• उन्हाळ्याच्या शेवटच्या आठ दिवसांमध्येच उन्हाळ्याच्या ऋतुचर्येचा (उन्हाळ्यात स्वीकारलेल्या आहार-विहाराचा) हळूहळू त्याग करा आणि येणार्‍या पुढच्या आठ दिवसांमध्ये पावसाळ्याच्या ऋतुचर्येचा (पावसाळ्याला योग्य आहार-विहाराचा) स्वीकार करा.
  • तुमच्या शरीराला मागच्या ऋतुला अनुकूल अशा ज्या आहारविहाराची सवय झाली होती, तो आहारविहार अचानक सोडून पुढच्या ऋतुला अनुरूप असा आहारविहार स्वीकारण्याची घाई करु नका. अर्थात पाऊस सुरु झाला म्हणून अचानक गरम पाण्याची अंघोळ सुरू करु नका, शरीराला सवय होईल अशाप्रकारे हळुहळू पाण्याचे तापमान बदला. महत्त्वाचे म्हणजे पाऊस पडायला लागला म्हणून गरमगरम चहा, भजी, तिखट-मसालेदार आहार, कोंबडी रस्सा, बिर्याणी खायला सरसावू नका. जरा थांबा, एक- दोन आठवडे पाऊस पडू दे. तुमच्या शरीराला, अग्नीला पावसाची, थंड-ओलसर वातावरणाची सवय होऊ दे, त्यानंतर आहार पचू लागेल.

हेही वाचा… Health Special: ‘Algophobia’, वेदनेचा बागुलबोवा म्हणजे काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • भूक लागल्याशिवाय जेवू नका. भूक नसताना अन्नसेवन म्हणजे रोगांना आमंत्रण हे पक्कं ध्यानात ठेवा.
  • भूक नसेल तर द्रव-आहार घ्या. पावसाचे हे पहिले दिवस सूप-यूष पिण्याचा सल्ला आयुर्वेदाने दिलेला आहे. जसे – मुगाचे कढण, मसुरचे कढण, तांदळाची पेज, शेवग्याच्या शेंगांचे कढण, मांसाचे सूप, भाज्यांचे सूप वगैरे.
  • भूक वाढली आहे हे लक्षात आले की मगच जेवण सुरु करा.
  • पहिले दोन आठवडे आपला आहार सहज पचेल असा हलका ठेवा. पावसाळ्याचा आरंभीचा काळ (प्रावृट्‌ ऋतु) हा अर्धपोटी जेवण्याचा काळ आहे.
  • जेवण जेवताना अन्न गरम असेल असे पाहा. या दिवसांत थंड जेवण पचत नाही.
  • पचायला जड अन्नपदार्थ कटाक्षाने टाळा- मैदा व मैद्याचे पदार्थ (बेकरीचे पदार्थ), दही, ताक,लस्सी,श्रीखंड वगैरे दूधदुभत्याचे पदार्थ, चीज व चीजयुक्त पदार्थ, साखर व साखरयुक्त पदार्थ,मावा-मिठाई,गोड मिष्टान्ने,बेसन, उडीद, साबूदाणा, आंबवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ,तळलेले मासे,कवचयुक्त जलचर-कोलंबी, खेकडे, कालवं, कोंबडी, मांस वगैरे. या दिवसांत विविध आरोग्य-समस्यांसाठी उपचाराला आलेले रुग्ण बहुधा हाच आहार खाऊन आजारी पडलेले असतात.

हेही वाचा… Health Special: सविराम उपास म्हणजे काय?

  • धान्यांमध्ये सुरुवातीला गहू, बाजरी अशी जड धान्ये टाळा. पचायला हलके असलेले तांदूळ व नाचणी योग्य राहील.
  • कडधान्यांमध्ये मोठ्या आकाराची कडधान्ये टाळा,जसे- चणे, वाल, पावटे, चवळी, छोले, राजमां, सोयाबीन वगैरे. ही कडधान्ये आरोग्य व अग्नी उत्तम असताना खाण्यायोग्य आहेत. मूग, मसूर, मटकी चालतील. मात्र अनेकांना मुगाने पोटफुगीचा त्रास संभवतो.
  • धान्य आणि कडधान्यं जुनी (निदान सहा महिने जुनी) असतील याची काळजी घ्या किंवा तव्यावर,कढईवर भाजून मगच वापरा.
  • जेवताना चपाती, भाकरी, भाताचे प्रमाण कमी आणि भाज्या, कोशिंबीर यांचे प्रमाण जास्त अशी सवय लावा.
  • जेवणामध्ये चटण्यांचा सढळ उपयोग करा.जसे- पुदिन्याची चटणी,लसणाची चटणी, मेथकूट, चिंचेची चटणी वगैरे.
  • क्रमाक्रमाने जेवणांत गरम मसाल्यांचा वापर हळुहळू वाढवत न्या.
  • फळांमध्ये आंबा पहिला बंद करा.ज्यांमध्ये पाणी अधिक आहे अशी कलिंगड, द्राक्षे, केळे, पेरु, चिबूड, ड्रॅगन फ़्रुट, पेअर अशी फळे टाळा. त्यातही ज्यांना सर्दी, सायनस, खोकला, दमा आणि सांधे धरणे-आखडणे, अंग जड होणे, शरीरामध्ये पाणी जमणे, अंगावर सूज असे त्रास होतात त्यांनी ही फळे कटाक्षाने टाळावीत.

हेही वाचा… Health Special: पावसाळ्यातील आरोग्यबिघाडाला ‘हे’ कारणीभूत!

  • उघड्यावरचे अन्नपदार्थ कटाक्षाने खाऊ नका.
  • पिण्यासाठी निम्मे आटवलेले पाणी वापरा. शरीराचे जडत्व, कफविकार, अपचन, पोटफुगीवगैरे पचनाचे विकार टाळण्यासाठी आटवलेले पाणी निश्चित उपयुक्त पडते. नाहीच तर निदान पितेवेळी कोमट असेल असे पाणी प्या.
  • रात्रीचे जेवण लवकरात लवकर घ्या, कसंही करुन रात्री उशिरा अन्नसेवन टाळा.
  • रात्री अर्धपोट भरेल इतकाच आहार घ्या.
  • रात्री जागरण टाळा.
  • सकाळी सूर्योदयाच्या आधी उठा.
  • दिवसा झोपणे निषिद्ध समजा, विशेषतः स्थूल शरीराच्या, मधुमेह, श्वसनविकार, कफविकार, सांध्यांचे आजार यांनी ग्रस्त असलेल्यांनी.
  • रात्रपाळी करणार्‍यांनी दिवसा झोपायचे झालेच तर तर अन्नसेवन करण्यापूर्वी झोपा.
  • सकाळी (किंवा सायंकाळी) हलका व्यायाम करा.
  • पावसाळ्यामधील विविध प्रकारचे श्वसनविकार व अन्य लहानसहान आजार टाळण्याचा सोपा उपाय म्हणजे नियमित योगासने व प्राणायाम करणे.
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Must do this to stay healthy at the beginning of monsoon hldc dvr
Show comments