Nana Patekar Fitness Secret : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या साध्या व निरोगी जीवशैलीमुळे ते नेहमी चर्चेत असतात. ७५ वर्षांचे नाना पाटेकर यांनी नुकतेच एका मुलाखतीत फिटनेसविषयीचे त्यांचे विचार मांडताना स्वत:च्या सुदृढ शरीराचे रहस्य उलगडून सांगितले. त्यांनी सांगितले की, ते दररोज दीड ते दोन तास व्यायाम करतात. (Nana Patekar shared his fitness secret at 75)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाना पाटेकर म्हणाले, “शरीर हे माझं शस्त्र आहे आणि वयाच्या ७५ व्या वर्षी मी अजूनही सुदृढ आहे. मी अजूनही २-४ लोकांना खांद्यावर घेऊ शकतो. मला अजूनही आरशासमोर उभे राहणे (ट्राइसेप फ्लेक्सची नक्कल करत) आवडते आणि हे आपण करायला पाहिजे. आपल्याला आपण आवडलो ना, तर जगण्याची गंमत काहीतरी वेगळी असते. आरशात बघताना आपल्याला किळस आली, तर जगण्यातली गंमत संपली.”

हेही वाचा : Stress Reliever : तणाव दूर करण्यासाठी ही थिअरी करेल तुम्हाला मदत; दिवसातून दोन ते तीन मिनिटे करा ‘ही ‘गोष्ट, वाचा, डॉक्टरांचे मत

नाना पाटेकर पुढे फिटनेसविषयी सांगतात, “तुम्ही जिममध्ये बेंच प्रेस करता, बायसेप कर्ल किंवा स्कॉट्स करतात. पण तुम्हाला जिममध्ये जाता येत नाही, तर बैठका काढा आणि सूर्यनमस्कार मारा.” TheObliques या अकाउंटवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

वयानुसार नियमित व्यायाम करण्याविषयी आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊ.

हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट व सल्लागार डॉ. सुधीर कुमार (Dr. Sudhir Kumar) सांगतात, “७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी अॅरोबिक, स्ट्रेंथ ट्रेनिंग व स्ट्रेचिंग नियमित केले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सल्ल्यानुसार, आठवड्यातून १५० मिनिटे मध्यम आणि ७५ मिनिटे तीव्र प्रकारचा व्यायाम करावा. “

हेही वाचा : Amla Tea Benefit : छातीत जळजळ होतेय? मग घरच्या घरी बनवा आवळ्याचा चहा; कसा तयार करायचा ते घ्या जाणून

अॅरोबिक व्यायाम

दररोज ३० मिनिटे चालावे. दुसरा चांगला अॅरोबिक व्यायाम म्हणजे सायकलिंग. जर तुम्हाला पोहण्याची सवय असेल, तर तुम्ही याचा व्यायामामध्ये समावेश करू शकता. पण, या वयात जास्त अंतर धावणे टाळले पाहिजे.

स्ट्रेंथ ट्रेनिंग

दुसरा व्यायाम म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग. हा व्यायाम खूप उपयुक्त आहे. तुम्ही पुश-अप्स किंवा स्क्वॉट्स करू शकता, तसेच डंबलसारखे वजन उचलू शकता.

स्ट्रेचिंग

तिसऱ्या प्रकारचा व्यायाम म्हणजे स्ट्रेचिंग. हा व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. कारण- या वयात सांधे खूप कडक होतात. तसेच या लोकांनी नियमित योगा केला पाहिजे. या वयात तोल जाऊन पडण्याची सर्वांत जास्त भीती असते. त्यामुळे एका पायावर उभे राहण्यासारखा संतुलित व्यायाम फायदेशीर ठरू शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar shared his fitness secret at 75 he still like posing tricep flex in front of the mirror ndj