दिवाळीचा सण संपला. पाच दिवसांपासून खूप फटाके आणि धूर आपण पाहतोय. दिवाळीनंतरचे वाढते प्रदूषण हा याचाच परिणाम आहे. हवामानात बदल होण्यापूर्वी प्रदूषणात वाढ झाली आहे. फटाक्यांमधून निघणाऱ्या धुराचा थेट फुप्फुसांवर परिणाम होतो. त्यामुळेच आजकाल बहुतेक लोकांना धाप लागणे, खोकला, श्वासनलिकेतील अस्वस्थता यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हीही श्वासोच्छवासाच्या आजाराने किंवा अस्थम्यासारख्या आजाराने ग्रस्त असाल, तर तुमच्या फुप्फुसांचे संरक्षण करणे तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. दिवाळीत धुरामुळे तुमच्या फुप्फुसांचे गंभीर नुकसान होऊ शकते हे लक्षात घेऊन, तुम्ही त्यांचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे. हिवाळा आला की, धुक्यासोबतच प्रदूषणाची पातळीही वाढते. खराब हवेची गुणवत्ता आणि थंड तापमानामुळे घराबाहेर व्यायाम करणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले आहे. मात्र, तुम्ही घरामध्येही फुप्फुसांचे आरोग्य सुधारू शकता. आरोग्य तज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

व्यायाम जसे की, स्पॉट जॉगिंग किंवा घरातच सायकलिंग केल्याने तुमच्या हृदयाची आणि फुप्फुसांची स्थिती सुधारू शकते. तसेच स्नायूंची ताकद, फिटनेस वाढू शकतो.

श्वासोच्छ्वासाचे व्यायाम

श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे शरीर आणि मनाला शांती मिळते. मानसिक आरोग्य सुधारते. नाकातून दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे यांमुळे अॅलर्जी कमी होते. तुम्ही औषधांशिवाय फुप्फुसांत जमा झालेला घाणेरडा धूर काढून, फुप्फुसांचे शुद्धीकरण तुम्ही घरीच करून, ती निरोगी करू शकता. व्यायाम हा फुप्फुसांत साचलेली घाण काढून टाकण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. त्यामुळे शरीराच्या श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो आणि स्नायूंना जास्त ऑक्सिजन मिळतो. तसेच रक्ताभिसरण सुधारते.

दुहेरी श्वासोच्छवास करण्याचा सल्ला डॉक्टर देत असून दुहेरी श्वासोच्छवासाचा व्यायाम केल्यामुळे शरिराला ऑक्सिजन आणि ऊर्जा मिळते. फुप्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी सर्वांत प्रभावी व्यायामांपैकी एक म्हणजे खोल श्वास घेणे. हे फुप्फुसांत ऑक्सिजन अडकण्यापासून रोखते; ज्यामुळे तुम्हाला सामान्यपणे श्वास घेता येतो.

योग

हृदय आणि फुप्फुसांच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी योगा हा उत्कृष्ट उपाय आहे. सध्या हवा प्रदूषित झाल्यामुळे अनेकांना फुप्फुसांच्या समस्या निर्माण होतात. फुप्फुस निरोगी ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग करणे. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच; पण त्यामुळे फुप्फुसs मजबूत होतात आणि त्यांची कार्यक्षमता वाढते; ज्याद्वारे तुम्ही अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकता.

हेही वाचा >> सणवारामध्ये अतिप्रमाणात मद्यपान केल्यामुळे विषबाधा होऊ शकते का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम आहे. त्यामध्ये पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाला फायदा मिळतो. १२ आसने आणि १० अवयवांच्या मदतीने केल्या जाणाऱ्या या आसनामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात; शिवाय तणाव दूर होण्यासही मदत होते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most effective breathing exercises to cleanse boost your lungs heres how you exercise safely as air pollution rises srk
Show comments