आपल्यातील प्रत्येकाचे दैनंदिन जीवन व्यस्त आहे. त्यामुळे काम, जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक जण योग्य वेळेत, योग्य अन्नाचे सेवन करत नाहीत व याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. म्हणून चिंता, नैराश्य, सतत चिडचिड होणे आदी अनेक समस्या प्रत्येकाला जाणवू लागतात. तर आज एका पोषणतज्ज्ञांनी शरीरातील व्हिटॅमिन डीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक जबरदस्त हॅक सांगितला आहे.

तुमच्यातील अनेकांना मशरूम खायला नक्कीच आवडत असेल. मशरूमचा सूप, सँडविच, पिझ्झा आदी अनेक पदार्थांमध्ये आवर्जून समावेश करण्यात येतो. भारतातही मशरूमच्या विविध प्रजाती आढळून येतात. मशरूममध्ये असणारे पोषक तत्व हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. तर आज पोषणतज्ज्ञांनी मशरूमचे सेवन करण्यापूर्वी त्यांना सूर्यप्रकाशात ठेवण्याचा सल्ला दिला आहे, तर आज आपण याचबद्दल या लेखातून अधिक जाणून घेणार आहोत.

Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
What happens to your body if you eat raw onions every day
तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight
हिवाळ्यात एक-दोन आठवडे आणि एक महिना सूर्यप्रकाशापासून दूर राहिल्यास काय होईल? तज्ज्ञांनी केला खुलासा…
blonde roasts Coffee Health Benefits
Varun Dhawan: ब्लॅक कॉफी व्यतिरिक्त ‘हा’ पर्याय आतड्यासाठी ठरेल योग्य; वरुण धवनने सुचवला उपाय; पण, तज्ज्ञांचे मत काय?
जेवणापूर्वी व्हिनेगर का पितात जपानी लोक? तज्ज्ञांनी केला खुलासा….
tribal students protest nashik
नाशिक : निकृष्ट भोजन निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन

पोषणतज्ज्ञ Lyndi कोहेन यांनी एक इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी शरीरातील व्हिटॅमिन डीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक जबरदस्त हॅक सांगितला आहे. भारतीय पदार्थांमध्ये सामान्यतः आढळणारे ‘मशरूम’ हे पौष्टिकदृष्ट्या फायदेशीर आहे आणि ते व्हिटॅमिन डीच्या आपल्या शरीरातील गरजा पूर्ण करू शकतात, असा सल्ला दिला आहे.

हेही वाचा…तुम्हीसुद्धा ‘या’ वेळेत चहा-कॉफीचे सेवन करता का? थांबा! तज्ज्ञांकडून फायदे, तोटे नक्की जाणून घ्या

याविषयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने DHEE हॉस्पिटल्सचे पोषणतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ शुभा रमेश एल यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी सांगितले की, मशरूम सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा एर्गोस्टेरॉल या संयुगाचे व्हिटॅमिन D2 मध्ये रूपांतर होते. तेव्हा व्हिटॅमिन डीचे सिंथेसिस (संश्लेषण) होते. संश्लेषण या शब्दाचा अर्थ जोडणे असा होतो. निसर्गातील सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांची जोडणी यात केली जाते. ही संश्लेषणाची क्रिया प्रकाशाच्या उपस्थितीमध्ये होते, म्हणून या प्रक्रियेला प्रकाशसंश्लेषण असे म्हणतात. निसर्गात घडणारी ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना त्यांची त्वचा व्हिटॅमिन डी 3 चे संश्लेषण करते, ही पद्धत अगदी त्यासारखीच आहे. व्यक्तींची त्वचा प्रामुख्याने व्हिटॅमिन डी 3 संश्लेषण करते, तर मशरूम व्हिटॅमिन डी 2 तयार करतात. संश्लेषण व्हिटॅमिन डीची कार्यक्षमता आणि प्रकार भिन्न आहेत. व्हिटॅमिन डी 2 च्या तुलनेत मानवी रक्तातील व्हिटॅमिन डीची पातळी वाढवण्यासाठी आणि राखण्यासाठी सामान्यतः डी 3 अधिक प्रभावीपणे काम करतो.

मशरूमला सूर्यप्रकाशात ठेवल्याने व्हिटॅमिन डीची पातळी सुनिश्चित होऊ शकते?

मशरूममधील व्हिटॅमिन डी संश्लेषणाची कार्यक्षमता, मशरूमचा प्रकार, सूर्यप्रकाशाचा कालावधी, तीव्रता, भौगोलिक स्थान आणि विशिष्ट वेळ यासह अनेक घटकांवर आधारित असतो. उदाहरणार्थ – डॉक्टर शुभा रमेश एल सांगतात की, व्हिटॅमिन डी संश्लेषणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या UVB किरणोत्सर्गाची पातळी हिवाळ्याच्या महिन्यांत आणि विषुववृत्तापासून दूर असलेल्या प्रदेशांमध्ये कमी असते. माईटेक आणि पोर्टोबेलोसारख्या विशिष्ट प्रकारचे मशरूम, एर्गोस्टेरॉल व्हिटॅमिन डी संश्लेषण करण्यात योग्य ठरतात.

डॉक्टर शुभा रमेश एल सांगतात की, मशरूममधील व्हिटॅमिन डीचे प्रमाण सूर्यप्रकाशात लक्षणीयरीत्या वाढते. संशोधन असे सूचित करते की, मशरूमला माध्यान्हीच्या सूर्यप्रकाशात सुमारे एक ते दोन तास ठेवल्याने त्यांच्यातील व्हिटॅमिन डी लक्षणीयरीत्या वाढू शकते. मशरूमच्या गुणवत्तेशी आणि सुरक्षिततेशी तडजोड न करता व्हिटॅमिन डी संश्लेषण जास्तीत जास्त करण्यासाठी, त्याचा सेवनावेळी समतोल राखणेही तितकेच गरजेचं आहे. कारण जास्त एक्सपोजरमुळे पोषकद्रव्ये कोरडे किंवा खराब होऊ शकतात.

सूर्यप्रकाशातील मशरूममधील व्हिटॅमिन डी सामग्री व्हिटॅमिन डीच्या इतर आहारातील स्त्रोतांशी कशी तुलना करतात?

सूर्यप्रकाशातील मशरूम मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन D2 प्रदान करू शकतात. पण, व्हिटॅमिन D2 ची जैवउपलब्धता आणि परिणामकारकता सामान्यतः प्राणी उत्पादने आणि पूरक पदार्थांमध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमिन D3 पेक्षा कमी मानली जाते. पण, ही बाब लक्षात घेणेसुद्धा महत्त्वाचे आहे की, व्हिटॅमिन डीसाठी केवळ सूर्यप्रकाशात असलेल्या मशरूमवर अवलंबून राहणे प्रत्येकासाठी पुरेसे असू शकत नाही. तसेच हे सुद्धा लक्षात ठेवणे तितकेच महत्वाचे आहे की, सूर्यप्रकाशातील मशरूममधील व्हिटॅमिन डी सामग्री दैनंदिन व्हिटॅमिन डीच्या शरीरातील गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेव स्त्रोत म्हणूनदेखील काम करू शकते.

Story img Loader