National Dentist’s Day: दात पांढरे शुभ्र असतील तर व्यक्तीचा चेहरा आकर्षक दिसतो. यासाठी आपल्याला दातांची काळजी योग्य पद्धतीने घेणं गरजेचं असते. आपले दात चांगले असतील तर आपलं आरोग्यसुद्धा चांगले राहते. पण, गोड जास्त खाणे किंवा वयानुसार माणसांना दातांच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. किडलेले दात रूट कॅनॉल ट्रीटमेंटने व्यवस्थित केले जातात, तर अक्कल दाढेची शस्त्रक्रिया करताना तो दात कट करून काढून टाकावा लागतो. दात काढणे, गम शस्त्रक्रिया, इम्प्लांट शस्त्रक्रिया आदी शस्त्रक्रिया रुग्णांच्या करण्यात येतात. या शस्त्रक्रिया करताना रुग्णांच्या तोंडामध्ये रक्त (ब्लिडिंग) येते, तर यावर उपाय म्हणून अनेक डॉक्टर रुग्णांना आईस्क्रीम खाण्यास सांगताना दिसून येतात.

तर तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का ? तोंडामध्ये कुठलीही शस्त्रक्रिया (सर्जरी) केल्यानंतर डॉक्टर आईस्क्रीम खाण्याचा सल्ला का देतात? आईस्क्रीम खाण्याचे काय फायदे आहेत? तर याबद्दल आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत. ६ मार्च रोजी म्हणजेच उद्या नॅशनल डेंटिस्ट डे (National Dentist’s Day 2024) आहे. या दिवसाच्या निमित्ताने डॉक्टर विजय कदम यांनी लोकसत्ता डॉट कॉमबरोबर संवाद साधताना याबद्दल माहिती सांगितली आहे. दादर, शिवाजी मंदिर येथे डॉक्टर विजय कदम यांचे क्लिनिक आहे. तर डॉक्टर म्हणतात की, आम्ही रुग्णांना दातांची कुठलीही शस्त्रक्रिया केल्यानंतर आईस्क्रीम खायला सांगतो, त्यामागे दोन उद्दिष्टये असतात.

Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
menstrual leave mva provision
मासिक पाळीच्या रजेचा विषय पुन्हा चर्चेत; भारतात काय आहेत नियम? कोणकोणत्या राज्यांत रजेची तरतूद?
No one will be able to change constitution of Dr Babasaheb Ambedkar in country says nitin gadkari
गडकरी म्हणतात,‘ डॉ. आंबेडकर यांचे संविधान बदलविण्याचा प्रयत्न…’
Chennai Doctor Attack
Chennai : कॅन्सरग्रस्त महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकुने हल्ला; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
singles day in china
11/11: याच दिवशी का साजरा केला जातो ‘सिंगल्स डे’?

१. आईस्क्रीम हा एक लिक्विड पदार्थ (फूड) आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया केल्यानंतर तुम्ही ते खाल्लं की, तुमच्या तोंडात जखम होत नाही. आईस्क्रीम तोंडात एक थंडगार (चिल्ड) इफेक्ट देते. म्हणजेच जर कधी शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमच्या तोंडात रक्तप्रवाह सुरू झाला आणि तुम्ही आईस्क्रीम खाल्ले तर रक्तप्रवाह थांबण्यास मदत होते.

२. दुसरे म्हणजे आईस्क्रीम शरीरासाठीसुद्धा चांगले असते. यामुळे तुम्हाला पोषकतत्वे (Nutrients) मिळतात. जेव्हा एखादा रुग्ण दात काढतो किंवा एखादी शस्त्रक्रिया करतो तेव्हा खाण्या-पिण्याच्या बाबतीत काही नियम पाळावे लागतात. तुम्ही शस्त्रक्रिया केल्यानंतर गरम, कडक पदार्थ लगेच खाऊ शकत नाही, कारण यामुळे तुमच्या तोंडात रक्तप्रवाह होण्याची शक्यता असते. त्यामुळे आईस्क्रीम खाण्याचा सल्ला दिला जातो.

हेही वाचा…मधुमेही रुग्णांनी ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यास नियंत्रित राहील रक्तातील साखर; वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

डॉक्टर विजय कदम म्हणाले की, शस्त्रक्रियेनंतर शरीरात वेदनेमुळे अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो, त्यामुळे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरात एक ऊर्जा निर्माण होते. तसेच रुग्णांना नेहमी वॅनिला आईस्क्रीम खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण हे आईस्क्रीम प्लेन असते. इतर फ्लेवर्सच्या आईस्क्रीममध्ये ड्रायफ्रुटस किंवा काही टोकदार पदार्थ असतात, जे तोंडात हानी पोहचवू शकतात. त्यामुळे असे आईस्क्रीम टाळून प्लेन म्हणजेच वॅनिला आईस्क्रीम खाण्याचा सल्ला दिला जातो. तर आज आपण या लेखातून दातांची एखादी शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टर आईस्क्रीम खाण्याचा सल्ला का देतात हे पाहिलं.