हायड्रेटेड राहणे अत्यंत गरजेचे आहे हे सर्वांनाच माहित आहे. हायड्रेट राहिल्याने तुम्हाला जागृक मनापासून चमकदार त्वचेसाठी उत्तम शारीरिक कार्यक्षमतेपर्यंत अनेक आरोग्य फायदे आहेत, हे सर्वज्ञात सत्य आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की साधे पाणी पिणे हा डिहायड्रेशनवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग असू शकत नाही? हे आम्ही नाही तर हेल्थ आणि वेलनेस तज्ज्ञ कॉरी रॉड्रिग्ज यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे. “साधे पाणी हायड्रेट करण्याचा सर्वोत्तम मार्ग नाही. मी दररोज एक गॅलन पाणी पितो (ते खूप जास्त होते), त्याने कधीही इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता पुन्हा भरुन निघत नाहीत. याचा अर्थ असा होतो की, मी माझा दिवस लघवी करण्यात आणि ही आवश्यक खनिजे सतत बाहेर काढण्यात घालवला,” असे त्यांनी व्हिडिओमध्ये सांगतिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय?

इलेक्ट्रोलाइट्स हे मुळात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे खनिजे आहेत जे पाण्यात विरघळल्यावर पटकन उर्जा देतात. आपल्या शरीराला हे इलेक्ट्रोलाइट्स आपण जे अन्न खातो आणि पितो त्यातून मिळतात. ते विविध शारीरिक कार्ये पार पाडण्यात मदत करतात जसे की पोषक तत्वे पेशींमध्ये हलवणे, पेशींमधून कचरा काढणे, खराब झालेल्या ऊतींची पुनर्बांधणी करणे, शरीरातील pH पातळी संतुलित करणे आणि मज्जातंतू, स्नायू, हृदय आणि मेंदूची कार्यक्षमता नियंत्रित करणे, इतर अनेक गोष्टीं.

पाण्यामध्ये साधारणपणे ही खनिजे मिसळलेली असतात परंतु शुद्धीकरणामुळे त्यातील काही नष्ट होऊ शकतात. तसेच, व्यायामासारख्या तीव्र शारीरिक हालचालींमध्ये गुंतलेले असताना, अतिसार किंवा उलट्या झाल्यास शरीराला घामाद्वारे इलेक्ट्रोलाइट्स नष्ट होतात.

यामुळे, रॉड्रिग्ज यांनी चांगल्या हायड्रेशनसाठी पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स घेण्याचा पर्याय सुचवला आहे. “योग्यरित्या हायड्रेटेड होण्यासाठी तुम्हाला पाण्याबरोबर इलेक्ट्रोलाइट्सची आवश्यकता आहे. प्रत्येक वेळी तुम्ही लघवी करता तेव्हा तुम्ही सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असलेले इलेक्ट्रोलाइट्स लघवी करत आहात आणि तुम्ही पाणी बाहेर काढत आहात. परंतु बहुतेक लोक फक्त पाणी पित आहेत. त्यामुळे तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितके जास्त तुम्ही लघवी कराल, तुम्हाला इलेक्ट्रोलाइट्सची जास्त गरज आहे,” त्याने शेअर केले.

हेही वाचा : आंब्यामुळे वजन वाढू शकते का? पोषणतज्ज्ञांनी सांगितले एका दिवसाला…

याबाबत सहमती दर्शविताना, माहीम – फोर्टिस असोसिएटचे एस.एल. रहेजा हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिनचे सल्लागार, डॉ. निखिल कुलकर्णी यांनी सांगितले की, “पुरुषाच्या शरीराच्या वजनाच्या जवळपास 65 टक्के आणि स्त्रीच्या शरीराच्या वजनाच्या 60 टक्के पाण्याचा वाटा असतो. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि क्लोराईड हे सर्व इलेक्ट्रोलाइट्स पाण्यात आढळतात, परंतु नैसर्गिक झरे आणि डोंगराच्या पाण्यात ते मुबलक प्रमाणात आढळतात. शुद्ध पिण्याच्या पाण्यात आवश्यक इलेक्ट्रोलाइट नसू शकतात.

डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले की, पिण्याच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स वापरण्यासाठी नैसर्गिक मार्ग असले तरी, सावध असणे आवश्यक आहे कारण शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे कमी आणि उच्च स्तर दोन्ही हानिकारक असू शकतात. “जास्त सोडियममुळे हायपरनेट्रेमिया होतो आणि जास्त पोटॅशियममुळे हायपरक्लेमिया होऊ शकतो. याचा मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात,” त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

हैेही वाचा : रोज दही खावे का? तुम्हाला माहित असले पाहिजेत ‘हे’ फायदे-तोटे

तुमच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स कसे वापरावे

असे करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे पाण्यात एक चिमूटभर “मीठ” घालणे किंवा आपण आपल्या पाण्यात “आले आणि कलिंगड” देखील घालू शकता. डॉ. कुलकर्णी म्हणाले की, नारळ पाणी हे इलेक्ट्रोलाइट पाण्याचा सर्वात पौष्टिक स्त्रोत आहे ज्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

घरी इलेक्ट्रोलाइट पाणी कसे तयार करावे

डॉ. कुलकर्णी यांनी घरच्या घरी हेल्दी इलेक्ट्रोलाइट वॉटर तयार करण्याची सोपी रेसिपीही शेअर केली. “घरी इलेक्ट्रोलाइट पाणी तयार करण्यासाठी अर्धा कप संत्र्याचा रस, 2 कप पाणी, एक चतुर्थांश कप लिंबाचा रस, एक चिमूटभर मीठ आणि 2 चमचे मध (पर्यायी) घ्या”.

त्याच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल बोलताना, रॉड्रिग्ज सांगितले, “हे संतलून साध्या केल्यापासून मला माझ्या दैनंदिन पथ्यांमध्ये इलेक्ट्रोलाइट्स वापरल्यामुळे खूप फरक जाणवतो आहे”.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Myth or fact drinking plain water is not the best way to hydrate snk
Show comments