शुक्रवारी सकाळी दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरातील एका उंच इमारतीत भीषण आग लागली. मुंबई अग्निशमन दलाच्या (एमएफबी) मते, सालसेट इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली, ज्यामुळे इमारतीतून दाट धुराचे लोट पसरले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने काम सुरू केले आणि सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. “वीजपुरवठा खंडीत करण्यात आला, कारण इमारतीचा आतील भाग दाट धुराने व्यापलेला होता,” अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने द इंडियन एक्स्प्रेसला दिली. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आगीचा धूरामध्ये श्वास घेणे किती धोकादायक ठरू शकते?
दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिनचे प्रमुख सल्लागार डॉ. नरंदर सिंघला यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना स्पष्टपणे सांगितले की, “आगीच्या ज्वाळा आणि धुरामध्ये श्वास घेतल्यास श्वसनसंस्थेला गंभीर नुकसान पोहचू शकते. “गरम वायू आणि कण श्वसनमार्गाला त्रास देऊ शकतात, ज्यामुळे खोकला, घरघर आणि श्वास घेण्यास त्रास होतो. कार्बन मोनोऑक्साइडसारख्या विषारी वायूंमुळे चक्कर येणे, डोकेदुखी आणि अगदी चेतना नष्ट होणेदेखील होऊ शकते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दीर्घकालीन गुंतागुंतींमध्ये सीओपीडी (Chronic obstructive pulmonary disease) आणि दमासारखे दीर्घकालीन श्वसन रोग समाविष्ट आहेत, ज्यामध्ये फुफ्फुसांना न्यूमोनियासारख्या संसर्गाची शक्यता असते.
सर्वात जास्त धोका कोणाला आहे?(Who is most at risk?)
डॉ. सिंघला यांनी अधोरेखित केले की, लहान मुले, वृद्ध, दमा किंवा सीओपीडी असलेली आणि धूम्रपान करणारी व्यक्ती, यांना गंभीर आरोग्य समस्या होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यांच्या या गटांची फुफ्फुसे आधीच कमकुवत आहेत, ज्यामुळे त्यांना धुराच्या श्वासातून बाहेर पडणे कठीण होते.”
धुराच्या श्वासातून बाहेर पडण्यासाठी प्रथमोपचार उपाय (First aid measures for smoke inhalation)
तीव्र श्वसनाचा त्रास टाळण्यासाठी त्वरित प्रथमोपचार अत्यंत महत्त्वाचा आहे, असा डॉ. सिंघला यांनी सल्ला दिला.
- बाधित व्यक्तीला ताबडतोब ताज्या आणि मोकळ्या हवेत घेऊन जा, आपत्कालीन वैद्यकीय सेवांना संपर्क साधा.
- जर उपलब्ध असेल तर कार्बन मोनोऑक्साइड विषबाधा रोखण्यासाठी ऑक्सिजन द्या.
- किरकोळ भाजले असल्यास थंड पाणी किंवा कोल्ड कॉम्प्रेस लावा.
- वैद्यकीय मदत येईपर्यंत श्वासोच्छ्वास, नाडी आणि चेतनेच्या पातळीचे निरीक्षण करा.
मुंबईत लागलेल्या आगीचे कारण अद्याप तपासात आहे आणि अधिकारी झालेल्या नुकसानीचे पंचनामा करत आहेत. रहिवाशांना सावध राहण्याचे आणि उंच इमारतींमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.