Mona Singh Lost 15 Kgs Weight: मोना सिंगने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, तिने गेल्या ६ महिन्यांत १५ किलो वजन कमी केले आहे. ४२ व्या वर्षी १५ किलो वजन कमी करण्याबाबत यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नोएडा येथील आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सुहानी सेठ अग्रवाल यांनी काही गोष्टी इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना अधोरेखित केल्या आहेत. वयाच्या चाळिशीनंतर वजन कमी करताना शारीरिक तणावासह मानसिकतेत होणारे बदल सुद्धा कसे लक्षात घ्यायला हवेत असे सांगताना पुढे सुहानी अग्रवाल म्हणतात की, “कोणत्याही क्रॅश डाएट्सपेक्षा निरोगी सवयींना प्राधान्य देणे हे वजनावर नियंत्रणासाठी मदत करतात.”

वजन कमी करण्याचं गुपित संतुलित आहारामध्ये दडलेलं आहे. डॉ अग्रवाल सुद्धा सांगतात की, विविध फळे, भाज्या, पातळ प्रथिने, संपूर्ण धान्य आणि निरोगी फॅट्स यांचा आहारात समावेश असायला हवा. यामुळे आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात याची खात्री करून घेता येते .

Arjun Bijlanis Wife Neha Swami make 14 kg Weight Loss
Arjun Bijlani’s Wife : पत्नी नेहा स्वामीने १४ किलो वजन कसे कमी केले? अर्जुन बिजलानीने सांगितले सीक्रेट; म्हणाला, “तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करत असाल…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
How exercising for 2-3 days may help reduce risk of Alzheimer’s Alzheimer Disease exercise
व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार
vidya balan reveals her weight loss struggle in one interview
विद्या बालनने कसं घटवलं वजन? अनुभव सांगत म्हणाली, “मी जितका व्यायाम केला तितकी जास्त जाड…”
Marathi actress Aishwarya Narkar fan asks her weight
“तुमचं वजन किती?” विचारणाऱ्या चाहत्याला ऐश्वर्या नारकरांनी दिलं भन्नाट उत्तर, म्हणाल्या…
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…

वयाच्या चाळीशीत सुरक्षितपणे वजन कसे कमी करावे?

वजन व्यवस्थापनात ‘पोर्शन कंट्रोल’ म्हणजेच तुम्ही किती खात आहात हे सुद्धा महत्त्वाचे असते. तुम्ही किती खाता याकडे लक्ष देऊन, तुम्ही जास्त खाणे टाळू शकता आणि वजन कमी करण्यासाठी कॅलरीची कमतरता निर्माण करू शकता. याव्यतिरिक्त, डॉ अग्रवाल यांनी दिवसभर हायड्रेटेड राहण्याचा सल्ला दिला, कारण अनेकदा आपल्याला तहान लागलेली असताना भूक लागली आहे असे समजून आपल्याकडून जास्त खाल्ले जाऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम किती करावा?

याशिवाय व्यायाम हा वजन कमी करण्याच्या प्रवासातील मुख्य जोडीदार आहे हे तर विसरून चालणारच नाही. डॉ अग्रवाल सांगतात की, वजन कमी करण्यासाठी चालणे, जॉगिंग किंवा पोहणे आणि वेट ट्रेनिंग, अशा प्रकारांची सांगड घालायला हवी. दर आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम-तीव्रतेचा कार्डिओ व्यायाम आपण करताय असे ध्येय ठेवा. किमान दोन दिवस तरी आपण स्नायूंना बळ देण्यासाठी काम करायला हवे. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायूंचे बळ वाढते. यामुळे चयापचय वाढून आपण विश्रांती घेत असताना देखील कॅलरी बर्न करण्यास मदत होऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी झोप किती घ्यावी?

डॉ. राकेश गुप्ता, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील अंतर्गत औषधांचे वरिष्ठ सल्लागार यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, संपूर्ण पदार्थांनी युक्त संतुलित आहारासह स्नायूची शक्ती आणि चयापचयाचा वेग वाढवण्यासाठी वेट ट्रेनिंग खूप महत्त्वाचे आहे. आपण शरीराला हायड्रेटेड ठेवायला हवे तसेच वजन कमी करण्यासाठी आपण पुरेशी झोप घेताय का? आराम करताय का? हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे. रोज रात्री निदान ७ ते ९ तास दर्जेदार झोप घ्यायला हवी. खराब झोप ही भूक व तृप्तीला नियंत्रणात ठेवणाऱ्या हार्मोन्सच्या संतुलनात व्यत्यय आणू शकते.

हे ही वाचा<< मधुचंद्राच्या रात्रीला भयंकर वळण! नवरीच्या ‘या’ आरोग्य स्थितीने नवऱ्याला बसला धक्का, डॉक्टरांकडून ऐका कहाणी व उपाय

वजन कमी केल्यावर, टिकवून कसं ठेवायचं?

क्रॅश डाएट, खूप वेळ उपवास किंवा जास्त व्यायाम यामुळे कदाचित कमी वेळेत वेगाने वजन कमी होऊ शकते पण तुम्ही यातील कोणतीही गोष्ट न केल्यास/ थांबवल्यास पुन्हा एकदा वजन वाढू शकते. वारंवार वजन कमी जास्त होणे हे हानिकारक असू शकते. त्यामुळे तुम्हाला वजनावर नियंत्रण ठेवायचे असल्यास उत्तम सवयी लावणे गरजेचे आहे. याशिवाय तुम्हाला आहार व व्यायामाची दिनचर्या सेट करायला हवी. वजनात होणाऱ्या बदलांकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला हवे. याच मार्गाने आपण सुदृढ होऊ शकता. गरज भासल्यास तुमच्या शारीरिक स्थितीची माहिती असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.