हिंदू संस्कृतीत सण, उत्सवांना खूप महत्त्व आहे. अनेक सण साजरे करताना लोक उपवास किंवा व्रत करतात. त्यातील बहुतांश उपवास एक दिवसाचे असतात; परंतु आजपसासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवात केले जाणारे उपवास हे नऊ दिवसांचे असतात. अनेक भाविक हे उपवास करतात; शिवाय काही लोक हे उपवास खूप कडक पद्धतीने करतात. परंतु, सलग नऊ दिवस उपवास करणं काही लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायकदेखील ठरू शकतं. नवरात्रीत उपवास करताना कोणत्या लोकांना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांनी या कालावधीत कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा? याबाबतची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजपासून यंदाच्या शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या काळात भाविक देवीची उपासना करतात, तसेच उपवास करतात. पण नवरात्रीचे व्रत करताना हृदयाच्या आरोग्याशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी जास्त काळजी घेणे आवश्यक का आहे. याबाबतची माहिती डॉ. अभय सोमाणी, हृदयरोगतज्ज्ञ रुबी हॉल क्लिनिक यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली आहे. ते म्हणाले, “नवरात्रीच्या काळात उपवास करणे हृदयाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांसाठी काही आव्हानं निर्माण करू शकतात.”

हेही वाचा- सावकाश की जलद? आधुनिक जीवनशैलीत जेवणाची योग्य आणि फायदेशीर पद्धत कोणती? डॉक्टर सांगतात….

उपवासामुळे रक्तातील साखर, रक्तदाब आणि एकूणच हृदयाच्या आरोग्याचं नाजूक संतुलन बिघडू शकतं. जेवण टाळणं, तसंच कमी पाणी पिणं हे उपवासादरम्यान सामान्य आहे. मात्र, यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढू शकतात, असंही डॉक्टरांनी सांगितलं. तसेच अनेक तज्ज्ञांचं याबाबत एकमत झालं आहे की, हृदयरोग्यांनी उपवास करणं टाळावं किंवा उपवास करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. कारण- त्यांच्या आरोग्यावर उपवासाचा दीर्घकालीन प्रभाव पडू शकतो.

अचानक केलेला आहारातील बदल आणि उपवासादरम्यान काही पदार्थांचं जास्त सेवन केल्यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो. विशिष्ट पोषक घटकांमध्ये अचानक होणारी वाढ किंवा सोडियमच्या पातळीतील बदलांमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या प्रणालीवर ताण येऊ शकतो; ज्यामुळे गुंतागुंत होऊ शकते, असंही डॉ. सोमाणी यांनी स्पष्ट केलं. मात्र, असं असतानाही ज्या लोकांना उपवास करायचीच इच्छा आहे, अशा लोकांसाठी सोमाणी यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत; ज्या तुम्ही लक्षात ठेवू शकता.

हृदयरोगी लोक उपवास करणार असल्यास त्यांच्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

  • द्रवपदार्थांचे सेवन करून हायड्रेशनला प्राधान्य द्या.
  • फळे, भाज्या व काजू यांसारख्या पौष्टिकतेने समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश असलेल्या संतुलित आहाराची निवड करा; ज्यामुळे तुमच्या शरीरातील आवश्यक ऊर्जेची पातळी कायम राखण्यात आणि आवश्यक जीवनसत्त्वे शरीराला प्रदान करण्यास मदत होऊ शकते.
  • रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करा. विशेषत: मधुमेह असलेल्या लोकांनी उपवासाच्या कालावधीत साखरेच्या पातळीची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी हे महत्त्वाचे ठरू शकते.
  • हलके व्यायाम करा; जे फिटनेस आणि आवश्यक ऊर्जेची पातळी कायम राखण्यास मदत करतील. मात्र, उपवासादरम्यान जास्त तीव्रता असलेले व्यायाम करणे टाळा.

उपवास करताना वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. विशेषतः ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी संबंधित दीर्घकाळ उपचार घ्यावे लागणारे आजार (Underlying Health condition) आहेत, त्यांनी उपवासादरम्यान योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri 2023 can heart disease patients fast what care should be taken during fasting find out from the doctor jap
Show comments