भारतीय हे आजारी व्यक्तींचे राष्ट्र होत चालले आहे का? असा प्रश्न सध्या आपल्यासमोर उभा राहिला आहे. त्याचे कारण आहे नुकतेच समोर आलेले एक संशोधन. संसर्गजन्य नसलेल्या आजारांची संख्या निर्धारित करणार्‍या लाइफस्टाइल मार्करवरील सर्वात मोठ्या आणि प्रातिनिधिक अभ्यासांपैकी एकाने असे सिद्ध केले आहे की, ”आपल्याकडे मधुमेह, उच्च रक्तदाब, सुटलेले पोट किंवा abdominal fat आणि उच्च कोलेस्ट्राॅल यांसारख्या metabolic disorders म्हणजे चयापचय विकारांचे जास्त प्रमाण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एवढेच नव्हे तर देशातील मधुमेहाची संख्या पुढील पाच वर्षांत वाढण्याची शक्यता आहे, विशेषत: ग्रामीण भागात आणि राज्यांमध्ये जेथे मधुमेहाचे प्रमाण सध्या कमी आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) पाठिंब्याने आणि डॉ. मोहनच्या डायबेटिज स्पेशॅलिटी सेंटरच्या नेतृत्वाखाली केलेले हे संशोधन ३१ राज्यांतील १,१३,००० लोकांवर आधारित होते.

‘द लॅन्सेट डायबिटीज ॲण्ड एंडोक्राइनोलॉजी’मध्ये गुरुवारी प्रकाशित झालेला हा अहवाल असे दर्शवितो की, ”भारतातील ११.४ टक्के किंवा १०१ दशलक्ष लोकांना मधुमेह आहे. पण, आणखी चिंतेची बाब म्हणजे १५.३ टक्के किंवा १३६ दशलक्ष लोकांना प्री-डायबिटीज आहे.”

हेही वाचा – एका दिवसात किती द्राक्ष खावे? मधुमेही व्यक्तींनी कसे करावे सेवन? जाणून घ्या

“प्री-डायबिटीजच्या प्रादुर्भावाबाबत ग्रामीण आणि शहरी विभागणी केली जात नाही. तसेच, मधुमेहाचे सध्याचे प्रमाण कमी असलेल्या राज्यांमध्ये, प्रीडायबेटिजचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले. हा एक टिक टिक करणारा टाइम बॉम्ब आहे (म्हणजेच हा भविष्यातील संभाव्य धोक्याचा इशारा आहे),” असे डॉ. आर. एम.अंजना यांनी सांगितले. आर. एम. अंजना या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका आणि डॉ. मोहन डायबिटीज स्पेशॅलिटी सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की “आपल्या लोकसंख्येमध्ये जर एखाद्याला प्री-डायबेटिज असल्यास त्याचे मधुमेहामध्ये रूपांतर खूप वेगाने होते; प्री-डायबेटिज असलेल्या ६० टक्क्यांहून अधिक लोकांचे पुढील पाच वर्षांत मधुमेहात रूपांतर होते. शिवाय, भारतातील जवळपास ७० टक्के लोकसंख्या खेड्यांमध्ये आहे. त्यामुळे मधुमेहाचा प्रादुर्भाव ०.५ ते १ टक्क्यांनी जरी वाढला, तरी संपूर्ण आकडा खूप मोठा असू शकतो.

हेही वाचा – द्राक्षांमुळे कोलेस्टॉलची पातळी कमी होते का? ह्रदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम?

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे central obesity वाढत जाणारा प्रसार जो ३९.५ टक्के आहे. ‘बॉडी मास इंडेक्स’ वापरून मोजले जाणारा सामान्यीकृत लठ्ठपणा २८.६ टक्के कमी होता. बेली फॅट हा मधुमेह आणि हृदयविकाराचा एक प्रमुख जोखीम घटक आहे, हे लक्षात घेऊन भारतीयांनी तातडीने शाश्वत वजन कमी करण्याच्या दिनचर्येला प्राधान्य देण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More indians are getting diabetes belly fat cholesterol and high bp says icmr backed study snk
Show comments