Triply Cookware: हल्ली बाजारात स्टेनलेस स्टीलपासून कास्ट आयर्न आणि नॉन-स्टिकपर्यंत विविध कूकवेअरचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. परंतु, आता यामध्ये आणखी एका नव्या पर्यायाचीदेखील भर पडली आहे. हा पर्याय त्या लोकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे, जो निरोगी आणि सृदृढ आयुष्य जगण्याला प्राधान्य देतो. ट्रिपली कूकवेअरमध्ये तीन थर असल्याचा दावा करण्यात आला आहे; जे अन्नाचे पौष्टिक मूल्य अबाधित ठेवण्यास मदत करतात. कोटिंग्ज आणि रसायनमुक्त असल्यामुळे या कूकवेअरला त्याच्या काही समकक्षांपेक्षा डिशवॉशर अनुकूल असल्याचेदेखील मानले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरे तर, त्याची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, अनेक शेफ आणि दिग्गज लोक त्याची शिफारस करीत आहेत. म्हणून आपण सर्वांनी याचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात करावा का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे ठरवले.

डॉ. भावना पी, मुख्य आहारतज्ज्ञ, ग्लेनेगल्स हॉस्पिटल, हैदराबाद यांनी इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमला सांगितले की, “ट्रिपली डायट कूकवेअर हे फूड-ग्रेड स्टेनलेस स्टीलचे दोन थर (बाह्य व आतील) आणि ॲल्युमिनियमचा एक थर (मध्यभागी) अशा तीन थरांनी बनवण्यात आलेला आहे. त्यांनी सांगितले, “याचे स्टेनलेस स्टीलचे थर अन्न आणि कूकवेअरमधील रासायनिक प्रतिक्रियांना प्रतिबंधित करतात आणि अन्नाची पौष्टिकता अबाधित ठेवतात.”

डॉ. भावना यांनी सांगितले, “हे कूकवेअर उष्णता समान रीतीने वितरित करण्यास मदत करते. त्यामुळे जळण्याची आणि असमान अन्न शिजविण्याची जोखीम कमी होते; ज्यामुळे पोषक तत्त्वांचा नाश होतो. या गुणवत्तेमुळे अन्नामधील अतिरिक्त तेलाची गरजदेखील कमी होते, त्यामुळे संतुलित आहार राखण्यास मदत होते. याव्यतिरिक्त ट्रिपली कूकवेअर टिकाऊ असते आणि बऱ्याचदा हानिकारक कोटिंग्जपासून मुक्त असते; जे कालांतराने खराब होऊ शकते.”

पुढे त्यांना सांगितले, “तसेच हे उष्णता टिकवून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.”

हेही वाचा: तरुणांनादेखील होऊ शकतो मोतीबिंदू? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारणे आणि लक्षणे

काय लक्षात घ्यावं?

डॉ. भावना यांनी सांगितले की, हे कूकवेअर जास्त गरम करणे टाळावे. “त्यामुळे स्टेनलेस स्टीलमधून निकेल आणि क्रोमियम या मिश्रधातूची कमी प्रमाणात गळती होऊ शकते.”

पण, ट्रिपल डाएट कुकवेअर सिंगल-लेयर स्टेनलेस स्टील किंवा नॉन-स्टिक पॅनच्या तुलनेत अनेकदा महाग असते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New cookware healthier than stainless steel non stick know what the experts say sap