दोन ते तीन वर्षांपूर्वी भारतासह संपूर्ण जगभरात करोना महामारीने थैमान घातले होते. अनेक नागरिकांना या महामारीमध्ये आपला जीव गमवावा लागला होता. जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यात भारताचाही समावेश होता. सध्या करोना महामारीचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे. मात्र, हा विषाणू त्याचे स्वरूप कशा प्रकारे बदलत आहे, यावर आरोग्य संस्था आणि शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत. अमेरिकेमध्ये नवीन व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यासाठी फायझर आणि मॉडर्नाच्या करोना-१९ बुस्टर डोसची शिफारस करण्यात आलेली आहे. ज्याच्या माध्यमातून या व्हेरिएंटला रोखले जाऊ शकते. खास करून हिवाळ्यात होणारी वाढ रोखण्यासाठी उपयोगी पडू शकते. USFDA ने Eris आणि Pirola सारख्या अलीकडे आलेल्या व्हेरिएंटविरुद्ध फायझर आणि मॉडर्नाच्या करोना-१९ बुस्टर डोसचा प्रभाव स्पष्ट केला आहे. इतर फ्लू लसींप्रमाणेच करोना-१९ डोससाठी वेळोवेळी अपडेट आवश्यक असू शकतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा