Obesity Curve:सध्याच्या घडीला माणसाची जीवनशैली अर्थात लाईफस्टाईल फारच बदलून गेली आहे. जागरण, खाण्याच्या पिण्याच्या वेळा नसणं, कामाचा, अभ्यासाचा ताण आणि इतर अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे माणसांच्या जीवनशैलीत बराच फरक दिसून येतो आहे. व्यायामाचा अभाव, मोबाइल किंवा तत्सम स्क्रिनवर जास्तीत जास्त वेळ घालवणं या सगळ्या गोष्टी होत असल्याने भारताभोवतीचा लठ्ठपणाचा विळखा घट्ट होतो आहे. द लॅन्सेटने याबाबत धक्कादायक आकडेवारी त्यांच्या अहवालात प्रसिद्ध केली आहे.

काय सांगतो लॅन्सेटचा अहवाल?

द लॅन्सेटने एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये आपला भारत देश हा लठ्ठपणाच्या विळख्यात अडकत चालल्याचं नमूद करण्यात आलं आहे. खास करुन तरुणांमध्ये याचं प्रमाण सर्वाधिक आहे त्यामुळे येत्या काळात भारत लठ्ठपणा आणि त्यामुळे होणाऱ्या विविध आजारांनी ग्रासलेल्या लोकसंख्येचा देश होण्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. भारतात हृदयविकार, स्ट्रोक आणि मधुमेह या आजारांचं प्रमाण अधिक आहे. अशात माणसांचं लठ्ठ होणं वाढलं तर या आजारांचं प्रमाण आणखी वाढू शकतं. सध्याच्या घडीला किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीस लागला आहे. या किशोरवयीन मुलांमध्ये मधुमेहाचा टाइप टू हमखास दिसून येतो आहे. या संदर्भात जो अभ्यास करण्यात आला त्यासाठी १९९० पासूनची माहिती वापरण्यात आली. १९९० ची आकडेवारी आणि २०२२ ची आकडेवारी यांची तुलना करण्यात आली.

India to remain fastest-growing large economy in FY26, FY27
भारताच्या आर्थिक भक्कमतेबाबत आशावाद; २०२५ मध्ये जागतिक अर्थस्थिती मात्र कमकुवत; प्रमुख जागतिक अर्थतज्ज्ञांच्या या सुसंकेतामागील कारण काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
India Women Register 435 Highest ODI Total
India Women Highest ODI Total: भारतीय महिला संघाची वनडेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या, पुरूष संघालाही टाकलं मागे
retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’
ruhcir sharma
२०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कशी असेल?
Rohit Roy talks about diet
२५ दिवसांत १६ किलो वजन घटवलं अन्…; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “मी अत्यंत मूर्खासारखा…”

काय सांगते आहे ही आकडेवारी?

१९९० मध्ये भारतात लठ्ठपणाचे प्रमाण १.२ टक्के होते जे २०२२ मध्ये ९.८ टक्के वाढलं आहे. १९९० मध्ये पुरुषांचं जाड होण्याचं प्रमाण ०.५ टक्के होतं ते २०२२ मध्ये ५.४ टक्के झालं आहे. तर मुलींचं प्रमाण १९९० मध्ये ०.१ टक्के होतं जे २०२२ मध्ये ३.१ टक्के झालं आहे. नॅशनल रिस्क फॅक्टर कोलॅब्रेशन आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीचे विश्लेषण करुन हा अंदाजही देण्यात आला आहे की जगातील मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये २०२२ च्या लठ्ठपणाचा दर १९९० च्या दराच्या चौपट आहे.

जगभरात एक अब्जाहून लोक लठ्ठ

द लॅन्सेटच्या अहवालात प्रसिद्ध झालेल्या जागतिक अंदाजानुसार जगभरात एक अब्जाहून अधिक लोक लठ्ठ आहेत. २०२२ ची आकडेवारी देण्यात आली आहे त्यामध्ये जगातल्या लठ्ठ लोकांमध्ये ८८ कोटी प्रौढ तर १५.९ कोटी मुलांचा समावेश आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने परिभाषित केल्यानुसार, लठ्ठपणा म्हणजे चरबीचा एक असामान्य किंवा जास्त संचय आहे ज्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. बॉडी मास इंडेक्स किंवा बीएमआय (BMI) म्हणजे उंचीच्या प्रमाणातलं वजन. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार २५ पेक्षा जास्त BMI असेल तर तुम्ही ओव्हरवेट असता म्हणजे तुमचं वजन गरजेपेक्षा जास्त आहे, असं मानलं जातं.

हे पण वाचा- Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

द लॅन्सेटच्या अभ्यासानुसार भारतात २०२२ मध्ये २० वर्षांवरील ४४ दशलक्ष महिला आणि २६ दशलक्ष पुरुष लठ्ठ असल्याची नोंद करण्यात आली आहे. १९९० मध्ये लठ्ठपणाचे हे प्रमाण २.४ दशलक्ष महिला आणि १.१ दशलक्ष पुरुष असे होते. तसेच २०२२ मध्ये, ५ ते १९ या वयोगटातील तब्बल १२.५ दशलक्ष मुलांचे, ज्यामध्ये ७.४ दशलक्ष मुले आणि ५.२ दशलक्ष मुलींचे स्थूलपणामुळे वजन वाढल्याचे असल्याचे आढळून आले, १९९० मध्ये हीच आकडेवारी केवळ ०.४ दशलक्ष इतकी होती. द लॅन्सेटचा हा अहवाल नक्कीच चिंताजनक आहे. या सगळ्यापासून बचाव करायचा असेल तर संतुलित आहार, व्यायाम आणि जीवशैलीत आवश्यक ते बदल करणं गरजेचे आहेत. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

लठ्ठपणा तरुणवयात का वाढला आहे?

मद्रास डायबेटिस रिसर्चचे डॉ. गुहा प्रदीप याबाबत सांगता की आत्ताच्या घडीला लोक फळं, फळभाज्या, पालेभाज्या, डाळी, कडधान्यं यापासून लांब जात आहेत. प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वापर वाढला आहे किंवा तशी उत्पादनं जास्त प्रमाणात वापरली जात आहेत. चरबीयुक्त पदार्थांचं जास्त सेवन मुलांनी करणं, शरीराला हालचाल नसणं, बैठी जीवनशैली, जास्त प्रथिने न मिळणं अशी अनेक कारणं यासाठी देता येतील आपल्या पारंपरिक गोष्टी आपण मागे सोडत चाललो आहोत. व्यायाम, सूर्यनमस्कार अशा साध्या गोष्टींसाठी कुणालाही वेळ नाही त्यामुळेच हे प्रमाण वाढतं आहे असं त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. मुलांकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज अशासाठीही आहे की मुलं त्यांचा बराचसा वेळ शाळेत बसून घालवतात, क्लास असतील तर तिथे बसणं होतं, बस, कार, व्हॅन यामध्ये बसूनच जाणं होतं. घरी आल्यानंतर मैदानी खेळ खेळण्याऐवजी मुलांची पसंती टीव्ही, मोबाईल, टॅब आणि तत्सम गॅजेट पाहण्यासाठी असते. शारिरीक हालचाल न झाल्याने चयापचय क्रिया मंदावते आणि लठ्ठपणाची समस्या सुरु होते. या गोष्टींकडे मुलांच्या आई वडिलांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असंही प्रदीपा यांनी सांगितलं.

Story img Loader