Mouth Ulcer: तोंडात येणारे लालसर फोड खूप वेदनादायक असतात. यामुळे खाणं पिणं अवघड होत. खाताना भरपूर वेदना होतात. खाण्यापिण्यात खूप त्रास सहन करावा लागतो. लाल, पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे हे फोड अनेकदा आपल्या तोंडाच्या आतील भागात येतात. हे फोड येण्यामागे अनेक कारणे असतात, जसे की कमी पाणी पिणे किंवा पोट साफ न होणे. कधीकधी फोड स्वतःच बरे होतात. पण जेव्हा संसर्ग वाढतो तेव्हा खाण्यापासून ते तोंड उघडण्यापर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही या घरगुती उपायांचा वापर करून त्यांना लगेच बरे करू शकता.
मध
मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीबायोटिक गुणधर्म आढळतात. म्हणूनच ते तोंडाचे फोड सहज कमी करतात. दिवसातून ४ ते ५ वेळा या फोडांवर मध लावा. मध लावल्यानंतर तोंडात येणारी लाळ बाहेर टाका. असे केल्याने फोड निघून जातात.
( हे ही वाचा: भाताचे सेवन ‘या’ तीन आजारांवर विषासमान परिणाम करते; वेळीच जाणून घ्या..)
हळद
हळदीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आढळतात. तुमच्या तोंडाचे फोड कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. ते वापरण्यासाठी प्रथम काही चमचे हळद घ्या आणि त्यात थोडे पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट दिवसातून दोन ते तीन वेळा फोडांवर लावा. यामुळे तुमचे फोड निघून जातील
मीठ आणि कोमट पाणी
मिठातील अँटीसेप्टिक गुणधर्म अल्सर दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. एक ग्लास पाणी गरम करून त्यात थोडे मीठ टाका. आता या पाण्याने तोंडात कुल्ला करा. यामुळे तोंडातील फोड लवकर बरे होतात.