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे ते प्रदूषक आणि अम्लीय पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करते. जास्त तेल लावल्याने टाळू खूपच तेलकट होऊ शकते, हे तेल अशाचप्रकारे जास्त दिवस केसांमध्ये राहिल्यास बुरशीजन्य संसर्गाचा धोका निर्माण होतो.

More Stories On Health : परीक्षेसाठी रात्रभर जागून अभ्यास करणे ही खरोखरचं फायदेशीर पद्धत आहे का? डॉक्टरांनी दिलेले ‘हे’ उत्तर वाचाच

केस गळती रोखण्यासाठी फॉलो करा खालील टिप्स

१) केस वारंवार धुवू नका : केस आठवड्यातून फक्त दोन किंवा तीन वेळा धुवा.

२) योग्य शॅम्पूचा वापर करा: सौम्य, सल्फेटमुक्त शॅम्पू वापरा, जेणेकरून केसांचे नैसर्गिक तेल टिकून राहील. टी ट्री ऑइल आणि कडूलिंब यांसारख्या गोष्टी टाळूला संसर्गापासून मुक्त ठेवू शकतात.

३) चांगले कंडिशनर वापरा : केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी चांगल्या कंडिशनरचा वापर करा. केसांना फाटे फुटू नयेत यासाठी विशेष काळजी घ्या.

टॉवेलने आपले केस हळूवारपणे कोरडे करा. केस धुतल्यानंतर ते सुकवताना टॉवेलने जोरात घासू नका, ओल्या केसांमधील गुंता सोडवण्यासाठी रुंद दात असलेला कंगव्याचा वापर करा.

केसांना तेल कसे लावायचे?

आठवड्यातून दोनदा टाळू आणि केसांच्या टोकाला नारळ, बदाम किंवा आर्गनसारख्या सॉफ्ट तेलाचा वापर करा, धुण्यापूर्वी एक ते दोन तास आधी तेल लावून मग केस धुवा. केसांना रात्रभर तेल लावून झोपू नका, कारण त्यामुळे केसांमध्ये घाण आणि प्रदूषके जमा होतात. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी तेल लावताना टाळूला हलक्या हाताने मसाज करा.

हेअर स्टाईल करताना काय काळजी घ्यावी? (Monsoon Hair Fall Control Tips)

हिट स्टाइलिंग टूल्सचा वापर कमी करा, कारण त्यामुळे केसांचे आणखी नुकसान होऊ शकते. आवश्यक असल्यास हिट प्रोटेक्टन्ट स्प्रे वापरा. केसांच्या मुळांवरील ताण कमी करणाऱ्या सैल हेअर स्टाइलमधील पर्याय निवडा. घट्ट पोनीटेल किंवा बन्स बांधणे टाळा, ज्यामुळे केस अधिक तुटू शकतात. घराबाहेर पडताना आपले केस स्कार्फने झाका किंवा छत्री वापरा.

शेवटी, व्हिटॅमिन ई, बायोटिन, जस्त आणि ओमेगा -३ फॅटी ॲसिडने समृद्ध आहार घ्या. टाळू आणि केसांना आतून हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.

Story img Loader