आजकाल बहुतांश लोकांमध्ये वाढते वजन हा भेडसावणारा प्रश्न आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे वजन वाढण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत. बैठे कामाचे स्वरूप, पुरेसा व्यायाम न करणे, जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, आहारात जंक फुडचा भडिमार यामुळे वजन लगेच वाढते. वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोकं अनेक उपायही करतात, पण दरवेळेस यश मिळतेच असे नाही. वजन वाढणं ही केवळ एक प्रक्रिया नसून ती आरोग्यविषयक मोठी समस्या आहे. वजन आणि चरबी वाढल्यानं रक्तदाब, हृदयाशी संबंधित समस्या, मधुमेह, ब्रेन स्ट्रोक या आजारांचा धोका असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विशेषत: या बदलत्या जीवनशैलीत लठ्ठपणाने बहुतांश लोकांना वेठीस धरले आहे. अनेकदा असे दिसून आले आहे की, लोकं जिममध्ये तासनतास घाम गाळतात, वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करतात. पण, कधी कधी यातूनही त्यांना फायदा मिळत नसतो. आता डॉ. मिकी मेहता यांनी इंडियन एक्स्प्रेसला काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. कोणत्या आहेत या टिप्स ज्या तुम्हाला रूटीनमध्ये वापरून झटपट फॅट बर्न करण्यासाठी मदत करू शकतात, आज आपण जाणून घेऊया…
डॉ. मिकी मेहता सांगतात, आपल्याला वयानुसार आपली दिनचर्या बदलण्याची आवश्यकता आहे. निरोगी वजन राखणे आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारणे हे खेळ, नृत्य किंवा एरोबिक्समध्ये व्यस्त राहून पूर्ण केले जाऊ शकते. मध्यम आणि जोमदार-तीव्रतेची शारीरिक क्रिया तुमच्या हृदयाच्या स्नायूंना बळकट करते. परिणामी, तुमच्या स्नायूंमध्ये अधिक रक्त वाहते आणि तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. धावणे, कार्डिओ किकबॉक्सिंग, सायकलिंग, पोहणे, दोरीवर उडी मारणे आणि नृत्य हे सर्व प्रकारचे एरोबिक व्यायाम आहेत. विसाव्या वर्षातील तरुण हे प्रकार अवलंबू शकतात.
(हे ही वाचा : पुढील ३० वर्षात ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढणार; ‘या’ लोकांना सर्वाधिक धोका, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर )
जम्पिंग जॅक हा अंतिम कार्डिओ व्यायाम आहे आणि त्याचे बरेच फायदे आहेत. जम्पिंग जॅक, ज्याला स्टार जंप म्हणूनही ओळखले जाते. हा एक शारीरिक उडी मारण्याचा व्यायाम आहे. तिशीतील लोकांसाठी हे फायदेशीर ठरू शकते. जर आपल्याला फुल बॉडी वर्कआउट करायचं असेल, तर जम्पिंग जॅक हा व्यायाम आपल्याला वजन कमी करण्यास मदत करू शकते. जम्पिंग जॅक एक तीव्र शारीरिक व्यायाम आहे आणि प्रामुख्याने उडीचा समावेश आहे. हा व्यायाम संपूर्ण शरीराला लक्ष्य करतो आणि वेगाने हालचाल करण्यासाठी मदत करतो.
चाळिशीसाठी सूर्यनमस्कार फायदेशीर ठरू शकतो. हा एक उत्तम व्यायाम आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सूर्यनमस्कार फायदेशीर आहे. सूर्यनमस्कार घातल्याने हाडे मजबूत होतात. हा व्यायाम नियमितपणे केल्याने तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. सूर्यनमस्कार घातल्याने ब्लड सर्क्युलेशनमध्ये सुधारणा होते. ब्लड सर्क्युलेशन चांगले राहिल्यामुळे याचा फायदा शरीराच्या विविध अवयवांना होत असतो. नियमित सूर्यनमस्कार घातल्याने पचनसंस्थेचं कार्य सुधारण्यास मदत होते.
निरोगी आयुष्यासाठी नियमित व्यायाम करणं हे खरोखरच आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. बैठ्या जीवनशैलीतून उद्भवणारे आजार टाळायचे असतील, तर नियमितपणे व्यायाम केलाच पाहिजे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. विंडमिल हादेखील एक अतिशय सौम्य आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी व्यायाम आहे, जो तुमच्या कॅलरी आउटपूटमध्ये मदत करू शकतो. चयापचय क्रिया वाढवण्यासाठी मदत करू शकतो आणि तुमच्या शरीराला ऊर्जा देतो. पन्नाशीतील लोकं या व्यायामाचा अवलंब करू शकतात.
स्ट्रेंथ ट्रेनिंग हा एक प्रकारचा शारीरिक व्यायाम आहे, जो स्नायूंच्या वाढीसाठी, चयापचय सुधारण्यासाठी मदत करू शकतो. वर्कआउट रुटीनमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समावेश केल्यास स्नायूंचे आरोग्य निरोगी राहते आणि शरीरातील अतिरिक्त चरबीदेखील घटण्यास मदत मिळते. साठीतील लोकांसाठी हा व्यायाम महत्त्वाचा ठरू शकतो.
वजन कमी करायचे असेल तर नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे. कारण या व्यायामामुळे वजन कमी होण्यासह आरोग्यदेखील निरोगी राहण्यास मदत मिळते, असे डाॅक्टर सांगतात.