बदलत्या काळासोबत लोकांच्या खाण्यापिण्याची सवयींमध्येही मोठा बदल होत आहे. आजच्या काळात लोकांमध्ये फास्ट फूड खाण्याची गोडी वाढतच चालली आहे. लोकांच्या आवडीच्या अशा अनेक फास्ट फूडपैकी एक म्हणजे फ्रेंच फ्राइज. फ्रेंच फ्राइज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खायला आवडतात. पण तुम्हाला माहितीये का तुमचा आवडीचा पदार्थ चवीला कितीही उत्कृष्ट असला तरी तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करीत आहे आणि तुम्हाला अस्वस्थता आणि नैराश्याला बळी पाडत आहे. चला तर जाणून घेऊ या, फ्रेंच फ्राइजवरील या संशोधनातून कोणते धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
वारंवार फ्रेंच फ्राइज खाणाऱ्यांमध्ये वाढू शकतो नैराश्य आणि अस्वस्थतेचा धोका!
चीनमधील हांगझोऊ येथील संशोधकांच्या मते, फ्रेंच फ्राइज वारंवार खाणाऱ्यांमध्ये, न खाणाऱ्यांच्या तुलनेत नैराश्य आणि अस्वस्थतेचा धोका अनुक्रमे सात टक्के आणि बारा टक्क्यांनी वाढू शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,” तळलेले अन्न (फ्रेंच फ्राइज) खाल्ल्याने उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.”
या अभ्यासाचे परिणाम पीएनएएस (प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्याच वेळी, संशोधकांनी सांगितले की,”परिणाम प्राथमिक आहेत आणि मानसिक आरोग्य समस्या आणि तळलेले अन्न यांच्यातील संबंध स्थापित करण्यासाठी ते निर्णायक असू शकत नाहीत.”\
हेही वाचा : ‘Best Before’ तारीख ओलांडलेले खाद्यपदार्थ खाणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
फ्रेंच फ्राइज खाण्यामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होतो नकारात्मक परिणाम!
तळलेल्या अन्नावर केलेला हा अभ्यास १,४०,७२८ लोकांवर ११ वर्षांहून अधिक काळ करण्यात आला होता, ज्यामध्ये असे आढळून आले की, तळलेले अन्न विशेषत: फ्रेंच फ्राइज जास्त खाणाऱ्यांमध्ये ८,२९४ अस्वस्थता आणि १२,७३५ नैराश्याची लक्षणे आढळून आली. त्यानंतर असे मानले जात होते की, फ्रेंच फ्राइज, हे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करून चिंता आणि नैराश्याचा धोका दोन टक्क्यांनी वाढवू शकतात. याचा प्रभाव तरुण पुरुषांमध्ये अधिक प्रबळ होता.
हेही वाचा : चपातीला तूप लावून खावे की नाही? डॉक्टरांकडून जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे
परंतु या स्पष्टीकरण देताना केलेल्या व्याख्येनुसार, चिंता आणि नैराश्याने ग्रस्त लोक सहसा वाढत्या आरामाच्या गरजेसह आरामदायी अन्नपदार्थांकडे वळतात, कारण बहुतेकदा ते स्वतःचा औषधोपचार करण्याचा एक मार्ग मानला जातो. आणि या अस्वास्थ्यकारक निवडीमुळे कालांतराने मूड बदलणे, मानसिक आरोग्य समस्या आणि मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार यांसारखे चयापचयाचे विकार होऊ शकतात.