Monkeypox in India : मंकीपॉक्स आजाराची रुग्णसंख्या वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. तर आता भारतातही संशयित मंकीपॉक्स रुग्णाची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातील माहिती दिली असून या रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आफ्रिकन देशांत एमपॉक्स म्हणजेच मंकीपॉक्सची साथ वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केले आहे. गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा ही वेळ आली आहे. आफ्रिकेतील बाराहून अधिक देशांत पसरत असलेल्या या साथीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे. दरम्यान, अशातच गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी, या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना फरीदाबाद येथील अमृता हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार, प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्वेता मेंदिरट्टा यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

डॉ. श्वेता मेंदिरट्टा सांगतात, गर्भवती महिलांनी विशेषतः सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण गर्भधारणेदरम्यान पॉक्स विषाणू गर्भात संक्रमित होऊ शकतो. “आईला विषाणूची लागण झाली असल्यास हे संक्रमण होऊ शकते.”

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Video About Vadhvan Port
Vadhvan Port : वाढवण बंदर का महत्त्वाचं आहे? पाच वैशिष्ट्ये कुठली? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण
monkey
थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”
Tokyo subsiding epidurals for pregnant women
वेदनारहित प्रसूतीसाठी ‘या’ देशात महिलांना पैसे का दिले जातायत? काय आहे एपिड्युरल?
LIC special plan for women print eco news
‘एलआयसी’ची महिलांसाठी विशेष योजना; मिळणार ७ हजार रुपये महिना मानधन
Image of the Bombay High Court building or a related graphic
“सरासरी बुद्धिमत्ता असलेल्या स्रीला आई होण्याचा अधिकार नाही का?”, मुलीचा गर्भपात करण्याची मागणी करणार्‍याला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले
maharashtra health department balasaheb thackeray apla dawakhana treatment
आरोग्य विभागाच्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात’ ४२ लाख रुग्णांवर उपचार!

गर्भवती महिलांसाठी कोणते धोके आहेत?

गर्भवती महिलांना त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीतील बदलांमुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, असे डॉ. मेंदिरट्टा यांनी सांगितले. हैदराबाद येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटल्सच्या एमएस जनरल सर्जरी, डीजीओ, डॉ. राणी कोप्पुला यांनी सांगितले की, व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप, पुरळ येतात.

गंभीर आजार : एमपॉक्स हा दुर्मीळ असला आणि तो सहज पसरत नसला, तरी हा व्हायरस गर्भवती महिलेला संक्रमित झाल्यास गंभीर लक्षणे निर्माण करू शकतात. या लक्षणांमध्ये ताप, त्वचेवर पुरळ आणि सूज येणे याचा समावेश असू शकतो. “गंभीर प्रकरणांमध्ये, विषाणूमुळे अंधत्व येऊ शकते. जरी मृत्यू दुर्मीळ असला तरी एमपॉक्सचा प्रसार होत असताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

गर्भधारणेतील गुंतागुंत : एमपॉक्सची लागण झाल्यास गर्भपात, मृत जन्म किंवा मुदतपूर्व प्रसूतीची शक्यता असते, असे डॉ. मेंदिरट्टा यांनी नमूद केले.

बाळामध्ये संक्रमण : हा विषाणू गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मादरम्यान आईकडून बाळाकडे जाऊ शकतो, असे डॉ. मेंदिरट्टा यांनी सांगितले.

सावधगिरी बाळगा
एमपॉक्स होण्याचा धोका कमी करण्यासाठी, गर्भवती महिलांनी अशी घ्या स्वत:ची काळजी

स्वच्छता राखा : आपले हात वारंवार धुवा आणि हात धुतल्याशिवाय चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा.

लोकांशी संपर्क टाळा : आजूबाजूला जास्त लोकांशी संपर्क टाळा. जर तुम्ही एमपॉक्स असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या आसपास असाल तर मास्क आणि हातमोजे घाला.

वैद्यकीय मदत घ्या : जर तुम्हाला ताप, पुरळ किंवा सूजसारखी लक्षणे दिसली तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. “एखादी गर्भवती महिला एमपॉक्सच्या संपर्कात आल्यास किंवा ताप किंवा त्वचेवर पुरळ उठणे यांसारखी लक्षणे आढळल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. लवकर निदान संसर्ग व्यवस्थापित करण्यात आणि गुंतागुंत कमी करण्यात मदत करू शकते,” असे डॉ. कोप्पुला म्हणाल्या.

लसीकरण करा : गर्भधारणेदरम्यान एमपॉक्स लसीकरणाची सुरक्षितता आणि आवश्यकतेबद्दल तुमच्या आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असे डॉ. मेंदिरट्टा म्हणाले.

हेही वाचा >> आठवड्याभराची अपुरी झोप वीकेंडला घेतल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो; संशोधनातून समोर आली माहिती

माहिती मिळवा : एमपॉक्स आणि गर्भधारणेबाबत आरोग्य अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शक माहिती जाणून घ्या आणि उपायांविषयी चर्चा करा.

Story img Loader