बहुतेक लोक पावसाळ्यामध्ये कमी पाणी पितात. तहान लागत नाही म्हणजे आपल्या शरीरालाही पाण्याची गरज नसते असे अनेकांना वाटते, पण असे अजिबात नाही. आपल्या शरीराला प्रत्येक ऋतूत योग्य प्रमाणात पाण्याची गरज असतेच. यात काहीजण बाहेरील खाद्यपदार्थ खातात आणि पाणी कमी पितात, ज्यामुळे त्यांना डिहायड्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागतो व यात घरीच विश्रांती घेत ते आजार बरा करण्याचा निर्णय घेतात. पण उलट्या, जुलाब आणि इतर लक्षणांमुळे तब्येत आणखी खालावते. शरीरात त्राण नसल्याने आवश्यक तितके पाणी पिऊ शकत नाही, यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि व्यक्तीला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करावे लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोणत्याही गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोगात, डिहायड्रेशन ही सामान्य गुंतागुंतीची समस्या आहे, ज्यामुळे व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे लागते. याबाबत दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ सल्लागार डॉ. अतुल गोगिया यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

डिहायड्रेशन किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने अनेकदा घरीच राहून उपचार घेणे योग्य असते. पण, शरीरात पाण्याची कमतरता अधिक असल्यास त्यावेळी दिसणारी लक्षणे वेळीच ओळखून उपचार करणे फायदेशीर ठरू शकते. पण, घरच्या-घरी उपचार करून बरं वाटत नसेल तर घरात थांबू नका आणि स्वत:च्या मनाने कोणतीही औषधं घेऊ नका. गंभीर लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डॉक्टरांकडे कधी जायला पाहिजे?

टायफॉइड आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिससारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोगांमुळे अतिसार आणि उलट्या होतात, ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशा परिस्थितीत जर एखादी व्यक्ती पाणी आणि इतर हायड्रेटिंग पदार्थ जसे की, नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक किंवा ओआरएस पिऊ शकत नसेल, तर तिला डिहायड्रेशनच्या गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो.

डॉक्टरांच्या मते, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन असलेल्या व्यक्तीला दिवसातून १० ते २० पेक्षा जास्त वेळा जुलाब किंवा उलट्या होत असल्यास त्यांनी निश्चितपणे डॉक्टरांचे उपचार घ्यावेत. काही दिवस घरीच ही लक्षणे कमी होतात का हे पाहणे ठीक आहे. पण, त्यानंतरही जुलाब आणि उलट्या कमी होत नसल्यास व्यक्तीने योग्य औषधोपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जर एखाद्या व्यक्तीला उलट्या होत असतील किंवा दिवसातून १० ते २० पेक्षा जास्त वेळा जुलाब होत असतील तर त्याला घरीच शरीर हायड्रेट ठेवणे शक्य होत नाही, यामुळे त्याने ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.

नवी दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटल-साकेतमधील डॉ. रोमेल टिक्को यांनी रुग्णास डॉक्टरांकडे कोणत्या स्थितीत नेले पाहिजे, याबाबत माहिती दिली आहे. जर एखादी व्यक्ती अतिशय अशक्त असेल, अंथरुणातून उठू शकत नसेल, तिला तोंडाने औषधं किंवा पाणी घेण्यास त्रास होत असेल, लघवी होत नसेल तर अशा रुग्णाला त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जायला हवे, अन्यथा व्यक्तीच्या किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

डिहायड्रेशनच्या गंभीर प्रकरणांमध्ये व्यक्तीची किडनी निकामी होण्याची शक्यता असते. यामुळे लोकांनी शरीरात दिसणारी लक्षणे वेळीच ओळखून लवकरात लवकर डॉक्टरकडे जावे. दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ आजार अंगावर काढू नये.

आंघोळीसाठी संपूर्ण कुटुंबाने एकच साबण वापरणे चुकीचे की बरोबर? होऊ शकते ‘हे’ नुकसान

कोणती औषधे घेतली पाहिजेत?

पावसाळ्यात टायफॉइड आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिसच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीतील अनेक रुग्णालयांमध्ये मागील दहा दिवसांच्या तुलनेत आता रुग्णांची संख्या २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. या आजारांची खरी सुरुवात उन्हाळ्यापासून होते, कारण उन्हाळ्यात अनेकजण गरजेपेक्षा जास्त पाणी पितात, तर पावसाळ्यात दूषित पाण्यात वाढ होते. परिणामी, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन्सचा प्रसार होतो.

बहुतेक संक्रमण विषाणूजन्य असले तरी, अशी लक्षणे दिसू शकतात. जर हा संसर्ग व्हायरल असेल तर औषधांची गरज नाही. विश्रांती घेऊन आणि हायड्रेशन राखून व्यक्ती स्वतःहून बरी होऊ शकते. पण, टायफॉइडसारख्या संसर्गासाठी योग्य औषधोपचार आवश्यक आहेत, असे डॉ. टिक्को सांगतात. अशा परिस्थितीत त्यांनी लोकांना अँटीबायोटिक औषधांचे सेवन न करण्याचे आवाहन केले आहे. कारण अशा औषधांमुळे रुग्णाची परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. याशिवाय कोणत्याही रुग्णाने दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आजार बरा न झाल्यास डॉक्टरांना भेटावे आणि योग्य औषधोपचार घ्यावेत, असेही डॉ. टिक्कू म्हणाले.