Never Skip Meals: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळे डाएट फॅड अनेकजण फॉलो करतात. त्यातीलच एक म्हणजे दिवसातून केवळ एकाच वेळेस जेवण करणे. विशेषतः नवरात्रीच्या कालावधीत अनेकांना पूर्ण उपवास जमत नसल्यास ते एकदा जेवून व्रत करतात. या पद्धतीने अन्नाचे सेवन व परिणामी कॅलरी सुद्धा कमी करता येत असल्याने वजन कमी करता येईल असा अनेकांचा समज असतो. मात्र अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही वेळेचे जेवण टाळल्यास आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. इंडियन एक्सस्प्रेसने भक्ती सामंत, मुख्य आहारतज्ज्ञ, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल यांच्या हवाल्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.

जर तुम्ही कमी वेळा खात असाल तर तुम्ही कमी कॅलरीचे सेवन कराल आणि तुमचे शरीर ऊर्जेसाठी साठवलेल्या फॅट्स वापरू लागेल व वजन कमी होईल असा साधा विचार यामागे आहे. पण यामुळे चयापचयातील गुंतागुंत वाढू शकते. दुपार किंवा रात्रीचे जेवण व त्यातही विशेषतः: ब्रेकफास्ट टाळल्यास वजन कमी करण्याऐवजी अन्य विपरीत परिणाम होऊ शकतात. याविषयी जाणून घेऊया..

Here Is How You Can Grow Your Eyebrows Faster and Thicker 10 tips
कमी खर्चात भुवया छान दाट व जाड करण्याचे १० सोपे उपाय; कसा वापर करायचा जाणून घ्या
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
What Happens If You Drink Coconut Water, Lemon Water, Ginger Shot Every Day
नारळ पाणी, लिंबू पाणी, आले गोळीचे रोज सेवन केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या
Making modak for beloved bappa
लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवत आहात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या मोदकाचे फायदे
Which finger should you get a glucometer test done on?
तुम्हालाही डायबिटीज आहे का? मग टेस्ट करताना कोणत्या बोटावर करायची? जाणून घ्या
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
This is what happens to the body when you suddenly stop taking diabetes medication Take care in advance to avoid diabetes
डायबिटीजची औषधे घेणे अचानक बंद केल्यावर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात
Doctor Answered On what basis your left or right arm is chosen for blood donation
रक्तदानासाठी तुमचा डावा किंवा उजवा निवडावा हे कोणत्या आधारावर ठरवले जाते? तज्ज्ञांनी केला खुलासा

पोषक तत्वांची कमतरता: जेवण वगळणे म्हणजे आपल्या शरीराला योग्यरित्या काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या पोषक तत्वांचा पुरवठा कमी करणे. उदाहरणार्थ, नाश्ता हा दिवसात सर्वात महत्त्वाचा असतो. दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला दिवसभरासाठी आवश्यक असणारी जीवनसत्त्वे, खनिजे आणि ऊर्जा ब्रेकफास्टमधून मिळते. जेव्हा तुम्ही हा नाश्ताच वगळता, तेव्हा तुम्ही शरीराला पोषक तत्व देत नाही व कालांतराने त्यांची कमतरता निर्माण होऊ शकते.

थकवा आणि ऊर्जेचा अभाव: जेवण वगळल्याने तुमची उर्जा पातळी कमी होऊ शकते. अन्नाच्या स्थिर पुरवठ्याशिवाय, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे थकवा वाढतो व एकाग्रता कमी होते.

चयापच मंदावणे व स्नायूंचे नुकसान: जेवण वगळल्याने चयापचय मंद होऊ शकते. जेव्हा तुम्ही जास्त वेळ खात नाही, तेव्हा तुमचे शरीर ऊर्जा वाचवून ठेवण्यासाठी कॅलरीज फॅट्स वाचवून ठेवते. शरीराला ऊर्जेसाठी स्नायूंचा वापर करू लागतो व त्यामुळे अनेकदा त्वचा सैल पडणे, सांधे दुखी, असे त्रास वाढतात.

जास्त चरबीयुक्त आणि साखरयुक्त पदार्थांची लालसा: जेव्हा तुम्ही जेवण वगळता, विशेषत: नाश्ता, तेव्हा तुमचे शरीर भूकेचे हार्मोन्स वाढवून प्रतिक्रिया देऊ लागते. नियमित आहार घेतल्याशिवाय, तुमची रक्तातील साखर कमी होऊ शकते, ज्यामुळे थकवा, चिडचिड आणि उच्च-कॅलरी, साखरयुक्त पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. परिणामी जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा गरजेपेक्षा अधिक खाल्ले जाते व कॅलरीजचे गणित बिघडतेच.

वाढलेले कॅलरी सेवन: जेवण वगळल्याने आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी खर्च होऊ शकतात. जेव्हा तुम्ही जेवण चुकवता, तेव्हा तुम्हाला नंतर जास्त भूक लागण्याची शक्यता असते, ज्यामुळे तुम्ही अधिक प्रमाणात व नुकसानदायक पदार्थ खाण्याची शक्यता असते.

वजन पुन्हा वाढणे: जेवण वगळणे दीर्घकाळ टिकत नाही. बहुतेक लोक जे या पद्धतीचा अवलंब करतात व अखेरीस त्यांच्या जुन्या खाण्याच्या सवयींवर परत येतात, ज्यामुळे अनेकदा वजन वाढते किंबहुना पूर्वीपेक्षा जास्त वाढते.

हे ही वाचा<< Hair Loss & Belly Fat: ओटीपोट सुटलंय व केस गळतायत; ‘हे’ आहे कारण! शरीरात पसरण्याआधी कसा करावा उपाय?

दरम्यान सर्वच आहारतज्ज्ञ सुचवत असल्याप्रमाणे, वैविध्यपूर्ण आणि पोषक तत्वांनी युक्त आहार हाच वजन व आरोग्य संतुलित ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. तरीही हेल्थकेअर प्रोफेशनल किंवा नोंदणीकृत आहारतज्ञांशी सल्लामसलत करून मार्गदर्शन मिळवणे हे तुमच्या शरीराच्या गरजांसाठी सर्वोत्तम ठरेल.