Skin Care Tips : पावसाळा आनंद घेऊन येणारा ऋतू असला तरी तो आरोग्यासंबंधीत अनेक समस्या देखील येऊ येतो. पावसाळ्यात विशेषत: त्वचेसंबंधीत अनेक समस्या निर्माण होतात, त्यामुळे त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. यात तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींना पावसाळ्यात अधिक जपावे लागते. नाहीतर त्वचेवर पुरळ, खाज सुटू लागते. यासाठी त्वचारोग तज्ज्ञ डॉ. आंचल पंथ यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीतून आपण पावसाळ्यात तेलकट दिसणाऱ्या त्वचेसाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तेलकट त्वचा नैसर्गिकरीत्या उजळ दिसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल पंथ यांच्या मते, हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे पावसाळ्यात अनेक लोक त्वचा तेलकट होत असल्याची तक्रार घेऊन येतात. या वातावरणात त्वचेवरील काही सेल्स ओपन होतात त्यामुळे मुरुम आणि ब्लॅकहेड्सची समस्या जाणवते.

एलिमेंट्स ऑफ एस्थेटिक्सचे संस्थापक आणि त्वचारोग तज्ज्ञ डॉ. स्तुती खरे शुल्का यांच्या मते, हवेतील आर्द्रतेमुळे त्वचेवर बॅक्टेरिया, घाम, धूळ आणि प्रदूषक सहज चिकटून राहतात. त्यामुळे त्वचेचे संक्रमणापासून कसे संरक्षण करायचे असा प्रश्न निर्माण होतो.

पावसाळ्यात चेहरा तेलकट, चिकट होत असल्यास अशी घ्या काळजी

१) सनस्क्रीनचा वापर करा

डॉ. पंथ यांनी पावसाळ्यात जेलबेस आणि नॉन-कॉमेडोजेनिक सनस्क्रीन न वापरण्याचा सल्ला दिला आहे. कारण यामुळे त्वचा खूप चिकट आणि तेलकट दिसते.

२) हेवी मेकअप करु नका

मेकअप प्रोडक्टमधील तेलामुळे तुमची त्वचा आणखी तेलकट दिसते. त्यामुळे डॉ. शुल्का यांनी पावसाळ्यात हेवी मेकअप न करण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्हाला मेकअपशिवाय बाहेर जाणे आवडत नसेल, पण तेलकट त्वचा टाळायची असेल तर कमीतकमी मेकअप वापरा. हलका नॉन-कॉमेडोजेनिक, वॉटरबेस कॉस्मेटिक आणि ऑइल फ्री फाउंडेशनचा वापर करा. यामुळे त्वचा जास्त तेलकट होणार नाही.

३) ब्लॉटिंग पेपर / टिश्यू पेपर सोबत ठेवा

डॉ पंथ यांच्या मते, पावसाळ्यात तुम्ही नेहमी स्वत:जवळ ब्लॉटिंग पेपर किंवा टिश्यू ठेवावा. याशिवाय आपल्या चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे टाळावे, कारण यामुळे आपल्या त्वचेवर जंतू चिकटू शकतात.

४) त्वचा चांगल्याप्रकारे एक्सफोलिएट करा

त्वचा योग्य प्रकारे एक्सफोलिएट करणे महत्वाचे आहे. परंतु लक्षात ठेवा की, त्वचा जास्त घासणे टाळा कारण यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. तसेच त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होऊ शकते. डॉ. शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, चेहरा दिवसातून दोनदा ऑइल फायटिंग क्लीन्झरने धुवावा.

५) त्वचा हायड्रेट ठेवा

तेलकट असलेली त्वचा हायड्रेट ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी जास्त पाणी प्या. तसेच मॉइश्चरायझर लावत असाल तर त्याचा वापर कमी करा. कारण पावसाळ्यात त्वचा आधीच खूप तेलकट असते त्यात मॉइश्चरायझरमुळे ती आणखी तेलकट दिसू लागते. यामुळे डॉ. पंथ यांनी देखील त्वचेवर जास्त मॉइश्चरायझर न लावण्याची शिफारस केली आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon skin care tips doctors 5 incredible tips to handle oily skin this rainy season sjr
Show comments