Mahendra Singh Dhoni Health : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेट कारकिर्दीबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील तितकाच चर्चेत असतो. चाहत्यांना त्याची दैनंदिन दिनक्रिया जाणून घेण्यात फार उत्सुकता असते. निवृत्तीनंतर तो सध्या काय करतो, काय खातो, कुठे फिरतो या सर्व गोष्टी चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. यात तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल की, धोनीला मांसाहारी पदार्थ खायला आवडतात. विशेषत: बटर चिकन हा त्याच्या सर्वात आवडता पदार्थ आहे. त्यामुळे धोनीचे मांसाहाराचे वेड कोणापासून लपून राहिलेले नाही; पण माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचे क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा यांनी धोनीच्या आहाराबाबत एक रंजक गोष्ट सांगितली आहे.

आकाश चोप्रा यांनी एका यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, एकेकाळी जेव्हा आकाश आणि धोनी दोघेही इंडिया ए संघाकडून खेळत होते, तेव्हा धोनी आकाश यांचा रुम पार्टनर होता. आकाशाने सांगितले की, मी शाकाहारी आहे पण धोनीला मांसाहार आवडतो हे मला माहीत नव्हते. यावेळी मी त्याला विचारले, काय जेवण ऑर्डर करू. ज्यावर तो म्हणाला की, तुला जे काही खायचे आहे ते ऑर्डर कर, मी देखील तेच खाईन. अशाप्रकारे काही न बोलता त्याने महिनाभर माझ्याबरोबर शाकाहारी जेवण खाल्ले.

Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
human personality mask
जिंकावे नि जगावेही: मुखवट्यांच्या आड
RSS Mohan Bhagwat, pune,
देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
article about weakness problem in wome causes of weakness in women
स्त्री आरोग्य : बायांनो, तुम्हाला विकनेस जाणवतो?
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
What does your eye discolouration say about your health? Dark Circles Solution
तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात…
how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन

या मुलाखतीत आकाश चोप्रा यांनी धोनीने महिनाभर मांसाहार न करण्याचे कारणही सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, धोनी खूप लाजाळू होता, त्याने कधीही रूम सर्व्हिसला फोन केला नाही. तो इतका लाजाळू होता की, त्याने महिनाभर फक्त मी ऑर्डर केलेले शाकाहारी पदार्थ खाल्ले.

Read More Health News : बॉडीबिल्डर इलिया गोलेमचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; दिवसातून 7 वेळा करायचा जेवण; पण असं खाणं कितपत योग्य? वाचा डॉक्टरांचे मत

पण, अशाप्रकारे एखाद्या मांसाहारी व्यक्तीने महिनाभर शाकाहारी आहार घेतल्यास त्याच्या शरीरावर काय परिणाम होईल याबाबत इंडियन एक्स्प्रेसने काही आहारतज्ज्ञांचे मत जाणून घेतले आहे.

मांसाहार सोडून शाकाहारी जेवण खाण्याचा शरीरावर काय परिणाम होतो?

मुंबईतील झायनोवा शाल्बी हॉस्पिटलचे आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी सांगितले की, एखाद्या मांसाहारी व्यक्तीने अचानक महिनाभर मांसाहार खाणे बंद करून शाकाहारी जेवण खाल्ल्यास त्याच्या शरीरात मोठे बदल दिसून येतात.

आहारतज्ज्ञ पटेल यांनी सांगितले की, जसा वेळ जातो तसतसे शरीरात बदल दिसू लागतात. शाकाहारी बनणे म्हणजे तुमच्या आहारात भाज्या, फळे, शेंगा, मसूर आणि तृणधान्यांचा समावेश करणे. हे पदार्थ फायबरसह अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. यामुळे पचनसंस्थेला चालना मिळते आणि तुम्हाला पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. याशिवाय तुमच्या रक्तातील साखरेची पातळीदेखील स्थिर राहते. मांसाहार करणारी व्यक्ती महिनाभर शाकाहारी पदार्थ खात असेल तर तिला रोज नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते.

नवी दिल्लीतील पीएसआरआय हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत सिन्हा म्हणाले की, आहारातील बदलाचा एक फायदा म्हणजे हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. तसेच शाकाहारी आहारामुळे सॅच्युरेटेड फॅट्स आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे रक्तदाब आणि ह्रदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. हाय फायबरमुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते, यामुळे व्यक्तीला दिवसभर उत्साही आणि हलके वाटते.

आहारतज्ज्ञ पटेल यांच्या मते मटण, चिकन किंवा मासे अशा मांसाहारी पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स कमी असतात, ज्यामुळे त्वचेत काही चांगले बदल दिसून येऊ शकतात. तसेच त्वचा हायड्रेट बनते. एका महिन्यानंतर तुमच्या तोंडाची चव शाकाहारी अन्नपदार्थांशी जुळवून घेते.

डॉ. सिन्हा म्हणाले की, मांसाहार करणाऱ्या व्यक्तीने अचानक शाकाहार करण्यास सुरुवात केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. विशेषत: जे चिकन, मटण असे पदार्थ आवडीने खात असतील तर अशांना हा बदल त्रासदायक वाटू शकतो. अचानक शाकाहारी आहार करण्यास सुरुवात केल्यास तुमच्या शरीराची पुरेशा प्रमाणात प्रथिनांची गरज भागवता येत नाही. मसूर, चणे, टोफू आणि क्विनोआ यांसारखे पदार्थ प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत असले तरी त्यातून मांस किंवा माशांमधून मिळणाऱ्या प्रथिनांइतके प्रथिने मिळत नाहीत.

अशाने शरीरात योग्य रीतीने समतोल न राहिल्यास थकवा किंवा स्नायूंचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत शरीरात अमिनो ॲसिडची पातळी राखण्यासाठी आहाराचे काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक आहे, असेही डॉ. सिन्हा म्हणाले.

मांसाहारातून शरीरास कोणते पोषक घटक मिळतात?

यातील आणखी एक धोका म्हणजे मांसाहारातून मिळणारे व्हिटॅमिन बी 12, लोह आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिडस् यांसारखे पोषक घटक शाकाहारी पदार्थांमधून मिळत नाहीत. यामुळे शरीरात या घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते. मांसाहारातून व्हिटॅमिन बी 12 मोठ्या प्रमाणात आढळते, जर शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमी निर्माण झाल्यास थकवा, अशक्तपणा आणि न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसू शकतात. तसेच मांसाहाराच्या तुलनेत शाकाहारी पदार्थांमधून शरीरास हेम लोह पुरेशा प्रमाणात मिळणार नाही.

नवी दिल्लीतील आकाश हेल्थकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे क्लिनिकल आहारतज्ज्ञ अदीबा खान यांनी सांगितले की, शाकाहारी आहारामुळे झोपेची गुणवत्ता आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास शाकाहारी आहार करणे फायदेशीर ठरू शकते. अशावेळी तुम्हाला मांसाहारी पदार्थ खाण्याची इच्छा होऊ शकते, पण खरंच तुम्ही मनापासून वजन कमी करण्याचा निश्चिय केला असेल तर मांसाहाराची इच्छा काही तासांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही, असेही पटेल म्हणाले.

हैदराबादमधील लकडी का पूल स्थित ग्लेनेगल हॉस्पिटल्सचे मुख्य आहारतज्ज्ञ, डॉ. भावना पी म्हणाल्या की, तुम्ही दीर्घकाळ संतुलित शाहाकारी आहार सेवन करत असाल तर वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. तसेच जळजळ कमी होत शरीरास आवश्यक जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स प्रदान करत ताणतणाव कमी होतो.

तुम्ही महिनाभर शाकाहारी आहार घेत असल्यास यामुळे पचनक्रिया आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. शरीरास सकारात्मक ऊर्जा मिळते, तसेच अनेक आरोग्य फायदे मिळतात. पण, शरीरास आवश्यक पोषक तत्वे मिळवण्यासाठी आहाराचे नियोजन व्यवस्थित करणे महत्त्वाचे आहे. अशावेळी तुम्ही आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते, असेही सिन्हा म्हणाले.