पल्लवी सावंत पटवर्धन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राजगिऱ्याचे लाडू दुधातून खाल्ल्यावर इतकं बरं वाटतं”, मीरा सांगत होती.

मी नुसतं दूध कसतरी पिते. पण ज्या प्रकारे राजगिरा मिल्कशेक जो फील देतं ते भारी आहे”

मी परवा रागोऱ्याचा केक तयार केला होता. इतका भारी झाला होता”.

हिवाळ्यात खाण्याच्या विशेष पदार्थांच्या सेशन मध्ये राजगिरा सगळ्यानांच आवडल्याचं लक्षात येत होतं. आवश्यकतेनुसार धान्य, सुकामेवा , घनता वाढविणारा पदार्थ अशा विविध स्वरूपात राजगिरा वापरला जातो.

राजगिरा हिवाळ्यात पोटभर आणि पोषक आधारासाठी उत्तम पर्याय आहे.

तुमचं कोलेस्ट्रॉल जास्त आहे?

रक्तदाब कमी करायचंय?

आहारात सोडिअम कमी करायचंय?

तुम्हाला ऍलर्जीस आहेत?

राजगिरा तुमच्या आहारातील सर्वोपयोगी पदार्थ आहे.

पूर्वापार आहाराचा महत्त्वाचा भाग असलेला राजगिरा अलीकडे ग्लूटेन फ्री धान्य म्हणून आहारच भाग होऊ पाहत आहे.

आणखी वाचा-मधुमेह, हृदय अन् डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘ही’ भाजी ठरतेय गुणकारी; आहारात करा समावेश

वैज्ञानिक भाषेमध्ये स्युडो-सिरीयल म्हणजे मराठीत प्रतिधान्य असे देखील म्हटले जाते. म्हणजे ते धान्य सुद्धा आहे आणि कडधान्याचा सुद्धा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये एक सुकामेवा सारखं घट्टपणादेखील आहे आणि वेगळ्या प्रकारची पोषणतत्त्वेसुद्धा आहेत. प्रथिने, तंतुमय पदार्थ, पोषणमूल्ये अँटी-ऑक्सिक्सिडंट यांचे मुबलक प्रमाण असते. ऊर्जेचे प्रमाण पाहता १०० ग्राम मध्ये साधारण शंभर ते दीडशे कॅलरी इतकी ऊर्जा असते, साधारण पाच ग्रॅम इतके प्रथिने आढळतात तसेच मॅंगनीज मॅग्नेशियम फॉस्फरस लोह सेलेनियम तांब यांसारखे पोषण घटक २० ते २५ % इतके आढळून येतात.

नेहमीच्या आहारामध्ये राजगिराचा वापर केल्याने कोणत्याही प्रकारचे मेंदूचे विकार होण्याची शक्यता कमी होते. तसेच कोणत्याही प्रकारच्या मेंदूच्या विकारांमध्ये राजगिरा अत्यंत पोषक असतो. राजगिऱ्यातील मॅग्नेशियम शरीराच्या पेशींसाठी अत्यंत उपयोगाचे असते. तसेच जे लोक व्यायाम करतात त्यांच्यासाठी देखील राजगिरा अत्यंत गुणकारी आहे.

आणखी वाचा-Health Special : कोव्हिडच्या नव अवताराचे नाहक भय नको

राजगिऱ्यातील फॉस्फरस हाडांसाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे. शाकाहारी लोकांसाठी जर कॅल्शियमचे प्रमाण वाढवायचे असेल तर राजगिराचे पीठ अत्यंत उपयोगाचे आहे राजगिऱ्याचे पिठामध्ये कोलेस्ट्रॉल शून्य प्रमाणात असते तसेच सोडियमचे प्रमाण अत्यल्प असते.

लोहाचे मुबलक प्रमाण राजगिराच्या पिठाला दिवसभरातील पिठासाठी उत्तम पर्याय निवडून पर्याय म्हणून वापरता येऊ शकते.

राजगिरा विविध प्रकारात खाता येतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की राजगिरा खाताना त्यावर प्रक्रिया करून खाणे अत्यावश्यक असते. म्हणजे राजगिरा भाजून, शिजवून , भिजवून किंवा भाजून पीठ करून आहारात समाविष्ट केला जाऊ शकतो. ज्यांना ग्लुटेन ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी देखील राजगिरा अत्यंत उपयुक्त आहे.

राजगिरा कोणत्या स्वरूपात खाता येईल?

राजगिरा आणि गुळाचे लाडू

राजगिरा आणि सुकामेव्याचे लाडू

राजगिरा खीर

दूध राजगिरा मिल्कशेक

राजगिरा खिचडी

राजगिरा भाज्या

भाज्यांच्या सूपासोबत राजगिरा वापरला जाऊ शकतो

राजगिरा बिस्कीट

राजगिरा ब्रेड

वेगवेगळ्या बेकरी प्रॉडक्ट्स मध्ये राजगिरा वापरता येऊ शकतो.

राजगिरा-ज्वारीचे डोसे

राजगिरा मुगडाळ डोसे

हिरवा राजगिरा

राजगिरा केवळ कोरडा स्वरूपातच नव्हे तर पालेभाजीच्या स्वरूपात देखील आपल्याला बाजारात मिळतो. राजगिऱ्याची पालेभाजी शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. विशेषतः नुसती एका विशिष्ट प्रकारची पालेभाजी जर तुम्हाला खायला आवडत नसेल तर पालकासोबत किंवा चवळी सोबत राजगिराची पालेभाजी तयार करून खाणे अत्यंत उपयुक्त मानले जाते आणि ही भाजी खायला चविष्ट लागतेच आणि शरीरातील लोहाचे प्रमाण पूर्ववत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

तुम्ही कधी राजगिरा खाऊन पाहिलाय का?

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Multipurpose rajgira and its uses hldc mrj
Show comments