दोन ते तीन वर्षांपूर्वी भारतासह संपूर्ण जगभरात करोना महामारीने थैमान घातले होते. अनेक नागरिकांना या महामारीमध्ये आपला जीव गमवावा लागला होता. जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यात भारताचाही समावेश होता. सध्या करोना महामारीचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे. मात्र, हा विषाणू त्याचे स्वरूप कशा प्रकारे बदलत आहे, यावर आरोग्य संस्था आणि शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत. अमेरिकेमध्ये नवीन व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यासाठी फायझर आणि मॉडर्नाच्या करोना-१९ बुस्टर डोसची शिफारस करण्यात आलेली आहे. ज्याच्या माध्यमातून या व्हेरिएंटला रोखले जाऊ शकते. खास करून हिवाळ्यात होणारी वाढ रोखण्यासाठी उपयोगी पडू शकते. USFDA ने Eris आणि Pirola सारख्या अलीकडे आलेल्या व्हेरिएंटविरुद्ध फायझर आणि मॉडर्नाच्या करोना-१९ बुस्टर डोसचा प्रभाव स्पष्ट केला आहे. इतर फ्लू लसींप्रमाणेच करोना-१९ डोससाठी वेळोवेळी अपडेट आवश्यक असू शकतात.
देशात सध्या कोविड-१९ महामारीची अत्यंत किरकोळ प्रकरणे नोंदवली जात आहेत. म्हणजे प्रकरणे कमी असूनदेखील विशेष करून इतर आजार असलेल्या लोकांसाठी डॉक्टर स्ट्रेन स्पेसिफिक बूस्टर घेण्याचे सुचवतात. एक स्ट्रेन स्पेसिफिक बुस्टर डोससह इतर आजार असणाऱ्या रुग्णांना लक्षणीय मदत करू शकतो. या श्रेणीतील रुग्णांनी न्यूमोनिया आणि फ्लूचे डोस घेतले पाहिजेत, ज्यामुळे श्वसनाच्या आजारांचे त्रास कमी होऊ शकतात, असे इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरंजित चॅटर्जी यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ शी बोलताना सांगितले.
काही दिवसांनी हिवाळा ऋतू सुरू होणार आहे. यामध्ये कदाचित कोविड-१९ च्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते. आम्हाला बूस्टर शॉट्सचीदेखील आवश्यकता आहे का?
कोविड -१९ हा विषाणू इन्फ्लूएन्झासारखाच आहे. यामध्ये होणारे बदल लक्षात घेता दरवर्षी अपडेटेड फ्लू डोस घेणे फायदेशीर ठरते. यासाठी आम्हाला अपडेटेड डोसची आवश्यकता असेल. कारण व्हायरसचा जुना विषाणू आणि त्याच्याशी लढण्यासाठी घेतलेल्या लसीतून मिळालेली प्रतिकारशक्ती कमी होईल. इन्फ्लूएंझाची लस दरवर्षी अपडेट केली जाते. तसेच करोना हा वेगाने बदलत असल्याने आम्हाला अपडेटेड बुस्टरची आवश्यकता आहे.
इतर आजार असलेल्या व्यक्तींवर बुस्टर काम करेल का?
इतर आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये किरकोळ संसर्गदेखील अधिक धोकादायक ठरू शकतो. यासाठी हे खूप महत्वाचे आहे की, इतर आजार असणारे आणि रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या लोकांनी बुस्टर डोस घेणे फार आवश्यक आहे. त्यामध्ये ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे लोकं, गरोदर महिला, लठ्ठपणा, मधुमेह आणि किडनीचे आजार यांसारख्या दीर्घकालीन आजारांशी लढा देणाऱ्या लोकांचा समावेश आहे. आताच्या क्षणी तरुणांमध्ये डोस घेणे इतके आवश्यक नाही.
सध्या या व्हायरसचा प्रकार पूर्णपणे बदलला आहे. मात्र, ज्या लोकांना यापूर्वी करोना झाला आहे आणि ज्यांनी लस घेतली आहे, त्यांच्यात अजूनही थोडीशी प्रतिकारकशक्ती आहे. यासाठीच आपल्याला संक्रमणाची प्रकरणे कमी दिसून येत आहेत. मात्र, आता बुस्टर डोस म्हणून उपलब्ध असलेली लस तितकी प्रभावी असू शकत नाही. इन्फ्लूएन्झासाठीदेखील सध्या असलेल्या स्ट्रेनच्या विरुद्ध जुन्या स्ट्रेनच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. आपण स्ट्रेन स्पेसिफिक लस वापरून पाहावी. अमेरिकेमध्ये वापरल्या जाणाऱ्या पूर्वीच्या स्ट्रेन BA.5 विरुद्धच्या लढाईत महत्वाचे ठरत आहेत. भारतातील लोकसंख्या आणि लसीचा प्रभाव पाहता धोका आणि फायदा याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. परंतु, आमच्याकडील इतर आजार असणाऱ्यांची संख्यादेखील पाहणे आवश्यक आहे.
तुम्हाला अलीकडेच करोना झाला असेल तर तुम्हाला बूस्टर शॉटची गरज आहे का?
या परिस्थितीमध्ये तुम्हाला बुस्टर डोस घेण्यापूर्वी तीन महिने वाट पाहावी लागेल. अमेरिका सीडीसीचे म्हणणे आहे की, एकाच वेळेस फ्लूची लस आणि एक कोविड बुस्टर डोस घेऊ शकता. सुरुवातीला आम्हाला किमान दरवर्षी एक अपडेटेड फ्लू आणि न्यूमोनिया डोस मिळायला हवेत. जरी न्यूमोनिया आणि फ्लू शॉट्स विशिष्ट रोगजनकांपासून संरक्षण करण्यासाठी तयार केलेले असले, तरी श्वसनाच्या आजाराचे प्रमाण कमी करून आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकणारी गुंतागूंत टाळून सार्वजनिक आरोग्यासाठी त्यांचे व्यापक फायदे होऊ शकतात.